लेक लाडकी
.
आठवणींच्या गावाची सफर करत मागे मागे जात इथे येऊन पोहचले. इथून आणखीन मागच काहीच दिसत नाहीये, हिच ती पहिली आठवण!! मला फूलपंखी दिवसांमध्ये घेऊन जाणारी..
मी तीन-साडेतीन वर्षांची असेन, बालवाडीत जाणारी.. बालवाडीच्या दुसऱ्या वर्षाला होते तेव्हा. आमची बालवाडी आणि आमच्या गावातलं महिला मंडळ एकाच छता खाली जमायच.. आणि मग आमचे सामाईक असे सांस्कृतिक कारेक्रम व्हायचे.
कोणता दिवस होता बरं तो.. कांदे-नवमी /सरस्वती-पुजन /की नवरात्र.. आता नक्की आठवत नाही ... धुवाधार पाऊस पडत नव्हता.. म्हणजे पावसाळा संपत आलेला.. नवरात्रिचेच दिवस असावेत.. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा चालू होत्या..