✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ ......

च
चौकस२१२ यांनी
Mon, 10/28/2024 - 13:33  ·  लेख
लेख
एकीकडे ऑस्ट्रेलिय सरकार ऑक्टोबर ला "हिंदू हेरिटेज मंथ" म्हणून साजरा करताय https://www.youtube.com/watch?v=yNLq5cpDO04 आणि दुसरीकडे आपलेच हिंदू त्यात मीठ काल्वत आहेत .. खरे तर हे मीठ कालवणारे हिंदू तरी आहेत कि नाही कोण जाणे ... पुढे वाचा कालच दिवाळी उत्सवसाठी गेलो , या वेळचा कार्यक्रम "हिंदू कौन्सिल" नि आयोजित केलेला असल्यामुळे अर्थातच कोणते "हिंदू विरोधी किडे" तिथे वळवळ तील याची काळजी होतीच गेली काही वर्षात पिवळे झेंडे वाले खलिस्तानी ( मग कधी सरळ खलिस्तान चा झेंडा फडकावीत नाहीतर कधी " फार्मर ऑफ ऑस्ट्रेलिया अँड इंडिया " असला बादरायण संबंध दाखवीत मीठ कालव्यायालाअसतात ... पण अहो आश्चर्य म .. ते नवहते कुठे एवढचं नव्हे तर लोकांमध्ये काही शीख पाहून आनंद वाटला ....अगदी निहंगे ( धर्माला वाहिली) शीख पाहून चांगले वाटले आणि मग दुधात मिठात खडा पडलाच कोणता तो खडा : " आम्ही तामिळ हिंदू आहोत आणि आमचा या रावण दहनाला विरोध आहे" आशि पत्रके वाटत होते बाहेर... प्रथम पत्रक घेताना वाटले कि काहीतरी आजच्या कार्य्रक्रमातील जाहिरात असेल , पण पाहतो ते काय .... पुढे असे कळले कि हे पेरियार वादि आहेत , आता रावण दहन हे प्रतीकात्मक आहे मनुष्यतील १० वाईट वृत्तीचे दहन वगैरे हे यानं कोण समजवून सांगणार ,,, आव्हान दहन करणे हे काही तामिळ लोकांच्या विरुद्ध आहे असे नाही .. पण मग एक प्रश्न पडला कि , पेरियार वादि, ह्यांचा रावणावर प्रेम आणि रावण तर ब्राह्मण मग पेरियार यांचा ब्राहमण द्वेष जगजाहीर मग हे असे कसे ? पेरियारवादि आहेत ते हिन्दु आहेत क? हिन्दु नस्तिल अणि जर धर्म बदलून बुद्ध झाले अस्तिल तर त्यांना हिन्दु धर्मबद्दल बोल्ण्याचा काय अधिकर आहे ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11109 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

एवढचं नव्हे तर लोकांमध्ये

चावटमेला
Mon, 10/28/2024 - 14:58 नवीन
एवढचं नव्हे तर लोकांमध्ये काही शीख पाहून आनंद वाटला ....अगदी निहंगे ( धर्माला वाहिली) शीख पाहून चांगले वाटले दिवाळी हा शीख धर्मियांचा सुध्दा महत्वाचा सण आहे म्हणून असतील कदचित. बादवे, रावण दहन तर दसर्‍याला असते ना?
  • Log in or register to post comments

दिवाळी हा शीख धर्मियांचा

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 18:15 नवीन
दिवाळी हा शीख धर्मियांचा सुध्दा महत्वाचा सण आहे, बरोबर शीख हि दिवाळी साजरी करतात परंतु असे भारतीय सार्वजनिक कार्यक्रमात ते सुद्धा हिंदू कौन्सिल ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचे येणे हा सुखद धक्काच म्हणावा लागेल गेली काही वर्षातील वातावरण बघत ( उके कानडा ऑस्ट्रेल्या, न्यू झीलंड येथील काही शिखांचे वागणे बघून म्हणत आहे ( भारताचं एकूण लोकसंख्येच्य्या मानाने जरी शीख संख्यने कमी असले तरी येथे स्थलान्तरित भारतीयांचाय संख्येत शीखाचे प्रमाण जास्त आहे आणि त्या सख्यप्रेमाने धरले तर हिंदू मंदिरात किंवा आशय कार्यक्रमात फारसे दिसत नाहीत ) रावण दहन तर दसर्‍याला असते ना? हो रावण दहन दसऱ्याला असते पण येथे दोन्ही एकत्र करून करता कारण दोन वेळेस कार्यक्रम करणे अवघड असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

ते श्रीलंकावाले आहेत.

कंजूस
Mon, 10/28/2024 - 15:22 नवीन
ते श्रीलंकावाले आहेत.
  • Log in or register to post comments

कंजूस जी काही संधर्भ द्याल का

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 18:18 नवीन
कंजूस जी काही संधर्भ द्याल का? पत्रिकेवर कोणतच नाव नवहते त्यात " We are Tamil Hindus , we celebrate Diwali but we don't burn other god ( Ravan) Lets celebrate our difference! असे म्हणले होते श्रीलकेच्या तामिळ हिंदूनं रावणाबद्दल प्रेम असणार हे तर्क असावं बहुतेक तुमचा, बरोबर?
  • Log in or register to post comments

दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच.

कंजूस
Mon, 10/28/2024 - 18:43 नवीन
दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच. पोंगल संक्रांत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर पाऊस पडून भात पिकते ते संक्रांतीला तयार होते. गायी पुष्ट होतात. तमिळनाडूचा कोइंबतुर भाग मात्र वेगळा आहे त्यांना दिवाळी आवडते. तिथले हवामान वेगळे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

त्या पत्रकांत असे लिहिले

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 19:02 नवीन
त्या पत्रकांत असे लिहिले नवहते कि आम्ही डिवलाई साजरी करीत नाही शब्द आहेत " we do celebrate festival of lights" but we don't light ( burn) others god say no to ravan dahan " म्हणजे याचा अर्थ रावण दुसाऱ्यांचा ( तामिळ हिंदूंचा) देव आहे आणि तुम्ही त्याला का जाळंता? आणि खाली परत Stop Bullying ! https://www.youtube.com/watch?v=phsxgU3yj54&t=89s PATCA म्हणून काहीतरी संस्था आहे https://lawreform.nsw.gov.au/documents/Current-projects/s93z/prelim-subs/SV06_-_PATCA.pdf सर्वधर्म संम भावी ऑस्ट्रेल्यात पण हि लोक जात घुसवत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

"दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच.

टर्मीनेटर
Mon, 10/28/2024 - 21:07 नवीन
"दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच." ऑ... माफ करा कंजूसकाका पण तुम्ही डोंबिवलीत माझ्या नंतर आला असाल तर... डोंबिवलीच्या गणपती मंदिरात (आताच्या तथाकथित गणेश मंदिर संस्थानात) दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरकचतुर्दशीला त्या देवळात जायची प्रथा/परंपरा डोंबिवलीतल्या तामिळी ब्राम्हण परिवारांनी सुरु केली होती. आता गणेशमंदिर देवस्थान आणि त्याचे राजकारणी विश्वस्त ह्याचे श्रेय लाटू इच्छित असतील तर त्याला विरोध करायला मी बसलोय! आता अमेरिकेतही (टाइम्स स्क्वेअर मध्ये) असे प्रकार सुरु झाल्याच्या बातम्या वाचतोय पण त्याचे श्रेय सर्वस्वी तामिळ ब्राह्मणांना आहे हे मला विसरता येत नाही. पेरियार वगैरे फडतूस मंडळींना परदेशात काडीचीही किंमत दिली जात नाही हे उगाच नमूद करतोय त्यासाठी क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सामाजिक सुधारणा करुन

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/28/2024 - 21:17 नवीन
सामाजिक सुधारणा करुन जातवर्चस्व मोडून काढनारे पेरियार फडतूस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सामाजिक सुधारणा करुन

टर्मीनेटर
Mon, 10/28/2024 - 21:37 नवीन
सामाजिक सुधारणा करुन जातवर्चस्व मोडून काढनारे पेरियार फडतूस?
नक्की कुठल्या सामाजिक सुधारणा केल्या त्यांनी हे समजुन घ्यायला आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरे अरे, पेरियारांबद्दल इतके

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/28/2024 - 21:40 नवीन
अरे अरे, पेरियारांबद्दल इतके अज्ञान अस्वल असे वाटले नव्हते. थोडा अभ्यास करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

का? पेरियार हा जगातला अत्यंत भिकारxx माणुस होता अशी

टर्मीनेटर
Mon, 10/28/2024 - 21:50 नवीन
का? पेरियार हा जगातला अत्यंत भिकारxx माणुस होता अशी माझी धारणा आहे. त्यांनी नक्की काय सामाजीक परिवर्तनाचे कार्य केले ते सांगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

असो. मला तुमची विचारसरणी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/28/2024 - 22:04 नवीन
असो. मला तुमची विचारसरणी भिक्कार वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

असले फालतु प्रतिसाद देउन पळ काढु नका... विचारलेल्या

टर्मीनेटर
Mon, 10/28/2024 - 22:09 नवीन
असले फालतु प्रतिसाद देउन पळ काढु नका... विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अज्ञानात सुख असतं, सुखी रहा.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/29/2024 - 00:58 नवीन
अज्ञानात सुख असतं, सुखी रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

कुठे त्या भुजबळांच्या नादी

सुबोध खरे
Tue, 11/12/2024 - 09:53 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादी लागताय? उथळ पाण्याला खळखळाट फार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही द्या की मग

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/12/2024 - 13:19 नवीन
तुम्ही द्या की मग पेरियारांबद्दल माहिती अज्ञान दूर करा त्यांचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉ. बाबा आढावलिखित

रामचंद्र
Tue, 10/29/2024 - 16:36 नवीन
डॉ. बाबा आढावलिखित सत्यशोधनाची वाटचाल या पुस्तकात पेरियारप्रणीत चळवळीचा आणि त्याच्या परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांनी याच धर्तीवर प्रयत्न करूनही ते अथवा त्यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्या बाबतीत व का कमी पडली याचेही परखड परीक्षण केले आहे. गंमत म्हणजे आजवर शेठजीभटजींचा पक्ष म्हणून हिणवला जाणारा भाजप हा आज बहुजनसमाजात आपली पाळेमुळे रुजवताना दिसतो. पुरोगामी संघटनांना याचे आश्चर्य आणि वैषम्य वाटते, पण संबंधित पक्ष/मातृसंस्था हे कसे साध्य करते, ते आढावांनी थोडक्यात दाखवून दिले आहे. स्वजातीय शिक्षणसंस्थांच्या अंतर्गत राजकारणावरही त्यांनी नेमके बोट ठेवले आहे. पूर्वग्रह न ठेवता वाचल्यास सकस वाचनाचा आनंद मिळेल असे हे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

नेमके प्रश्न विचारले आहेत, नेमकी उत्तरे द्या.

वामन देशमुख
Tue, 10/29/2024 - 16:22 नवीन
सामाजिक सुधारणा करुन जातवर्चस्व मोडून काढनारे पेरियार फडतूस?
१. कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या? २. कुणाचे जातवर्चस्व मोडून काढले? नेमके प्रश्न विचारले आहेत, नेमकी उत्तरे द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनुवाद्याना पेरियार माहित

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/29/2024 - 18:08 नवीन
मनुवाद्याना पेरियार माहित नसणे म्हणजे हमासच्या अतिरेक्यांना इस्राईल माहीत नसल्यासारखे आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

आडातच नाही ते पोहरयात कुठून

वामन देशमुख
Tue, 10/29/2024 - 20:50 नवीन
आडातच नाही ते पोहरयात कुठून येणार? तुमच्यासारख्या फुरोगाम्याकडून यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या पळपुट्या उत्तराची अपेक्षा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मला वाटते की बाहुबली यांनी

Vichar Manus
Wed, 10/30/2024 - 08:40 नवीन
मला वाटते की बाहुबली यांनी तमिळनाडूचा इतिहास आणि पेरियार यांच्यावर एक मालिकाच लिहिली होती मायबोलीवर, त्यामुळे त्यांना बरीच माहिती आहे, त्यांच्यावर असा आरोप करणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

या धाग्याचा मूळ हेतू हा होता

चौकस२१२
Wed, 10/30/2024 - 12:59 नवीन
या धाग्याचा मूळ हेतू हा होता कि "जगात इतरत्र हिंदूंचं सण साजऱ्या करण्याच्या हकक्कावर हे हिंदूंच्या फूट पडणारे गट कसे त्रास देतात ते दाखवणे " हे पेव गेल्या काही वर्षात फुटलाय बर जातीयवाद म्हणाल तर भारतात हा प्रश्न असेल, येथे जातीनिहाय संस्था काढे अवघड आहे तुम्ही पेरीरय आंबेडकर थिंक ग्रुप ने कारण नसताना न्यू सैऊथ वेल्स ( सिडनी) सरकार कडे फालतू तक्रार केली आणि कारण नसताना त्यात हिंदू कौंसिल ला ओढले.. सरकार ने त्या तक्ररीकडे दुर्लक्ष केले / फेटाळून लावली याची लिंक मी आधी दिली होती आता बाहुबळीना मारे असेल पेरियार संबंधी खूप माहिती पण त्याचा येथील घटनेशी काय संबंध ? सात पैकी ३ चा ब्राहमण आहेत मग जातीवाद कसा ? Shri Prakash Mehta – Director, Governing Education Shri Bhagwat Chauhan – Director, Governing Charity Shri Ashwin Sharma – Director, Governing Seniors Shri Sai Paravastu – Director, Overall Responsibility Shri Makarand Bhagwat – Director, Governing Interfaith & Grants Smt. Shoba Deshikan – Director, Governing Events
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

अच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/30/2024 - 13:55 नवीन
"जगात इतरत्र हिंदूंचं सण साजऱ्या करण्याच्या हकक्कावर हे हिंदूंच्या फूट पडणारे गट कसे त्रास देतात ते दाखवणे "
आलात का इकडे ? दीपावलीच्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

इकडे/ तिकडे तुम्हाला

चौकस२१२
गुरुवार, 10/31/2024 - 05:01 नवीन
इकडे/ तिकडे तुम्हाला दुसऱ्याना उचकवण्याशिव्या दुसरा काही येत का प्रोफेश्वर , तुमच्या तिकडे नसेल हा प्रश्न तर "पेरिअय जय " म्हणून देशभर ओरडत फिरा कोण नाही म्हणताय.... इथे जे अनोभावले ते मांडले पण परत तुमहाला सांगून काय उपयोग म्हणा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी अगदी... ब्रिगेडी लोकांना

टर्मीनेटर
Tue, 10/29/2024 - 23:33 नवीन
अगदी अगदी... ब्रिगेडी लोकांना सीग्रेडी विचारांतला फरक जसा कळत नाही तसेच काहीसे 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तमिळनाडूत संक्रांतच.

कंजूस
Tue, 10/29/2024 - 04:14 नवीन
तमिळनाडूत संक्रांतच. द्रविड मुनेत्र चळवळीनंतर तमिळी ब्राह्मण तिथून बाहेर पडून कोइंबतूर आणि पलक्कड (पालघाट) केरळमध्ये गेले.जे दुसरीकडे गेले त्यांनी दिवाळीकडे लक्ष दिले. ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये खूप पाऊस पडतो तमिळनाडूत तेंव्हा एखादा सण साजरा करणे अशक्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

संदर्भ असा नाही पण.......

कंजूस
Mon, 10/28/2024 - 18:38 नवीन
संदर्भ असा नाही पण....... १) रावण वाईट होता, श्रीलंकेत होता आणि रामाने त्याला मारले हे त्यांना आवडत नाही, पटत नाही. २) उत्तर हिंदुस्तानाच्या गोष्टींना विरोध करणे. हिंदीला विरोध करणे. इकडे त्यांना विरोध केला जातो पण ऑस्ट्रेलियात संधी साधली. ३) तसं मध्य प्रदेशातील एक गावही रावणाला जावई मानते, दहन करत नाहीत.
  • Log in or register to post comments

हिंदीला

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/28/2024 - 19:04 नवीन
हिंदी भाषिकांना/भाषेला विरोध ह्या पलिकडे त्यात अर्थ नाही. सध्या प्रत्येक राज्यातील लोकांना "आपण ईतर भाषिकांपेक्षा कसे वेगळे आहोत्,आपली भाषा,संस्क्रुती कशी वेगळी आहे' हे सांगायची स्पर्धा चालु आहे. परदेशात गेल्यावर ही स्पर्धा अधिक तीव्र होते. मग भाषिक बालवाडी,एकत्र येऊन नाचगाणी वगैरे दंगा सुरू होतो. त्यात पेरियारवादी म्हणजे विचारायला नको. भाजपावाले बरोबर त्याउलट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

इथे काय संबंध?

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 19:21 नवीन
भाजपावाले बरोबर त्याउलट. इथे काय संबंध? हिंदूंनी सार्वजनिक रित्या येथील सर्व नियम पळून सण साजरे कारायायचे नाहीत ? आयोजनकी सांगतले कि त्यांना धमख्य हि आलया होत्या पण येथील सरकार ला हि बहुतेक कळून चुकलंय कि येथील हिंदू शांतताप्रेमी आहेत ( बघू कदाचित येतेच हि कानडिअन त्रिदेव असले हि ..) असो हे अति होतंय गेली काही वर्षे येथील हिंदूंना असा त्रास दिला जातोय हे फक्त इतर देशातलं हिंदूनं समजावे म्हणून येथे लिहिले बार हा त्रास कोणाकडून तर कोना मुस्लिम संघटने कडून नाही किंवा ख्रिस्ती संघटन कडून नाही हिंदू कॉन्सुल काही इथे "बघ हे आबेडकर कर वाडी कसे वित्त म्हणून पत्रक फेकत हिंडत नाहीत " येथील समाजरचनेत जो अधिक राहे त्याचे पालन करून जसे चिनी आपले नाव वर्ष साजरे करतात तसे आम्ही करतो ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

We are Tamil Hindus , we

कॉमी
Mon, 10/28/2024 - 18:58 नवीन
We are Tamil Hindus , we celebrate Diwali but we don't burn other god ( Ravan) Lets celebrate our difference! असे नीट लिहिले असेल तर काही वावगे वाटत नाही. आपापले धार्मिक विश्वास एकमेकांना पद्धतशीर, सुसंस्कृतपणे सांगण्यात काही चुकीचे वाटत नाही. आणि जर ते सुद्धा हिंदू असतील तर मग त्यांनी आपले धार्मिक विश्वास हिंदू हेरिटेज मंथ मध्ये मांडण्यात काय चुकीचे आहे? का हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी असते?
  • Log in or register to post comments

वाचूनच डोक्यात तिडीक गेली.

सौंदाळा
Mon, 10/28/2024 - 19:04 नवीन
वाचूनच डोक्यात तिडीक गेली. श्रीलंकन होते का भारतीय ?
  • Log in or register to post comments

सर्व जातीचे हिंदू मिळून साली आम्ही आमचे सण पण साजरे कारायचे...

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 19:27 नवीन
जाम म्हणजे जाम तिडीक गेली / बहुतेक भारतीय असावेत कारण बाहेर अगदी लुंगी नेसून चांगले कपडे घालू पत्रक वाटत होते आव भाव तर अगदी साजरे करायला आल्या सारखे , पण पत्रकात काय होते ते नंतर कळले आणि आत्त्ता तर त्यामागे कोण आहे कळले ,, हिंदूनं फक्त त्रास देणे .... अरे xxxx जावा ना मग धर्म सोडून आंबेडकरांनी दिशा दाखवली ना जावा तिकडे .. आम्हाला का हि कटकट सर्व जातीचे हिंदू मिळून साली आम्ही आमचे सण पण साजरे कारायचे नाहीत का ... ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

अरे xxxx जावा ना मग धर्म

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/28/2024 - 20:20 नवीन
अरे xxxx जावा ना मग धर्म सोडून आंबेडकरांनी दिशा दाखवली ना म्हणजे आम्ही सांगू तोच धर्म. एखाद्याला सुधारणा हवी असलेंटर त्याने धर्म सोडून जावे?? आपला कॉपी राईट आहे का धर्मावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

यात कसली सुधारणा... रावण दहन

चौकस२१२
Tue, 10/29/2024 - 04:47 नवीन
यात कसली सुधारणा... रावण दहन म्हणजे प्रतीकात्मक आहे आणि ते म्हणजे काही सती देण्याची प्रथा नाही कि सुधारणा करायल पाहिजे काहीतरी बाष्कळ प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 19:14 नवीन
हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी असते? असे कुठे म्हणलय ? पण जे करीत आहेत त्याना का विरोध तुमचाच तर्क लावूयात "धार्मिक विश्वास हिंदू हेरिटेज मंथ मांडण्यात काय चुकीचे आहे?" हाच विश्वास किंवा चालीरीती हिंदू या महिन्यात दाखवीत आहेत त्यात काय चुकला ? हजारो संख्येने एकत्र आलेले हिंदू जर शेकडो वर्षांची परंपरा साजरी करताय ते सुद्धा कुणाला नावे ना ठेवत तर ह्यांचं पोटात का दुखतंय? या मागील जी संघटन आहे ती हिंदूनं त्रास देणारी आहे हे पुढे शोध घेतल्यावर स्पष्टच दिसतंय ... सतत हींच कौन्सिल बरोअबर भांडण हे यांचे उद्योग जे एक राजय सरकारे धुडकावून लावले , काय तर म्हणे हिंदू कौन्सिल जातीनिहाय बेभेद दभाव करते? हे पहा सरकारचे उत्तर https://www.parliament.nsw.gov.au/lc/papers/Pages/qanda-tracking-details.aspx?pk=98414 असा जातीनिहाय भेदभाव कारेन येतेच संस्थेला शक्य नाहीये तेव्हा या पेरियार वाल्यांना काह्ही करून जिथे तिथे हिंदूनं त्रास द्यायचंय या पेरिय्यर वालयासाचें उप अध्यक्ष हिंदू हि नाहीत Dr. Haroon Kasim च्यामारी ह्यांचा काय संबंध हिंदू धर्माशी
  • Log in or register to post comments

तुम्ही दिलेल्या मजकूरात विरोध

कॉमी
Mon, 10/28/2024 - 19:25 नवीन
तुम्ही दिलेल्या मजकूरात विरोध दिसत नाही. Lets celebrate our difference! म्हणत आहेत. हिंदू धर्माचा महिमा म्हणून अश्या गोष्टी अनेकवेळेस सांगितल्या जातात की बघा, हिंदू रावणाची पूजा करणारे पण आहेत आणि रामाची पूजा करणारे पण आहेत वैगेरे. बाकी तुम्ही दिलेल्या लिंक मधून फारसे काही समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मजकूरात विरोध दिसत नाही!!!

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 19:35 नवीन
तुम्हाला वाटते तेवढे "पापभिरू निरुपद्रवि " नव्हेत ते बरं पत्रकावर स्वतःचे संस्थेचे लिहायची पण हिंमत नाही संधी साधून हिंदूनना फोड येथील ग्रोयान्चायत सम्ब्र्हम निर्माण करा ... तुम्ही अनुभवले असतेत ना तर "एक वेळ ओवेसी किंवा मुस्लिम लीग परवडला" असे वाटले असते सरळ भिडता तरी येते भारततात दहीहंडी किंवा रावण दहनाचे वेळेलाबघितलंय कधी असले प्रोटेस्ट? लिंक म्हणाल तर या मागे असली पेरियार वाडी संघटन कशी सरकार कडे तक्रार करते आणि सरकारे ती टँकर कशी धुडकावून दिली याचा पुराव ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

बाकी तुम्ही दिलेल्या लिंक

चौकस२१२
Mon, 10/28/2024 - 19:48 नवीन
बाकी तुम्ही दिलेल्या लिंक मधून फारसे काही समजले नाही. हे पेरियार वाले "ऑस्ट्रेलियात जातीनुसार भेदभाव केलला जातो " म्हणून सरकार कडे धावले त्याचे काय झाले त्याची लिंक दिली होती रोख अर्थात हिंदू कॉन्सिल सारखया संघटनांवर एक तर येथे असा भेदभाव करणे अतीशय अवघड आहे दुसरे हिंदू कौंसिल चे पधाधिकरी बघा देशिकन , गोयल , जैन , कोण एका जातीचे आहेत का? https://hinducouncil.com.au/team/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

कारण

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/28/2024 - 19:28 नवीन
"हजारो संख्येने एकत्र आलेले हिंदू जर शेकडो वर्षांची परंपरा साजरी करताय ते सुद्धा कुणाला नावे ना ठेवत तर ह्यांचं पोटात का दुखतंय?" कारण पंतप्रधानपदी मोदी आहेत आणि सत्तेवर भाजपा आहे. आणि २०२९ पर्यंत तरी हे चित्र बदलणार नाही आहे. विरोधी पक्षांनी प्रचंड विरोध करूनही २०२४ साली पुन्हा भाजपा सत्तेवर आली. कितीही नावे ठेवली तरी अनिवासी भारतियांमध्ये मोदी/भाजपा लोकप्रिय आहेत. ती लोकप्रियता कमी करायची तर त्यांच्या समर्थकांना चिडवायला बघायचे म्हणजे रागाने हे समर्थक हाणामार्या करतील आणि मग ते पथ्यावर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मंदसौर ह्या मध्यप्रदेशातील

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/28/2024 - 20:26 नवीन
मंदसौर ह्या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात रावणाला जावई मानून पूजा करतात. तो धर्माला विरोध नसतो. महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या श्री अमोल मिटकरी ह्यानी २०२४ च्या दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली. https://marathi.abplive.com/news/politics/dasara-ncp-amol-mitkari-demad-to-stop-the-practice-of-burning-ravana-on-dussehra-and-mitkari-donate-20-lakh-to-ravana-temple-akola-1318838/amp हा धर्माला विरोध नसतो. पण पेरियारवाद्यांनी रावण दहन करू नका ही मागणी केली तर तो धर्माला विरोध असतो?? खरं कारण पेरियारवादी जाती व्यवस्थेला विरोध करतात ह्यामुळे पोटात दुखतय की काय?
  • Log in or register to post comments

इथे परदेशात कसली आलीय जातीयता?

चौकस२१२
Tue, 10/29/2024 - 04:38 नवीन
पेरियारवादी जाती व्यवस्थेला विरोध करतात ह्यामुळे पोटात दुखतय की काय? इथे परदेशात कसली आलीय जातीयता? सर्व जातीचे कार्यकर्ते आहेत हिंदू कॉन्सिल मध्ये उगाच विरोधाला विरोध करताय , पण तुमचं तोंडी कोण लागणार म्हणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्यांना हे बिंबवायचं असेल की

कंजूस
Mon, 10/28/2024 - 21:16 नवीन
त्यांना हे बिंबवायचं असेल की ..... उत्तर हिंदुस्थानात जे जसं साजरं होतं तसं आणि तेच म्हणजे भारतीय नव्हे. ............. दुसरं उदाहरण - ओणम. केरळ. यावेळी बलीची पुजा होते. बलीचं महत्त्व आणि पराक्रम थांबवण्यासाठी वामनाने त्यास पाताळात ढकलले. पण बली हा महाविक्रमी म्हणूनच ओळखला जातो तिकडे.
  • Log in or register to post comments

बरोबर. समुद्रगमन करण्यासही

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/28/2024 - 21:23 नवीन
बरोबर. समुद्रगमन करण्यासही हिंदू धर्मात बंदी आहे. तरी अण्वक जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

समुद्रगमन करण्यास..........

कंजूस
Tue, 10/29/2024 - 04:06 नवीन
समुद्रगमन करण्यास.......... हिंदू शब्द नाही. ब्राह्मणांना वाळीत टाकले जायचे. प्रायश्चित्त घ्यावे लागायचे. (म्हणजे काही मंत्र आणि दान). रामानुजम आणि टिळक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भारतात एकाच छापाचा हिंदू धर्म

रामचंद्र
Tue, 10/29/2024 - 16:07 नवीन
भारतात एकाच छापाचा हिंदू धर्म नाही हे यावरूनही दिसते असे वाटते. आजही कटकला कार्तिक पौर्णिमेपासून सात दिवस बलियात्रा उत्सव साजरा होतो. शेकडो वर्षांपूर्वी घरटी उडिया कुटुंबातील एक पुत्र असे उडिया दर्यावर्दी आग्नेय आशियातील देशांमध्ये व्यापारनिमित्ताने या काळात निघत असत अशी समजूत आहे त्याला अनुसरून हा उत्सव आजही तिथे साजरा होतो. केरळमध्येही दर्यावर्दी परंपरा आहेच आणि तिथेही कट्टर शैवमताचे हिंदू आहेत. काही केरळी हिंदू राजांनी श्रीलंकेत हल्ले करून तिथेही आपली राज्ये स्थापन केल्याचे संदर्भ वाचायला मिळतात. एकंदरीत, सर्वच भारतभरातील हिंदू हे कूपमंडुक प्रवृत्तीचे, आत्मरत होते असे नाही. मात्र हे सार्वत्रिक उदाहरण नाही हेही खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

किती का प्रकारचचच्या हिंदू

चौकस२१२
Tue, 10/29/2024 - 18:46 नवीन
किती का प्रकारचचच्या हिंदू उपससना साधना असोत माझी हरकत येवढ्यालाच कि असे लोका नाच्या उत्सवात धवलाढवळ करू नये आणि हे काही वर्षांपूर्वी नवहते येथे , आता प्रत्येक अश्या सार्वजनिक किंवा खाजगी उत्सव करिताना आयोजकांना हि कटकट सहन करावी लागते आणि त्यापेक्षा गंभीर म्हणजे धमक्या आणि अप्रचार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

मग सर्व भारतीयांच्या नावाने

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/29/2024 - 21:09 नवीन
मग सर्व भारतीयांच्या नावाने कार्यक्रम करायचा नाही. आपल्या विचारसरणीच्या लोकांचा वेगळा समुह बनवून सण साजरे करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

तुम्हाला नक्की काय

चौकस२१२
Wed, 10/30/2024 - 04:51 नवीन
तुम्हाला नक्की काय म्हण्यायचंय ते कळतंय का? सर्व भारतीयांच्या नावाने कार्यक्रम ? तसे असतातच या शिवाय जसे येथे इस्लामिक कौन्सिल आहेत विवीध चर्चेस आहेत तसे हिंदू कौन्सिल या शिवाय बंगाली मराठी इत्यादी भाषिक माडले आहेत ... तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? हिंदू कॉन्सिल पदाधिकारी बहुतेक "ब्राह्मणेतरच " आहेत म्हणजे तिथे हि जातोयवादाचा आरोप करू शकत नाही नुसती खुसपट काढायची आपली वृत्ती सरळ दिसतोय आहे .. चालुद्या "नंगेको खुदा डरता है " तसेच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुठे त्या भुजबळांच्या नादी

सुबोध खरे
Tue, 11/12/2024 - 09:59 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादी लागताय? उथळ पाण्याला खळखळाट फार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

खरं बोललं की सख्या आईलाही राग

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/12/2024 - 13:18 नवीन
खरं बोललं की सख्या आईलाही राग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा