✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत हवी आहे,,,

भ
भम्पक यांनी
Mon, 08/19/2024 - 10:40  ·  लेख
लेख
साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय. तसे मी बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मेल केलाय पण त्यांचे उत्तर काही येईना. आता मिपाकरांनाच विचारतो कि आपल्या वाचनात हा लेख आला असेल तर कृपया त्याच्या लेखकाचे नाव कळवावे. माझ्या मते श्री . म. माटे हे ते लेखक असावेत . त्यांची काही पुस्तकेही मी मागवलीत पण त्यात तो लेख नाही. तरी मित्रांनो हि उकल करून माझ्या डोक्यात वळवळणाऱ्या किड्यास शांत करावे कारण गेल्या महिन्यापासून मी त्या मागे आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
मदत

प्रतिक्रिया द्या
2960 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

श्री म माटेच.

गवि
Mon, 08/19/2024 - 10:58 नवीन
श्री म माटेच. सहित्यधारा या त्यांच्या लेख संग्रहातून तो लेख घेतला आहे. दुवा: https://archive.org/stream/Balbharati/Series%202%20Std%207th_djvu.txt
  • Log in or register to post comments

बाबोव .....

भम्पक
Mon, 08/19/2024 - 11:35 नवीन
बाबोव ..... एका झटक्यात डोक्यातली पिरपिर शांत. धन्यवाद गवि जी.... काही मिनिटात तुम्ही किती दिवसांच्या प्रश्नाला मूठमाती दिली.... कृपया ,फटक्यात ओळखले कसे त्यावर थोडं सांगावे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बालभारती आणि त्यातले धडे,

गवि
Mon, 08/19/2024 - 11:55 नवीन
बालभारती आणि त्यातले धडे, त्याबद्दल असलेला नॉस्टॅल्जिया हा सामाईक धागा. त्यामुळे अधिक रस वाटून आठवणे अधिक शोधाशोध असे केल्यावर* सापडले पटकन. आता मी एक प्रश्न टाकतो. याच काळात एका कोणत्या तरी इयत्तेत एका लेखकाचा धडा होता. त्यात तो डॉक्टर असतो म्हणा किंवा तत्सम प्रसिद्ध प्रोफेशनल. आणि तो एकदा फुटबॉल खेळतो, त्यात बहुधा जखमी होतो म्हणा किंवा तत्सम काहीतरी. यातील सार असे की नेहमीचे करियर चालू असताना वेगळेच काहीतरी अनपेक्षित करायला जाणे यातील नावीन्य. हा धडा कोणाचा होता ते आठवत नाही. संदर्भ सापडत नाही. डॉ. अवचट असावेत की काय अशीही शंका येते. पण बाकी काहीच आठवत नाही. * बालभारती कंटेंट ऑनलाईन आर्काईव्ह रुपात उपलब्ध आहे हे आठवत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

या धड्याचा शेवट काहीसा असा

गवि
Mon, 08/19/2024 - 12:00 नवीन
या धड्याचा शेवट काहीसा असा होता. तंतोतंत नव्हे पण आशय. बातमीचा मथळा / शीर्षक हा डॉक्टरांना दुखापत असा न असता डॉक्टरांचे अभिनंदन असा असायला हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बालभारती आणि त्यातले धडे, त्याबद्दल असलेला नॉस्टॅल्जिया हा सामाई

भम्पक
Mon, 08/19/2024 - 12:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुमच्या प्रतिसादात स्मायली

गवि
Mon, 08/19/2024 - 12:06 नवीन
तुमच्या प्रतिसादात स्मायली किंवा टोकेरी कंस असतील तर ते काढून टाकून पुन्हा प्रकाशित करा. टोकेरी कंसामुळे टेक्स्ट एच टी एम एल टॅग सारखे समजले जाते आणि दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा