शशक- औताचा बैल
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सकाळची वेळ. बंडू शाळेत जाताना माझे लाड केल्याशिवाय पुढे जातच नाही. मालकही रोज पाठीवर थाप मारणारच, दिमतीला गडी ठेवलाय.मी माझ्या बापासारखाच शर्यतीचा बैल आहे.या मालकाला माझ्या बापाने भरपूर बक्षिसे मिळवून दिली म्हणे.
पण बरेच दिवस झाले नेहमीसारखा खुराक मिळत नाहीये. मालक कायतरी बोलत होते. बैलगाडा शर्यत ,कोर्टाचा निर्णय, औताला जुंपूया.
संध्याकाळची वेळ.मालक मला शेतात घेऊन आलेत. मस्त वारा वाहतोय. अरेच्चा!!हे काय?चारी पाय बांबूला बांधून मला खाली पाडले. अचानक खाट खाट आवाज आले. सण्णकन डोक्यात कळ गेली आणि डोळ्यापुढे अंधारी आली. मोठ्याने ओरडायचे होते, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत. फक्त डोळ्यातून पाणी वाहत राहिले. सगळे संपले होते. आता मी राहिलो फक्त औताचा बैल.
प्रतिक्रिया
माणूस बनाम बैल...
शीर्षकामुळे कथा 'औताच्या बैला'बद्दल असल्याचे आधीच ठाऊक झाले
धन्यवाद कर्नल काका आणि चित्रगुप्तजी!!
छान! शशक आवडली. शर्यतीचा बैल
जुना इंग्रजी-मराठी शब्दकोष आणि गूगल ट्रान्स्लेट यातील फरक बघा
बाब्बो!!
छान शशक.... आवडली.
दुर्दैवाने खरे आहे. बैल या
मिपावर मी पूर्वी या विषयावर
मिपावर मी पूर्वी या विषयावर एक लेख लिहिला होता
कधी थांबणार हा क्रूरपणा?
लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद!!
हा अजून एक उत्कृष्ट लेख
आधी शशक समजली नव्हती, बैलावर
परिणामकारक कथा
'शर्यतीचा बैल' हे शीर्षक दिले असते तर ...