✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक माणूस....

ब — बाजीगर, गुरुवार, 03/10/2022 - 15:25
सर्व भ्रष्टाचा-यांच्या गर्दीत मारेक-यांच्या गारदी त घराणेशाहीच्या चाटूकारांत हिंदूविरोधांच्या बाटूकारांत खोटारड्यांच्या जहरात फंद फितूरांच्या शहरात न्यूयाॅर्क टाईम्सच्या पेड लीस्टवर अतिरेक्यांच्या हिट लीस्ट वर घरभेदींच्या द्वेषात ही शिव्याशापांच्या त्वेशात ही एक माणूस आपल्या कामांमुळे कसल्या उंचीवर जातो.. 550 वर्षांचा रामजन्मभूमी विवाद सोडवला 70 वर्षांचा काशमीर 370 विवाद सोडवला नोटाबंदी चा वादग्रस्त निर्णय राफेल खरेदीचा अभूतपूर्व निर्णय बालाकोट air-strike घरात घूसून ठोकला. निरपराधांनी घेतला काश्मीरात श्वास मोकळा GST ची अंमलबजावणी करा make in India चा नारा नवकल्पना start up ला बळ काळ्या पैसा पळवाट आवळ करोना लसींचा जागतिक उच्चांक ताणणे विद्यार्थ्यांना युद्ध थांबवून घरी आणणे तिरंगा दाखवल्यास जीव घेणा-या काश्मीर पासून, तिरंगा दाखवल्यास जीवनदान मिळण्यापर्यंत हिंदूस्तान ची शक्ती वाढवणा-या. एक माणूस आपल्या कामांमुळे कसल्या उंचीवर जातो..

प्रतिक्रिया द्या
5277 वाचन

💬 प्रतिसाद (12)

क्या बात है बाजीगरजी.

प्रचेतस
Fri, 03/11/2022 - 09:57 नवीन
क्या बात है बाजीगरजी. जबरदस्त कविता.
  • Log in or register to post comments

या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे .

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/11/2022 - 20:14 नवीन
या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ... सावध हरणी सावध गं ! हे गीत आम्हाला आज आठवलं . नवकवींची करील कुणी पारध गं! - असा पुढचा आशयही त्यातून डोकावला . ल्लुल्लुल्लु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काही निर्णय चुकतात, काही

गवि
Fri, 03/11/2022 - 11:49 नवीन
काही निर्णय चुकतात, काही बरोबर येतात. एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून निर्णय घेणे हेच मुळात धाडस आणि कौतुकास्पद असते. चुकलेल्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी घेणे, चुका लक्षात आल्या की मान्य करणे, बदल करणे.. हे सर्व गुण फार महत्वाचे ठरतात. जो काहीच कठोर ठाम निर्णय घेत नाही त्याचे निर्णय चुकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या बाबतीत त्या माणसाचे कौतुक व्हावेच.
  • Log in or register to post comments

+१११११११११

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 03/11/2022 - 17:02 नवीन
जो निर्णय घेतो त्याचेच निर्णय चुकू शकतात. कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद

बाजीगर
Fri, 03/11/2022 - 12:00 नवीन
सहमत गवि यांच्या म्हणण्याबरौबर. धन्यवाद प्रचेतस जी धन्यवाद गवि जी
  • Log in or register to post comments

कविता छान आहे ..

यश राज
Fri, 03/11/2022 - 13:01 नवीन
वर गवि म्हणतात त्याच्याशी पूर्ण सहमत
जो काहीच कठोर ठाम निर्णय घेत नाही त्याचे निर्णय चुकण्याचा प्रश्नच येत नाही.
हे वाक्य फार महत्त्वाचे. निर्णय घेणे खूप आवश्यक असते.
  • Log in or register to post comments

+1

कर्नलतपस्वी
Fri, 03/11/2022 - 13:42 नवीन
निर्णय घेतले तरच चुक का बरोबर कळणार. निर्णय क्षमता ही नेतृत्वाची खरी कसोटी. निर्णय घेण्यासाठी योग्य सुचनाप्रणाली आणी ती यशस्वी पणे राबविण्यासाठी योग्य माणसांची निवड हे फार महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

सुंदर

सुरिया
Fri, 03/11/2022 - 18:37 नवीन
वाऊ, ह्या अप्रतिम विश्र्वगौरव रचनेला मिपाच्या मुखपृष्ठावर कायम तहहयात स्थान द्यावे ही विनंती. सोबत डेली ऑनलाईन फुले वाहण्याची सोय असेल तर सोने पे सुहागा. तोपर्यंत एक वाचन एक फुल असेही समजू.
  • Log in or register to post comments

बाकी ... भक्त संप्रदायी

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/11/2022 - 20:15 नवीन
बाकी ... भक्त संप्रदायी प्रासादिक काव्य आवडले
  • Log in or register to post comments

काशी काॅरीडाॅर ,पंढरपूर प्रस्तावित प्रशस्त मार्ग याचा उल्लेख

बाजीगर
Fri, 03/18/2022 - 23:36 नवीन
राहीलाच... आठवले नाही तेव्हा हे काम.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता !

प्रसाद गोडबोले
Sat, 03/19/2022 - 11:08 नवीन
सुंदर कविता ! बाकी काहीही असेल पण कलम ३७० हटवणे , राममंदिर बांधणे आणि काशीविश्वनाथ मंदिराचा पुनरेकवार जीर्णोध्दार करणे ह्या तीन लोकोत्तर कामांमुळे मोदींनी आपले स्थान इतिहासात निश्चित केलेले आहे ह्यात शंका नाही ! आता आस आहे मथुरा कृष्णजन्मभुमीची ! तेही जुळुन येईल असा ठाम विश्वास वाटायला लागला आहे ! बाकी मोदी द्वेषापायी "भक्त" ह्या पवित्र हिंदु शब्दाचे विद्रुपीकरण करण्यामुळे स्वयंघोषित धर्मसुधारक असल्याचा आव आणाणार्‍या लिब्रांडुंचे सिक्युलॅरिझम चे बुरखे टराटरा फाटले हे एक उत्तम झाले ! #कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ . =))))
  • Log in or register to post comments

धन्यवाद मार्कस् आरीलियस जी

बाजीगर
Sun, 03/20/2022 - 01:24 नवीन
खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा