✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सरतील कधी शोष शोषितांचे!

अ
अरुण मनोहर यांनी
गुरुवार, 12/03/2020 - 15:53  ·  लेख
लेख
एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात.. भाग - १ उपोद्घात कोणास ठाऊक, कदाचित विधात्यानेच घडविले असेल. डार्विनने शब्दांत मांडले येवढेच. प्राणीजातिलाच कशाला बदनाम करायचे? निसर्ग सुद्धा टिकू न शकणारे मोडून तोडून नवी निर्मिती घडवित असतो. जमिन प्रबळ आहे तोवर घट्टपणे मांड टाकून खदखदत्या अंगाराच्या छाताडावर बसून राहते. पण ती जरा कमी पडली की ज्वालामुखी तिच्या चिथड्या करून अग्नीलोळांचे राज्य तिथे स्थापन करतो. मैलोंमैल वाहणाऱ्या नदीला सागर पूर्णपणे गिळून स्वाहा करतो. सागराच्या थंडपाण्यात वन्ही आपले साम्राज्य स्थापून पाण्याला उकळी आणतो. ही पूर्ण दुनिया एक प्रचंड शक्तियज्ञ आहे. हा यज्ञ फक्त दुर्बळ अजाबळीच स्वीकारतो. यज्ञात व्याघ्रबळी दिल्याचे ऐकले आहे का कोणी? बळी तो कान पिळी बुळीच जातात बळी मोठे मासे छोटे मासे खाद्यशृंखलांचे फासे सामर्थ्यवानच खासे दुर्बळ टाकती उसासे दुनियेत दोनच जाती शोषित, व शोषणकर्ती क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
2160 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

हम्म.

शा वि कु
गुरुवार, 12/03/2020 - 22:55 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

रोचक!

चांदणे संदीप
Fri, 12/04/2020 - 11:37 नवीन
पुभाप्र! सं- दी - प
  • Log in or register to post comments

रो च क ! पुभाप्र!

चौथा कोनाडा
Fri, 12/04/2020 - 14:50 नवीन
रो च क ! पुभाप्र!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा