✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेंगोळी

ब
बबु यांनी
गुरुवार, 04/02/2020 - 15:33  ·  लेख
लेख
लॉक आऊटच्या दिवसात भाजीपाल्याची कमतरता असताना काय करायचे हा गृहिणींना पडणारा एक यक्षप्रश्न. आमच्या सौने आज हुलग्याची शेंगोळी करून तिच्या नियोजन कौशल्याची पावती दिली. शेंगोळी, बाजरीची भाकरी, पापड, कांदा, लसणाची चटणी हा मेनू म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चाकरमान्यांसाठी मेजवानीच असते. माझ्या लहानपणी ऐन उन्हाळ्यात बैलजोडीने नांगरट केली जायची, त्या दिवसांची आठवण येते. रहरखत्या उन्हात राबणाऱ्या घरधन्यासाठी कारभारीण जी न्याहारी घेऊन जायची त्यात शेंगोळी आवर्जून असत. प्रथिनांचा पुरवठा करणारे मोड आलेले हुलगे, मठ यांचाही समावेश जेवणात असे. प्रत्येकाचे लहानपण म्हणजे संस्कारांची एक वाकळ किंवा गोधडी असते. सामाजिक स्तर किंवा संस्कृती या अनुसार जिभेवरही काही संस्कार होतात. आमचे एक मित्र गमतीने म्हणायचे, "आपण सारे खलगोटे ". त्यांचा संकेत अर्थात कोंबडीचे अथवा मटणाच्या कालवणाकडे असायचा. तर व्हाट्स अप वर कार्यरत असणाऱ्या गृहिणींना एक नम्र विनंती. फर्माईश येण्या अगोदरच शेंगोळीचा बेत होईन जाऊंद्या. काय?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
2096 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

पाकृ टाका की..

मोदक
गुरुवार, 04/02/2020 - 15:38 नवीन
पाकृ टाका की.. शेंगोळी म्हणजे व्हेज रस्सा उकळत असतना त्यामध्ये डाळीच्य पिठाच्या लांबट रिंग / कडबोळ्या सोडून त्या शिजवून घेणे इतकेच माहिती आहे.
  • Log in or register to post comments

हे मितानचे

सस्नेह
गुरुवार, 04/02/2020 - 16:17 नवीन
हे मितानचे उकडशेंगोळे उकडशेंगोळे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा