भाग १ जब वी मेट - नाशिकाचा अत्तरवाला -कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस!
भाग १ जब वी मेट
काही दिवसापुर्वी म. टा. मधे जब वी मेट या सदरासाठी काही जीवनात घडलेल्या आठवणी लिहा म्हणून म्हटले गेले होेते. तो लेख पाठवून आता महिना झाला. कदाचित ते छापतील असे नाही असे वाटून इथे सादर करत आहे.
अचानक भेटीनंतर त्या एकमेकांचे जीवन कसे बदलले. हे सांगणाऱ्या आवडत्या सिनेमाची आठवण आली म्हणून चित्र सादर -
*कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस!*
नाशिक येथे एका स्नेह्यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यात स्नेह भोजनासाठी वाट पाहत असताना एक जण सुगंधी तेलातील काही वस्तू आकर्षक पाकिटातून विकत होते. माझ्या पर्यंत त्यांच्या वस्तू हातोहात संपल्या. जवळपास राहात असल्याने 'आत्ता आणतो' म्हणून ते गायब झाले. बराच वेळ झाला ते का आले नाहीत म्हणून एकांनी मला बाईकवरून त्यांच्या घरी नेले. नेमके कोणी घरी भेटायला आल्यामुळे ते पटकन येऊ शकले नव्हते. मी पटापट पैसे देऊन सुगंधी पॅकेट घेऊन परतताना ते म्हणाले, 'आपले नाव नाही कळले? मी माझे नाव सांगितले. तेव्हा त्यांनी माझा हात हातात घट्ट धरून म्हटले, 'विंग कमांडर शशिकांत ओक? प्रत्यक्ष माझ्या घरी चालत आलेत? माझा डोळ्यावर विश्वास होत नाहीये हो!'' अहो तुम्हाला भेटायला मी काय केले नाही? पुस्तकातील पत्ते, फोन नंबर शोधून वरून मुंबई, नाशिक मधून खेटे मारले. तुमच्या कोरेगाव पार्क मधील फ्लॅटवर चकरा मारल्या. पण तुमची गाठ पडली नाही! आणि आज तुम्ही माझ्या घरात आपणहून मला भेटायला आला आहात! काय हा योगायोग!' 'असे काय कारण होते म्हणून तुम्ही मला शोधत होतात?' मी थक्क होऊन विचारले. यावर ते म्हणाले, 'तुमचे 'नाडी भविष्य - एक चक्रावून टाकणारा चमत्कार' पुस्तक वाचून होतो. चेन्नईच्या शंकर नेत्रालयात डोळ्याला इजा होऊन ठार अंध झालेल्या मित्राचा सहकारी म्हणून आलो होतो. तज्ज्ञांनी त्याला दृष्टी येणे शक्य नाही असे म्हटल्यावर विषण्ण होऊन मरीना बीचवर फिरत होतो. तेंव्हा तांबरम गावातील नाडी केंद्रात तुम्ही नाडी भविष्य पाहिल्याचे आठवले. तिथे मित्राची पट्टी मिळाली. 'अंधत्व आल्याने जीवनात अंधार वाटून तुला तुझा मित्र भविष्य पहाण्यासाठी घेऊन आला आहे! 'काळजी करू नकोस. सांगतो ती शांती-पूजा कर. कठीण शस्त्रक्रिया पार पडून पुन्हा दिसायला लागेल. नंतर तू हे विसरूनही जाशील की तुला पूर्ण अंधत्व कधी आले होते म्हणून!' माझ्या मित्राला दृष्टी मिळून तो पुन्हा आनंदी जीवनयापन करू लागला. नाडी भविष्यातील ते कथन वेळीच ऐकून शांती-पुजा करून झाल्याने आम्हाला अगस्त्य महर्षींनी जो मानसिक आधार दिला. त्यामुळे त्यांचे आभार मानायचे होते. अगस्त्य महर्षींना भेटणे तर शक्य नाही. आपल्या पुस्तकातील माहितीमुळे नाडी महर्षींचे मार्गदर्शन शक्य झाले. हे सर्व आपल्याला प्रत्यक्ष भेटून सांगायचे होते म्हणून आपला शोध घेत फिरलो. निराश होऊन नाद सोडून दिला. मुंबईतील नोकरी सोडून नाशिकमध्ये हा व्यवसाय सुरू केला. आणि आज अचानक तुम्ही मला शोधत माझ्या घरी आला आहात...! माझा हात हातात धरून गहिवरत ते बोलत होते. माझ्या डोळ्यातून अश्रु वाहात होते. 'हे महर्षी, आपली लीला अगाध आहे! योग्य वेळ आली की अशक्य ते शक्य करायला तुम्ही प्रेरित करता! जीवनात निराशा, असंतोष असेल तर तो दूर करता! उच्च विचारांच्या कार्याला प्रोत्साहन देता! आपल्याला प्रणाम!' मित्रा, तू हे कथन प्रामाणिकपणे सांगत आहेस ते ठीकच आहे. मी शोधक वृत्तीचा असल्याने सर्व घटना ज्यांच्या संदर्भात झाल्या त्यांच्याकडून ऐकून घटनेची खात्री करून घेणे मला आवश्यक वाटते. तुम्ही मला त्यांचा मो क्र देता का? ... ... 'हॅलो, आपण कोण?... बरं बरं बरं... हो तो मित्र माझा.... माझे शंकर नेत्रालयात ऑपरेशन झाले?... अं?... हो खरच की!... फार वर्षे झाली त्याला... आता मला व्यवस्थित दिसते. काहीच प्रॉब्लेम नाही! .... *जब वी मेट* !वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
असाच अनुभव
खरे आहे
छान ! पुढचा भाग येउ द्यात.
धन्यवाद
खूप छान!! अत्तर वाल्यांचे नाव
आपली फर्माईश अगदी अपेक्षित आहे.
धन्यवाद
त्यांच्या मित्राची दृष्टी
सांगतो ती शांती-पूजा कर. कठीण
>> शस्त्रक्रिया followed by
नाही.
A, followed by B म्हणजे बी
नाडी ग्रंथ भविष्य पहायची सोय
नाडी ग्रंथ भविष्य पहायची सोय
>> त्यांच्या बरोबर बोलून
भेटीची वेळ, तारीख, फी, वगैरे
मित्रा लिहिलेले
हा हा हा