डोंगरप्रेम

अनुप देशमुख's picture
अनुप देशमुख in जनातलं, मनातलं
24 Feb 2019 - 10:51 pm

मावळतीला लालीच्या साक्षीनं ती दोघच डोंगर उतरत होती, दिवसभराचा शीणवटा दोघांनाही जाणवत होता.
डोंगराची उतरण दोघांनाही एकमेकांचा स्पर्श करण भाग पाडत होती. अखेरच्या टप्प्यावर डोंगरानं त्यांना अजून जवळ येण भाग पाडलच. शेवटच्या पायरीवरून ती जवळजवळ उडी मारून डोंगरापासून विलग होत म्हणाली
ती : ए झाला यार ट्रेक पूर्ण!
तो : हम्म!
ती : काय झालंय म्हसोबा?
तो : काहीं नाही.
ती : तू कुठे जाणार आहेस आता.
तो : तळेगाव. मित्राकडे.
ती : का बसायचा प्लॅन आहे का. ह्या ह्या ह्या!
तो : काहीही हा तू पण!
ती : नाही, तुच्यासोबत बसणार नसशील तर माझ्या सोबत बस. कॉफीला.
तो : क्काय?
ती : अरे गधड्या डेट ला विचारतेय रे मी.
तो : माझी डेट आधीच ठरलीये, त्याच्याच सोबत!

निघताना त्याच्या गाडीवर ती सकाळीपेक्षा जास्तच लांब बसली. मागे डोंगर चंद्राच्या हातात हात घेऊन त्याच्याच साक्षीने फुललेलं नवीन दुनियेतल प्रेम बघत होता.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

कथेच्या शीर्षकाचा नेमका अर्थ काय?

अभ्या..'s picture

25 Feb 2019 - 11:27 am | अभ्या..

बहुतेक ह्याचा अर्थ "डोंगराचे तळेगावच्या डोंगरावर प्रेम असते, कुणा टेकडीवर नसते"

अनुप देशमुख's picture

26 Feb 2019 - 10:29 pm | अनुप देशमुख

डोंगराच्या साथीने फुललेल प्रेम

वकील साहेब's picture

25 Feb 2019 - 12:00 pm | वकील साहेब

हा हा हा

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2019 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

शंभर शब्दांत बसवली असती तर छान शशकसुद्धा झाली असती.

अनुप देशमुख's picture

26 Feb 2019 - 10:30 pm | अनुप देशमुख

पण स्पर्धा संपली होती

Nitin Palkar's picture

25 Feb 2019 - 2:23 pm | Nitin Palkar

लिखाणात मजा आहे हो तुमच्या अनुपराव!

अनुप देशमुख's picture

26 Feb 2019 - 10:33 pm | अनुप देशमुख

हुरूप वाढवल्याबद्दल

ज्योति अळवणी's picture

25 Feb 2019 - 6:20 pm | ज्योति अळवणी

नीट नाही कळली

शब्दानुज's picture

25 Feb 2019 - 10:44 pm | शब्दानुज

तो 'तो' असल्याने त्याचे तिच्यावर नाही तर दुस-या तो सोबत 'तसले' जमले आहे.
बाकी हे 'नव्या जगातले' वगैरे काही नाही. फक्त यास मान्यता आत्ता काहीप्रमाणात मिळू लागली आहे.

अनुप देशमुख's picture

26 Feb 2019 - 10:37 pm | अनुप देशमुख

हि कथा डोंगराच्या दृष्टीकोणातून लिहिली आहे. संस्कृतीचा एक आद्य घटक या नात्याने त्याच्यासाठी हे नात नवीनच आहे आणि उत्क्रांतीच्या नियमाने त्यानेही ते स्वीकारलंय. आपण तर मानव आहोत त्यापासून हे शिकावं हीच इच्छा.

टर्मीनेटर's picture

27 Feb 2019 - 7:17 pm | टर्मीनेटर

माफ करा, पण खरंच काही कळलं नाही!

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2019 - 9:01 pm | चौथा कोनाडा

भारी, आवडली कथा !
(स्वगतः अच्छा गे प्रकरण नाहीय तर ! तळेगाव. तो मित्र म्हंजे डोंगरच ! आणि डेट त्याच्या सोबतच ..... म्हंजे पुन्हा ट्रेकिंग !)