✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख यांनी
Sat, 02/02/2019 - 06:45  ·  लेख
लेख
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
542106 वाचन

💬 प्रतिसाद (783)

प्रतिक्रिया

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 02/02/2019 - 09:25 नवीन
कर भरण्याची पातळी वाढवली आहे , पण नेमके काय , माहीत नाही,
  • Log in or register to post comments

सहसा अंतरिम अर्थसंकल्पात मोठे

नगरीनिरंजन
Sat, 02/02/2019 - 11:11 नवीन
सहसा अंतरिम अर्थसंकल्पात मोठे निर्णय घेतले जात नाहीत. पण विधिनिषेध बाळगायचा नाही असं ठरल्यावर काही म्हणण्यासारखे उरत नाही. https://m.economictimes.com/news/politics-and-nation/view-why-this-budget-is-unethical-and-inequitous/articleshow/67792507.cms
  • Log in or register to post comments

विधिनिषेध बाळगायचा नाही असं

डँबिस००७
Sat, 02/02/2019 - 11:50 नवीन
विधिनिषेध बाळगायचा नाही असं ठरल्यावर काही म्हणण्यासारखे उरत नाही.... विधिनिषेध बाळगायचा नाही हा कॉंग्रेसचाच हक्क आहे अस काही आहे का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे

lakhu risbud
Sat, 02/02/2019 - 22:13 नवीन
सोप्या मराठीत यालाच "कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे" असेही म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी

नगरीनिरंजन
Sun, 02/03/2019 - 03:26 नवीन
म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी नाकारलं. हे वेगळे असतील असं वाटलं होतं; पण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

गेल्या चार-साडेचार वर्षापासून वाजणारी तीच घिसीपीटी रेकॉर्ड...

प्रसाद_१९८२
Sun, 02/03/2019 - 10:24 नवीन
हणून तर कॉंग्रेसला लोकांनी नाकारलं. हे वेगळे असतील असं वाटलं होतं; पण... --- हे तुम्हाला किती लोकांनी पर्सनली येऊन सांगितले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

बातम्या वाचत असतो मी.

नगरीनिरंजन
Mon, 02/04/2019 - 03:53 नवीन
बातम्या वाचत असतो मी. तुमच्यासाठी काय वेगळं आहे तेही कळतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

अंतरिम अर्थसंकल्प

ट्रेड मार्क
Mon, 02/04/2019 - 04:12 नवीन
२०१४ साली काँग्रेसने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता तो कदाचित तुमच्या विस्मरणात गेला असेल. या अंतरिम अर्थसंकल्पात काँग्रेसने कुठले बदल केलेत हे बघा. बाकी विधिनिषेध बाळगला नाही म्हणजे काय? गरिबांना आणि निम्न मध्यमवर्गीयांना फायदा होईल असे बदल सुचवले आहेत. फक्त त्यामुळे परिणाम काय होतील हे गोयल साहेब भाषण करत असताना रागाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी नाकारलं. हे वेगळे असतील असं वाटलं होतं; पण... काँग्रेसला २०१४ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडताना विधिनिषेध पाळला नाही म्हणून नाकारलं असं म्हणताय? अति झालेली भ्रष्टाचाराची प्रकारणे, रिमोटवर चालणारे पंप्र, पॉलिसी पॅरालिसिस यासारखी बरीच कारणे होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हे वेगळे...

mayu4u
Sun, 02/03/2019 - 13:30 नवीन
... आहेतच. चष्मा काढलात तर दिसेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

शेतकऱ्यांना सवलती

कंजूस
Sat, 02/02/2019 - 11:18 नवीन
शेतकऱ्यांना सवलती देण्यापेक्शा धान्यच का नाही देत?
  • Log in or register to post comments

शेतकऱ्याने आज पर्यन्त कधी धान्य ची मदत मागितली आहे का ?

ट्रम्प
Sat, 02/02/2019 - 11:47 नवीन
अहो जगाच्या पोशिंदया ला धान्य द्या म्हणताय तुम्ही !!! त्यांना किमान गरजा मध्ये राहण्याची सवय असते पण शेतात पिकवलेल्या अन्नधान्य भाजीपाला ला योग्य भाव न भेटणे , खासगी सावकारी कर्ज आणि नैसर्गिक आपत्ति मुळे मेटाकुटि ला आलेला आहे तो . भाजीपाला , फळ प्रकिया उद्योग आणि वितरण व्यवस्था खेडोपाड़ी स्थापन न झाल्या मुळे सुद्धा सरकार च्या भिकेकड़े आशे ने पाहण्याची वेळ त्यांच्यावर येते . पण एकंदरीत भाजपा सरकार ने सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत . असू द्या , भविष्यात शेतकऱ्यांनां भाजप स्वतःच्या पायावर उभे होण्यास मदत करेल अशी खात्री आहे . म्हणूनच पुन्हा एकदा भाजप सरकारच येवो !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

शेतकरी टॉमेटो कांद्याला भाव

डँबिस००७
Sat, 02/02/2019 - 12:12 नवीन
शेतकरी टॉमेटो कांद्याला भाव नसल्याने रस्त्यावर फेकतांना आपण बातम्यात खुपदा पाहीला असेल पण जो भाव शेतकर्याला मिळतो तितका स्वस्त माल कोणत्याही बाजारपेठेत ग्राहकाला मिळत नाही !! याचा अर्थ बाजारा असलेल्या मालाच्या किमतीतुन आपला खर्च व नफा व्यापारी काढुन घेत असतात. उरलेली किंमत शेतकर्याला मिळते ! शेतकर्याला स्वतःचा माल स्वतः विकल्या शिवाय पर्याय नाही !! असा प्रयत्न चंद्राबाबु नायडुंनी १० वर्षापुर्वी केला होता! त्यावेळेला रयत बाजार स्थापन केले होते जिथे शेतकरी आपला माल घेउन ग्राहकाला विकत असत ! ह्या योजनेला शेतकर्यांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला होता ! भाजपा सरकार ने ह्याच धर्तीवर योजना बनवुन सत्यात उतरवलेली आहे !! शेतकरी आपला माल कुठेही घेउन न जाता, आपल्या शेतातुनच विकु शकेल !! हे सर्व ENAM (Electronic National Agri Market) ह्या योजने अंतर्गत आहे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

ENAM (Electronic National Agri Market) ह्या योजने अंतर्गत आहे !

Nitin Palkar
Sat, 02/16/2019 - 21:19 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

भाजप चे विधिनिवेश गुंडाळने

ट्रम्प
Sat, 02/02/2019 - 11:26 नवीन
भाजप चे विधिनिवेश गुंडाळने काँग्रेस च्या बरोबरीला आले की भाजप सरकार हाकलुन देवू !! त्यात क़ाय अवघड आहे ? म्हणजे त्या हिशोबाने अजुन किमान 20 / 25 वर्ष तरी भाजप ला संधी द्यावी लागेल .
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 02/02/2019 - 15:06 नवीन
पाच लाख किंवा कमी उत्पन्न असणार्यांना आता अच्छे दिन येणार हे बरे झाले. सरकार वित्तीय तूट कशी भरून काढणार ह्याचा विचार आता न केलेला बरा असे ह्यांचे मत.निवडणूक संपली रे संपली आणी नवे सरकार आले की मग पेट्रोल्/डिझेलचे भाव वाढणार ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

भाजपा सरकारने जबर दस्त बजेट

डँबिस००७
Sat, 02/02/2019 - 15:08 नवीन
भाजपा सरकारने जबर दस्त बजेट आणल्याने भ्रष्ट कॉग्रेसच्या सपोर्टर्स करणार्या लोकांच्या पोटात भीतीने गोळा येऊन प्रा कवी यांनी काहीही बडबडायला सुरुवात केलेली दिसत आहे.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी ..

विशुमित
Sat, 02/02/2019 - 15:19 नवीन
अगदी अगदी .. एवढा मोठा गोळा आला आहे की ऑपरेशन करुन काढवा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

आदिलशहाचे हेर आंतरजालावर सापडतात का

lakhu risbud
Sat, 02/02/2019 - 22:17 नवीन
त्या तुमच्या IT Cell वाल्यांना ते आदिलशहाचे हेर आंतरजालावर सापडतात का ते बघायला सांगा की ! तेवढंच दाव्याच वजन वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

बर बर सांगतो..!

विशुमित
Sun, 02/03/2019 - 00:05 नवीन
बर बर सांगतो..! === सायकल घेतली की काय नविन?? एकाच जागेवर गिरक्या मारताय म्हणून विचारले..! === तुंप खाऊन पोटावर साचलेली चरबीबाबत आपले मौलिक मत समजून घेण्यासाठी उत्सुक आहोत. कधी पांयडल मारताय मग??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

रॉबर्ट वदरा जामीन मंजूर

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 02/02/2019 - 18:39 नवीन
भाजपे कलकलाट करत असलेल्या केसमध्ये रॉबर्ट ना जामीन मंजूर, भाजपाच्या काळात , सरकार गँभीर आरोप ठेवते , अन लोक जामिनावर सुटतात उदा , रॉबर्ट , तेलतुंबडे , कन्हैया मग बाइज्जत बरी होतात , उदा सलमान , शाहरुख, मग भक्त शहामृग होतात , नशीब , कसाब, अफजलला काँग्रेसने फाशी दिली नैतर आज भाजप काळात बाहेर आले असते
  • Log in or register to post comments

याकूब मेमन आठवतो का? -गा.पै.

गामा पैलवान
Sat, 02/02/2019 - 22:02 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

व्यावसाईक आणि वैयक्तिक

lakhu risbud
Sat, 02/02/2019 - 22:20 नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. नको मोगाराया अन्त आता पाहु !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

अरेच्चा

ट्रेड मार्क
Sun, 02/03/2019 - 07:21 नवीन
मोदी फॅसिस्ट आहेत म्हणून इतका आरडाओरडा करतात. मग त्यांचे विरोधी असणाऱ्याना कसे काय मोकळे सोडले जाते? सीबीआय तर मोदींच्या हाताशी आहेच, मग या सगळ्यांना पकडून तुरुंगात का नाही घातले बरं? नशीब , कसाब, अफजलला काँग्रेसने फाशी दिली काँग्रेसने फाशी दिली होय. आम्हाला वाटायचं कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते आणि प्रशासनाला त्याची अंमलबजावणी करायला लागते. काँग्रेसच्या काळात कोर्ट स्वतंत्रपणे काम करायचं असे म्हणतात, म्हणजे कोर्टाच्या या निर्णयात काँग्रेसचा काही हात नसणार. अफझल गुरूच्या फाशीविरोधात कोणी प्रोटेस्ट केले होते? अफझल तेरे कातिल जिंदा है म्हणून कोणी घोषणा दिल्या आणि त्यांचे समर्थन कोणी केलं होतं? याकूब मेमनला वाचवण्यासाठी किती प्रयत्न कोणी केले? रात्री कोर्ट कोणी उघडायला लावले? त्याही पेक्षा मोठा प्रश्न अतिरेकी एवढे आत येऊन विध्वंस करतात याची जबाबदारी तत्कालीन सरकारवर का नाही? अतिरेकी हल्ले, बिनबोभाट चाललेली घुसखोरी, तयार झालेले नक्षली आणि अतिरेकी ही सगळी काँग्रेसचीच तर देण आहे. बाकी तुम्हाला घोटाळेबाज, देशाविरोधात घोषणा देणारे आणि अतिरेकी यांच्यातला फरक समजावा अशी देवाकडे प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

...

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 07:29 नवीन
देशाविरुद्ध कुणी कुठे घोषणा दिल्या ? मोदी सरकारने त्यांना पकडले ना , कोर्टाने शिक्षा दिली की नाही ? की नेहमीप्रमाणेच फोटोशॉप बातमी अन फेक व्हिडीओ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

काळे मांजर

ट्रेड मार्क
Sun, 02/03/2019 - 07:38 नवीन
ही बातमी नजरेआड केली वाटतं? का २०१९ मध्ये काँग्रेस सरकार आलं तर सगळे चार्जेस रद्द होतील याची खात्री आहे? लिंक मध्ये दिलेल्या वृत्तपत्रावर विश्वास नसेल तर गुगलून बघा. हां आता वायर किंवा स्क्रोल वगैरेवर किंवा ध्रुव राठी च्या तुनळी च्यानलवर ही बातमी मिळणार नाही पण बाकी सर्व मुख्य वर्तमानपत्रात ही बातमी मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

कुठली बातमी

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 07:49 नवीन
त्या लिंकेत काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

...

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 07:48 नवीन
देशाविरुद्ध कुणी कुठे घोषणा दिल्या ? मोदी सरकारने त्यांना पकडले ना , कोर्टाने शिक्षा दिली की नाही ? की नेहमीप्रमाणेच फोटोशॉप बातमी अन फेक व्हिडीओ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

ब्लैककैट +111111111

ट्रम्प
Sun, 02/03/2019 - 11:00 नवीन
एकदम बरोबर , भाजप सरकार नवखे असल्यामुळे त्यांना ' ते ' प्रकरण व्यवस्थित हताळता आले नाही आणि गल्लीतले फाटके पुढारी होण्याची लायकी असणारे देशपातळीवर चमकले !!! पण काहीही असो त्या घटनेचा काँग्रेस ला काडीमात्र ही फायदा झाला नाही , कारण फाटक्यांच्या विचारसरणी चे ' लोक ' भारतात खुप कमी आहेत . पर्रिकर प्रकरणात त्या दिवशी ब्लैककैट ने सुद्धा रागा निषेध केला होता याचा अर्थ ब्लैककैट ची सदसद्विवेक बुद्धि अजुन शाबित आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

नशीब , कसाब, अफजलला

डँबिस००७
Sat, 02/02/2019 - 22:28 नवीन
नशीब , कसाब, अफजलला काँग्रेसने फाशी दिली अरे व्वा , मग तुमच्या लाडक्या चिदंबरमला अस का वाटल की काँग्रेसने अफझल गुरु ला फाशी देण्यात चुक केली. ईतकच नव्हे तर तुमच्याच लाङक्या शशी थरुर ला तर पुढे जाऊन अस वाटल की अफझल गुरुला फाशी देण म्हणजे देशाच्या सरकारनेच मर्डर करणे !! https://www.hindustantimes.com/india/grave-doubts-about-afzal-s-involvement-in-parl-attack-chidambaram/story-i1qk7FbuAXYZIMoqioDCaM.html https://www.indiatoday.in/india/story/meanwhile-congress-forgets-it-hanged-afzal-guru-285420-2015-07-30 आता ह्यावर मोगा खान कडे काही बोलायला नसेलच पण पिंक टाकायला विसरणार नाही !!
  • Log in or register to post comments

ती त्यांची वैयक्तिक मते होती

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 00:08 नवीन
ती त्यांची वैयक्तिक मते होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

अशी मते असलेल्या...

mayu4u
Sun, 02/03/2019 - 13:36 नवीन
व्यक्तींना आणि त्यांच्या पक्षाला जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देते. मग "नाचता येईना..." च्या चालीवर मतदान यंत्रावर खापर फोडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 19:44 नवीन
आणि मते मिळवून खुर्चीत बसलेले भाजपे गांधी , नेहरू , जिना आणि आरक्षणावर खापर फोडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

दिपक तलवार नावाच्या दलालला

डँबिस००७
Sat, 02/02/2019 - 22:41 नवीन
दिपक तलवार नावाच्या दलालला दुबईवरुन भारतात आणलय आणी त्याच्या चौकशीत काँग्रेसचे नेते नागडे व्हायला लागले आहेत . चौकशी अधिकार्यांना दिग्विजय सींगनी दिपक तलवारला लिहीलेल पत्रच हाती लागलय ! ह्या पत्रात दिग्विजय सींग यांनी दिपक तलवार यांना धन्यवाद दिले आहेत. दिग्विजय सींग यांच्या अमेरिका दौर्याच्या वेळेला दिल्ली ते अमेरीका दरम्यान विमान प्रवासाची अत्यंत महाग असलेल्या फस्ट क्लासची तिकीटे दिपक तलवार यांनी अ‍ॅरेंज करुन दिलेली होती. ह्या दिपक तलवारने राहुल गांधींना सुद्धा वेळोवेळी फस्ट क्लासची विमानाची तिकीटे काढुन दिलेली होती. त्या संबंधातले पुरावे आता हाती आलेले आहेत अस सुत्रांनी सांगीतल ! मोदी सरकार जाव हे ह्या भ्रष्ट कॉग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना वाटण स्वाभाविक आहे पण राहुल गांधीच्या जमोप्या सारख्या भक्ताला सुद्धा अस वाटण म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना !! अस ही कमरेच सोडुन डोक्याला गुंडाळुन नाचायला ह्याचा हात को णीही धरु शकणार नाही !!
  • Log in or register to post comments

जास्त नाचू नगा

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 00:07 नवीन
तुम्हाला साधे कन्हैया अन सलमान तुरुंगात घालता आले नाहीत, हे तर चारदोन चौकशा होऊन फुरर होतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

गेल्या महिन्यात एक परदेशी पकडला होता,

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 06:30 नवीन
त्याचे काय झाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

सीबीआयच्या डायरेक्टर

डँबिस००७
Sat, 02/02/2019 - 23:22 नवीन
सीबीआयच्या डायरेक्टर नियुक्तीच्या वेळेला भ्रष्ट काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेचा खोडा !! गेल्या वेळेला सीबीआयच्या डायरेक्टर नियुक्तीच्या वेळेला व तसेच कामावरुन काढताना सुद्धा काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेचा खोडा घातलेला होता. श्री रीशी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या डायरेक्टरच्या पदावर नियुक्ती करण्यासाठी पं प्रधानासकट तिन लोकांची समिती तयार केलेली आहे. सीबीआयचा ईतका धसका ह्या भ्रष्ट काँग्रेसने घेतलेला आहे की सीबीआयच्या डायरेक्टर नियुक्तीच्या वेळेला खोडा घालायचे कामच करत आहेत.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर...!

विशुमित
Sun, 02/03/2019 - 00:07 नवीन
अगदी बरोबर...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

विरोधी पक्षाचा मान भाजप ने

ट्रम्प
Sun, 02/03/2019 - 11:15 नवीन
विरोधी पक्षाचा मान भाजप ने काँग्रेस ला न दिल्यामुळे भाजपा च्या प्रत्येक निर्णया ला विरोध करण्याचे काम खडगे आणि काँग्रेस करत आहेत . निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे 2019 च्या निवडणुकीत 18 ते 39 वय असलेल्या मतदारांचे प्रमाण 45 % आहे आणि टेक्नोसाव्हि असलेली तरुण मंडळी मोदीनांच सपोर्ट करण्याची शक्यता असल्या मुळे सगळे विरोधीपक्ष घाबरले आहेत . अस्तित्त्व टिकवन्यासाठी त्यांनी जन्माचे वैरी असलेल्या बरोबर अनैतिक आघाड्या केल्या आहेत , भारतातील मुस्लिमसमाजाप्रमाणे हिंदू कट्टर नाहीत हे त्या सगळ्या अनैतिक अघाड़या च्या पथ्यावर पडले आहे , म्हणून ते देशद्रोही लोकांना एकत्र करून मोदींच्या विरोधात लढत आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

खर्गे भाऊंनी जे कारण दिलंय ते

SHASHANKPARAB
Mon, 02/04/2019 - 16:08 नवीन
खर्गे भाऊंनी जे कारण दिलंय ते हास्यास्पद आहे.म्हणे १९८४ च्या बॅचच्या नव्या सीबीआय संचालकांकडे पुरेसा अनुभव नाहीय. यांना स्वतःला कुठलाही राजकीय अनुभव नसणाऱ्या सोनियाबाई यांना पक्षाध्यक्ष म्हणून चालतात (पंतप्रधान पण बनवणार होते, पण ऐनवेळी "आतला" आवाज आला) , मग गेली १४ वर्षे खासदारकीच्या नावाखाली झोप काढणारा राजपुत्रही चालतो, ज्याचे आतापर्यंतचे कर्तृत्व दुर्बीण घेऊन शोधायला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

देशाच्या तत्कालीन गृहमंत्री

आनन्दा
Sun, 02/03/2019 - 09:03 नवीन
देशाच्या तत्कालीन गृहमंत्री म्हणतो की मला मान्य नसताना कसाबला फासावर चढवले? म्हणजे सरकार चालवायचे तरी कोण?
  • Log in or register to post comments

देशाच्या तत्कालीन गृहमंत्री

प्रसाद_१९८२
Sun, 02/03/2019 - 10:31 नवीन
देशाच्या तत्कालीन गृहमंत्री म्हणतो की मला मान्य नसताना कसाबला फासावर चढवले? म्हणजे सरकार चालवायचे तरी कोण? -- मला वाटते हा प्रश्न कधीतरी अमिताभच्या केबीसी मधे येऊ शकतो. जर असा प्रश्न केबीसीमधे कधी आलाच, तर या प्रश्नाचे चार ऑप्शन काय असू शकतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

या प्रश्नाचे चार ऑप्शन

mayu4u
Sun, 02/03/2019 - 13:39 नवीन
१. म्याडम २. जावई ३. १ आणि २, दोन्ही पर्याय योग्य. ४. वरीलपैकी सर्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 19:40 नवीन
फाशी देणे , न देणे गृहमंत्र्याच्या मर्जीवर असते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

तुम्ही पहिल्यापासूनच असे आहात

आनन्दा
Sun, 02/03/2019 - 22:32 नवीन
तुम्ही पहिल्यापासूनच असे आहात का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/03/2019 - 15:48 नवीन
सध्याचे वातावरण पाहता पुढचे तीन महिने अनेक चॅनेल्सवर खंडीभर करमणूक असणार आहे ह्यात शंका नाही. दाणे टाकून कोंबड्या झुंजवायच्या तसे प्रत्येक चॅनलवर पक्षाच्या प्रवक्त्यांना करायला लावणार हे नक्की. २६ जानेवारीला गडकरी व राहूल मस्तपैकी गप्पा मारत होते. दिवसा कार्यकर्त्यंना ,पाठिराख्यांना भांडायला लावायचे व रात्री एकत्र प्यायला बसायचे.. हे उद्योग सर्वपक्षीय नेते करतात.
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com

विशुमित
Sun, 02/03/2019 - 17:08 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/union-minister-nitin-gadkari-advise-party-workers-in-nagpur-1834639/ जो घर सांभाळू शकत नाही; तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी नितीनजीने कार्यकर्त्यांचे (?) कान टोचले. === माई तुमचे 'हे' लक्ष देतात का तुमच्याकडे की फिरतात पतका घेवून कोणत्या पक्षाचा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हॅ हॅ हॅ

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/03/2019 - 17:27 नवीन
पुर्वीचा मराठी माणूस राजकीयदृष्ट्या शहाणा होता असे ह्यांचे मत. म्हणजे सगळ्या पक्षांच्या जाहीर सभांना हजेरी लावायची, टाळ्यांचा कडकडाट करायचा, भाषण ठोकणार्या पुढार्याचे कौतुक करायचे पण मत मात्र आपल्या आवडत्या पक्षाला द्यायचे. शिवसेनेला हा अनुभव अनेक्वेळा यायचा असे म्हणतात. तत्कालिन पत्रकारही बिलंदर असायचे. ह.रा.महाजनी, गोविंद तळवलकर,गिरिलाल जैन ही मंडळी कोणत्या पक्षाला मत देतील हे अगदी त्यांच्या घरातील माणसांनाही सांगता येणार नाही..असा प्रकार होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

अवतार

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/03/2019 - 18:21 नवीन
राहुल गांधी यांच्या पाटणा दौरापूर्वी एका पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे प्रभू रामाचा अवतारातील पोस्टर लावले होते.  या पोस्टरमध्ये राहूल गांधींना भगवान शंकराच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. याच पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना दुर्गामातेच्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिषासूराच्या अवतारात दाखवले आहे. दुर्गामातेने महिषासूराचा वध केल्याची प्रतिकृती या पोस्टरमध्ये उभा केली आहे. या पोस्टवर ‘राहुल-प्रियंका का सपना, खुशहाल हो देश अपना.’ असे लिहिण्यात आले आहे. हे पोस्टर काँग्रेसने लावल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पोस्टरमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. --------- भाजपे प्रियंकाला शूर्पणखा , पुतना बोलत होते, आता काँग्रेसने मोदीना महिषासुर बोलले तर लगेच भावना दुखावल्या.
  • Log in or register to post comments

पांचटपणा आहे हा कांग्रेसचा!!

विशुमित
Sun, 02/03/2019 - 20:18 नवीन
पांचटपणा आहे हा कांग्रेसचा!! === पण त्यांचाही नाईलाज आहे म्हणा भारतीय मतदारांना especially उत्तर भारतीयांना असलेच उपद्व्याप आवडतात. === उगाच 2 वरुन बहुमताचे सरकार खेचून आणलं नाही ! आहात कुठे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

प्रियंकाला शूर्पणखा , पुतना

डँबिस००७
Sun, 02/03/2019 - 18:52 नवीन
प्रियंकाला शूर्पणखा , पुतना बोलायला भाजपाचे लोक तुमच्या सारखे येडे नाहीत. शूर्पणखा, पुतनाच्या अगोदर आलेली म्हणजे सो गा = शूर्पणखा आणि प्रियंका= पुतना राहुल गांधींचे प्रभू रामाचा अवतारातील पोस्टर लावले होते. या पोस्टरमध्ये राहूल गांधींना भगवान शंकराच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. याच पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना दुर्गामातेच्या रुपात , अ रे रे सिक्युलर काँग्रेसची काय ही दशा झालेली आहे !! श्री राम हा भारताच्या इतिहासाचा भाग नसुन , हिंदु धर्मातला एक मिथ्थ आहे असे प्रतिपादन सु कोर्टात करणारी काँग्रेस आता हिंदु देवतांच्या अवतारात ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा