संकट आपल्यामागे की आपण संकटाच्या पुढे...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काल सकाळी- सकाळी मोर्निंग वॉकला गेलो होतो गाडीवरून. अहो म्हणजे, गाडीवरून बागेत गेलो आणि तिथे मोर्निंग वॉक/योग केले.
तिथून घरी परत येत असताना एका गल्लीमध्ये गाडी नेली. तेव्हा तेथील एक कुत्रे जे खरे तर माझ्या वाटेवर नव्हते ते उगाच पळायला लागले. त्याची एवढी घाबरगुंडी उडाली की पळता-पळता ते बरोबर गाडीच्या समोर आले आणि आणखीन घाबरून जोरात पळू लागले.
वास्तविक पाहता मुळात कुत्र्याने माझी गाडी आली म्हणून पळण्याची गरज नव्हती कारण ते तसेही वाटेत येत नव्हते. मात्र नंतर त्याच्या चुकीच्या अस्वस्थतेमुळे ते विनाकारण गाडीसमोर (संकटासमोर ) धावू लागले.
ज्याप्रमाणे वरील प्रसंगात कुत्रे जर बाजूला जाऊन शांतपणे उभे राहिले असते तर त्याला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. तसेच असे असंख्य प्रसंग असतात जिथे आपण स्वत:हून संकटाच्या पुढे उडी मारतो आणि मग पळत सुटतो.
आयुष्यात बऱ्याचदा संकट आपल्यापाठीमागे नाही तर आपण संकटासमोर पळत असतो !!!
प्रतिक्रिया
सुंदर मौलिक विचार.
धन्यवाद
पण संकट का पळत असते? एकाच
मुळात ते संकट नाहीच
:):)
सुंदर विचार आहेत.
सुंदर विचार....
मला एक प्रश्न पडलाय,
देहबोली
अंगात मस्ती..दुसरे काय?
कधि गहिवरलो
संकटाला आपल्यालाच फालो करायचं असेल तर ?
बैल हे संकटच
खरं आहे पण.....
का उभे राहायचे?
का उभे राहायचे?
का उभे राहायचे?
का उभे राहायचे?
तुमचं वर्तुळ पूर्ण झालंय
काय झाले देव जाणे
:)
उत्तम विचार आणि
हा हा हा
काल्पनीक संकटाच्या
अगदी हेच
भू भू