✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!

अ
अज्ञात यांनी
Sun, 11/15/2015 - 12:57  ·  लेख
लेख
ये तारा वो तारा हर तारा… देखो जिसे भी लगे प्यारा ये सब हो साथ मे, तो जगमगाया आसमां सारा! जगमग तारे, दो तारे, नौ तारे, सौ तारे, हर तारा ही शरारा… ये तारा वो तारा... अन्वयाला (माझी मुलगी) ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं... शहारे आले ऐकून आणि बघून ही! त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा! जमिनीवर सारवलेल्या शेणाचे तुकडे तोडत, कितीही झोप आलेली असताना, एकही सीन वाया न घालवता शेवटपर्यंत! कोणी शाल ओढून कोणी जैकेट अडकवुन! सुंदर चांदण्याचा प्रकाश, गावातल्या शाळेच्या आवारात, अर्धे ओळखीचे-अर्धे अनोळखी... पण काही दमदार / हास्यास्पद सीन घडला की जन्मोजन्मांतरी ओळख असल्यासारखी टाळी / दाद द्यायचे! खुप अप्रूप असायचं, आता घरोघरी टीव्ही झालेत, तेव्हा १०घरांपैकी २घरांकडे ब्लैकएंडव्हाइट आणि एकाकडे कलर टीव्ही असे, आणि असे सार्वजनिक चित्रपट वर्षातून एक-दोंदाच! हे असे मी सारखे सारखे भुतकाळात का जातो! वर्तमान काही वाइट नाहीये! भूतकाळात पंख नव्हते, तरी उडायचो! आता पंख आलेत... पण त्याबरोबर जवाबदारी पण 'फ्री' आल्ये, मजा येते अजुनही उडायला... पण तेव्हाचं उडणं बंधनं नसलेलं, काही चुका झाल्या तर समजून घ्यायला मायाळू आकाश होते, जोरात पडलो तर कठोर जमीन तेवढ्या पुरती गादीत 'कन्व्हर्ट' व्हायची! अंगणाला कुंपण जरी असले तरी पलीकडचे अंगण नेहमी स्वागतच करत असे! आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठी आकाशात तारे अजूनही तितकेच असतील, जीतके आपल्या लहानपणी पाहिलेले, पण आता आपण आभाळाकडे पहायला कमी लागलोय! द्वेष वर्तमानाचा नाही आणि दोष भूतकाळाचा नाही! वेळ कोणासाठी थांबत नाही पण वेळोवेळी मी त्या वेळेत अडकतो जी वेळ निघून गेलेली असते! थोडसं खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही! #सशुश्रीके
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2240 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

छान

बाबा योगिराज
Sun, 11/15/2015 - 13:48 नवीन
मस्त लिहिता तुम्ही. पुलेशु.
  • Log in or register to post comments

देवाची क्रुपा!

Ea imputo praemitto
Mon, 11/16/2015 - 12:44 नवीन
देवाची क्रुपा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

मस्तं लिहिलंय..

पद्मावति
Sun, 11/15/2015 - 14:33 नवीन
मस्तं लिहिलंय..
द्वेष वर्तमानाचा नाही आणि दोष भूतकाळाचा नाही! वेळ कोणासाठी थांबत नाही पण वेळोवेळी मी त्या वेळेत अडकतो जी वेळ निघून गेलेली असते! थोडसं खेळून येतो परत…
....क्या बात है!! सुपर्ब.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!

Ea imputo praemitto
Mon, 11/16/2015 - 12:44 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

छान!

बोका-ए-आझम
Mon, 11/16/2015 - 15:53 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments

:)

Ea imputo praemitto
Wed, 02/03/2016 - 20:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

:)

Ea imputo praemitto
Wed, 02/03/2016 - 20:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मी पण !!!!

मयुरMK
Wed, 02/03/2016 - 20:31 नवीन
मी पण !!!!
  • Log in or register to post comments

सुंदर लिहीलंत, मी पण मिनीटभर

सूड
Wed, 02/03/2016 - 20:39 नवीन
सुंदर लिहीलंत, मी पण मिनीटभर भूतकाळात एक फेरी मारुन आलो.
  • Log in or register to post comments

मजा येते ना!

Ea imputo praemitto
Wed, 02/17/2016 - 18:57 नवीन
मजा येते ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आवडलं.

यशोधरा
Wed, 02/03/2016 - 20:59 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

Ea imputo praemitto
Wed, 02/17/2016 - 18:57 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा