जागावाटपाची अजून एक युक्ती : नो मॅन्स लँड
जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात.
आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत.
असाच एक सुचलेला हा उपाय:
जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय.
भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा.
उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५.
पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत.
मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको.
उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते.
हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान.
बाकी जय महाराष्ट्र..!!
(अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला
मान गये हाडक्या ,आपकी पारखी
वा वा नानासाहेब, आमच्या
कल्पना खरंच चांगली आहे.
कल्पना खरंच चांगली आहे.
सत्तेच्या लोण्याचा गोळा
आघाडीचे बोके पण अशीचं नखं
अहो नखे काढून उपयोग काय.
हे म्हणजे शिवसेनेला
(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत
...
...
असं कसं म्हणता?
असं खरंच तुम्हाला वाटतं ? का
अजून उमेदवार पण निश्चित नाहीत
यातच राज ठाकरे यांचे यश सामावलेले आहे
विरोधी पक्ष
शितावरुन भाताची परीक्षा करतात
जर डीटेलमध्येच जायचं असेल तर...
पिडां, तुमच्या भावनेशी सहमत..
सहमत.
दुर्लक्ष
दुर्लक्ष
नाशिक मधे काय केले हे तेथिल
आपला विकास झाल्याशी मतलब.
या सगळ्या गोंधळात हे मान्य
नाईट वोचमन...???
या सगळ्या गोंधळात हे मान्य
पायलट बेसिस वर त्यांना नाशिक
खाली प्रतिसाद दिला आहे
.
+११११११
येईल की
ती मागच्या वेळी येणार होती ना
ठीक आहे
@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच
नानासाहेब नेफळे किंवा अन्य
तेच कि! गुजरातमध्ये जाऊन
तुम्ही म्हणा तुम्हाला काय
ज्याने टोलचे आंदोलन मध्येच
बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे
मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर
(No subject)
धन्यवाद शिद
ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी
उगाच विरोधासाठी विरोध काय कामाचा?
अन्यथा द्या सोडून...
"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला
.
असं करून जागावाटपात Nash