वैतागवाडी मॅनेजमेन्ट

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
15 Apr 2014 - 8:16 pm

ऑफिसमधील काही डोक्यात जाणार्‍या गोष्टी -
(१) Yup/Nope dudes. औपचारीक इमेल मध्ये सुद्धा Yup/Nope" शब्दांची पखरण करणारे महाभाग.
(२) अजून एक प्रकार म्हणजे जे माहीत आहे तेच घोळवून सांगत, माहीतीपूर्ण असण्याचा आव आणणारे सहकारी. प्रकल्प पुढे न्यायला, नव्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी, जे स्वतःला माहीत आहे तेच घोळवत बसणारे अन मांडत रहाणारे.
(३) "बड्डे" हा एक वैतागवाणा प्रकार. दर महीन्याला, आमच्याकडे ३-४ "बड्डे ग्रीटींग्स" वर शुभेच्छा लिहाव्या लागतात. कोणाचं कोणी गचकलं तर "शोकसंदेश" ची कार्डे. काल तर कमाल झाली, एकीचा कुत्रा गचकला तर ते कार्ड "शोकसंदेशाकरता" आलं.
म्हणजे काम सोडा अन सही करा मग पुढच्याला ते कार्डं पास करा हा सव्यापसव्य! परत सही करणारी मी शेवटून दुसरी होते म्हणजे परत शेवटच्याला शोधा. ते यडं दार लावून मीटींगा करत बसलं तर येर्झारा घाला असला बावळट प्रकार.

इथे "कल्चरल गॅप" जाणवते. कोणाचं कुत्रं मेलं तर भारतात असं करतो का आपण? पण इथे मात्र (या ऑफीसात)
लगेच संदेशकार्डे जातात. असली शिवी घालावीशी वाटली ना काल!!! तुम्हाला कार्डं द्यायचं ना तुम्ही वैयक्तिक द्याना टीम-कार्डं कशाला?

अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ...... घाला असलं कल्चर तुमच्या ***** नाही तर चूलीत. तळपायाची आग मस्तकात गेली. पण सांगते कुणाला? नोकरी तर टिकवायची आहे कारण बर्‍याच वर्षांनी कुटुंबाजवळ नोकरी मिळाली आहे.

नोकरीप्रकटन

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

15 Apr 2014 - 8:42 pm | मार्मिक गोडसे

कुत्र्याऽऽ मेल्याऽऽ ही शिवी घालावीशी वाटली का तुम्हाला ?

त्याहून वाईट शिवी नाय सुचत का वो गोडसेभाऊ तुमाला ;)

मार्मिक गोडसे's picture

15 Apr 2014 - 9:21 pm | मार्मिक गोडसे

सुचतात की....वापरून बघा एकदा... समोरच्याचे पाईल्स किंवा प्रोस्टेट बाहेर आल्यास जबाबदारी तुमची.

हहह सही!!! जाऊ देत आमची धाव "हलकट/साला" यापलीकडे नाही ;) खरं तर साला ही शिवीही अति झाली :)

काळा पहाड's picture

15 Apr 2014 - 11:51 pm | काळा पहाड

"मेल्या.. मुडद्या..मढं बशिवलं तुजं.." वापरून बघा.

मृत्युन्जय's picture

16 Apr 2014 - 1:53 pm | मृत्युन्जय

गुड आयडीया. संदेश कार्डावरच हे लिहुन द्यायचे. वायझेड गोर्‍याला कळणारही नाही आणि तुमच्या भावनाही मोकळ्ञा होतील :)

दिव्यश्री's picture

16 Apr 2014 - 6:55 pm | दिव्यश्री

मेल्या.. मुडद्या>>>> :D

बणवाबणवीतल्या पार्वतीची आठवण झाली . ;) *LOL*

बाप्पू's picture

15 Apr 2014 - 8:43 pm | बाप्पू

एकदम सहमत
कामापेक्षा या असल्या निरर्थक आणि फालतू गोष्टींवर हे लोक का वेळ वाया घालवतात काय माहीत..
"कल्चरल गॅप" तर आहेच. आणि मला तर खूप जाणवतो. पण हे जे वागतात ते खरेच कल्चर आहे का..?? की निव्वळ आपण किती मॉडर्न कल्चर वाले आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.??
कोल्हापुर सारख्या मर्दानी आणि रागंड्या भागातून आलेला मी असले काही येड*वे प्रकार पहिले की हसवे की रडावे ते समजत नाही...

पण करणार काय... शेवटी "पापी पेट का सवाल है" म्हणून त्यांच्यातलाच एक असण्याचा आव आणावा लागतो.

शुचि's picture

15 Apr 2014 - 8:54 pm | शुचि

परवा एका इन्फॉर्मल इन्टेर्व्यू/बोलणी करता गेलेले तर तो दिव्य मॅनेजर इतर जगात किती समस्या आहेत अन अमेरीकेतील प्रॉब्लेम्स (समस्या) कसे "वर्केबल" आहेत हेच पुराण लावून बसला. एक स्रीनी नावाचा भारतीय म्हणे हट्टाने परत गेला अन मग भारतात अ‍ॅडजस्ट होईना म्हणून याला परत परत फोन करत राहीली. च्यायला मी काय गप्पा झोडायला आलेय का अन ते ही अशा रेसीस्ट :(
याच्या पार्श्वभागावर सणसणीत लत्ताप्रहार करावासा वाटला. त्या कंपनीत डायव्हर्सिटी किती आहे ते या "कुजक्या शितावरुन" कळलेच म्हणा.

प्रसाद१९७१'s picture

16 Apr 2014 - 6:17 pm | प्रसाद१९७१

तुम्ही नोकरी सोडुन का देत नाही? का कोणी जबरदस्ती केली आहे नोकरी करण्यासाठी?

तुम्ही Albert Elis चे REBT वाचा आणि समजुन घ्या.

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे Horriblisation ( भयंकरीकरण ) करता आहात.

तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.

तुम्हाला मुद्दा समजला नाहीये.

तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.

ही बाधा आमच्या मॅनेजरला झालेली आहे. सर्वांनी सही केलीच्च पाहीजे वगैरे.

बाकी नोकरी करायची कोणी सक्ती केली आहे अथवा नाही याच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही.

आता जाऊ देगं बाई शुचीमामी! मागला सगळा अठवडा डोनेशन्सच्या प्रकारांना वैतागले होते. स्प्रिंग आल्यामुळे इथे नुसते चाला, नाहीतर सायकल चालवा, गाणी गा आणि त्याचे पैसे द्या, मग आम्ही डोनेट करतो. अरे. एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. यादी संपेचना! एका हिंदी भाषिकाने खास मराठी गाण्यांचा सराव करून कार्यक्रम तयार केलाय व या म्हणत होता. " अरे बाबा, परवाच इथे हृदयनाथांचा करेक्रम झाला, तो हौसफुल्ल होता, ते ठीक आहे पण तुझा गाढवी आवाज, हिंदाळलेले मराठी ऐकण्यासाठी आम्ही $ १०० का द्यायचे?" आता एक मुलगी पोहत बसणारे, तिथे जाऊन पोहणे बघून पैसे द्यायचे. मागला अठवडा तर रोज काहीतरी असलं होतच. बरं, कौतुक न कराल तर तुम्ही समाजकंटकांच्या यादीत गेलाच! मी फक्त पोहणं बघायला जाणार आहे व तिला पैसे देऊन येणार आहे. बाकी काही नाही.

अरे बाप रे!!!! काय हा पैशाचा चुराडा ग :(

आदूबाळ's picture

15 Apr 2014 - 9:06 pm | आदूबाळ

ठेलशल घेऊ नका हो.

मी असल्या कार्डांवर मराठीत शुभेच्छा/शोकसंदेश लिहितो आणि मराठीतच सही करतो. एखाद्याला दोनदा फोन करूनपण त्याने उचलला नाही, परत फोन केला नाही तर व्हॉईसमेलवर मराठीत निरोप ठेवतो. आपण आपलं मनोरंजन करून घ्यायचं.

शुचि's picture

15 Apr 2014 - 9:07 pm | शुचि

हाहाहा आयला :)

>> मराठीत शुभेच्छा/शोकसंदेश लिहितो आणि मराठीतच सही करतो.

हे आवडलं!! =))))

सव्यसाची's picture

15 Apr 2014 - 9:53 pm | सव्यसाची

आपला उपक्रम आवडल्या गेला आहे.. :)

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 1:20 pm | बॅटमॅन

हाण्ण तेच्यायला. जबरीच!!!!

पैसा's picture

15 Apr 2014 - 10:35 pm | पैसा

मराठी कळणारं कोणी नाही ना? दे की खच्चून शिव्या!

शुचि's picture

15 Apr 2014 - 10:45 pm | शुचि

हाहाहा .... अगं फक्त काम करण्याचे वातावरण व्यवस्थित "फॅसिलिटेट" केलं तरी खूप झालं. मग त्या सोशल अ‍ॅक्टिव्हीटीजची अन सोशल इव्हेन्ट्सची थेरं अन मुख्य म्हणजे कंपल्शन्स कशाला? काही लोक बहीर्मुखी असतात तर काही अंतर्मुखी. समजून घ्या ना.
_______________
अर्थात हे मान्य की मनुष्य एक बेट बनून राहू शकत नाही मग एखादी वेळ ठरवा "हॅपी अवर" ज्या वेळेत काम नाही तर गप्पा अन खेळ. पण नाही कामाच्या मध्ये मध्ये ग्रीटींग्ज.
______________
मध्ये येड्यानी अभिनंदनाची मेल पाठवलेली की अमका (अबक) एन्गेज झाला त्याचे अभिनंदन करा. १० मिनीटात त्याच मॅनेजरची मेल - सॉरी अबकचं लग्न झालेलं आहे अन दे आर एक्स्पेक्टींग अ बेबी. एनीवे अभिनंदन करा.

- व्हॉट अ जोक. इतक्या खाजगी बाबीत टीम-अभिनंदनाची अहमहमिका कशाला म्हणते मी :). द्या की सुखानी जगून.

पैसा's picture

15 Apr 2014 - 11:00 pm | पैसा

विचारायचं होतंस, १० मिनिटात एंगेजमेंट, लग्न आणि बेबी? सुपरफास्ट मामला आहे का म्हणून! आपलं डोकं खराब करून घेण्यापेक्षा अर्ध्या मिनिटात सही करून मोकळं झालेलं बरं असं वाटतं एकेकदा. पण खरे तर मित्रांनी मनापासून शुभेच्छा देणं वेगळं आणि असा जुलमाचा रामराम वेगळा.

आमच्या ऑफिसात एक आम्हाला न आवडणारे रीजनल मॅनेजर होते. त्यांची बदली झाली तेव्हा एका चमच्याने त्याना गिफ्ट देऊया म्हणून पैसे गोळा करायला सुरुवात केली. खरे तर आमच्या ऑफिसात दर महिना एक छोटी रक्कम पगारातून एका अकाउंटला आपोआप टाकली जात होती. त्यातून अशा गिफ्ट्स, फुले इ. चा खर्च केला जायचा. पण उगा रीजनल मॅनेजरसमोर शायनिंग मारायला हा चमचा पैसे गोळा करायला लागला तर मी अजिबात देणार नाही म्हणून सांगितलं. माझं पाहून मग आणखी काहीजणांनी पैसे देणार नाही म्हणून सांगितलं.

काही टेन्शन घ्यायचं नाही. सुरुवातीला विचित्र आहे म्हणतील. मग आपोआप सगळ्यांनाच सवय होऊन जाईल.

इरसाल's picture

16 Apr 2014 - 2:54 pm | इरसाल

वाढदिवसाच्या शुभेच्छा : मेल्या/ मेली, हलकट, पाचकळ, फाजील, वसाड्या तुला वाढदिवसाच्या गोगोड शुभेच्छा.
शोक संदेश :या मेल्याच्या/मेलीच्या कुत्र्याला मरायला आजचाच दिवस बरा सापडला.

पैसा's picture

16 Apr 2014 - 4:12 pm | पैसा

गुगल ट्रान्सलेशनमधे याचं भाषांतर काय येतंय ते बघावं लागेल!

Utterly crest / Maly, mean, pacakala, forward, vasadya gogoda Happy Birthday to you.

किंवा

Of these drafts / communicative found a cure for the dog to starve to ajacaca days

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 10:56 pm | तुमचा अभिषेक

बरं अभिनंदन केल्यावर बर्फी पेढे वगैरे वा गेला बाजार केक अन पेस्ट्री तरी देतात का ? नाहीतर कोरडे अभिनंदन म्हणजे वैतागवाणाच प्रकार असतो :(

अहो एकदा बाळंतपणं सुरु झाली की चार वर्षात दोन नैतर आठ वर्षात ५ झाल्यशिवाय थांबत नैत! पहिल्याच्या जन्माची मिठाई वाटून होईपरेंत दुसरं जन्माला येतं. ;) (याला सरसकटीकरण म्हणतात पण थोड्याफार फरकानी जे असते ते ल्हिले.)मग हे उपद्वाय कोण करणार?

हो आम्ही एक केक कापतो सगळ्या मासिक बड्डे वाल्यांसाठी :) पण बहुसंख्य अंतर्मुखच आहेत त्यामुळे ऑकवर्डच सिनॅरीओ असतो.
इथे मिनेसोटा च्या इन्ट्रोवर्ट्स बद्दल एक जोक आहे - मिनेसोटा मध्ये कोणी एक्स्ट्रोव्हर्ट आहे हे कसे ओळखायचे? सोप्पे आहे - ती व्यक्ती दुसर्‍याच्या बुटांकडे पहात असते ;)

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2014 - 6:31 pm | दिपक.कुवेत

फार तापदायक ठरतं. आमच्या ऑफिस मधे तर सगळे ज्याचा बड्डे असेल त्याच्या डेस्क पाशी जाउन 'हॅपप्पी बड्डे टु यु....." चं जे गाणं सुरु करतात ते पार शेवटपर्यत. ईतकं लाजल्यासारखं होतं ना....सगळे सहकारी ते गाणं संपेस्त तुमच्याकडे टकामका बघत असतात. क्वॉलीटि मॅनेजरनी सर्वाच्या वतीने एक विश करणारा ईमेल पाठवुन ह्यांच भागत नाहि. कमाल म्हणजे सगळे मॅनेजर अगदि जीम सुद्धा ह्या खेळात सामील होतो.

तुमच्या जीवनात काही छान घड्ले तर हीच टीम तुमचे अभिनंदन करते का? का इग्नोअर करते? मग आपण इतरांच्या आनंदात /दु:खात सहभागी होउ शकत नाही हा एक प्रकारचा मनाचा कोतेपणाच आहे. स्वभावाला औषध नाही पण जरा मनाच्या कक्षा रुंदवता आल्या तर बघा. इट रिअली इज अ टीम एव्हरीवेअर. इतके स्वकेंद्रित राहणे म्हणजे लीडरशिपच्या सर्व पोझिशन्स आपल्याहाताने दूर सारणे आहे. अश्यानेच बायकांना ग्लास सीलिन्ग तोडणे अवघड जाते. सहानुभूतीका जमानाही नहीं रहा. :)

शुचि's picture

16 Apr 2014 - 6:40 am | शुचि

आपला प्रतिसाद वेगळा वाटला अन खरोखर मनापासून लिहिल्यासारखा वाटला. पाहिलं म्हणजे प्रत्येकालाच नेतृत्व गाजविण्यात रस असतो असे नाही. मी अंतर्मुख आहे हे मी आधीच स्पष्ट केले आहे अर्थात अंतर्मुखी व्यक्ती नेता नसतात असेही नाही. पण माझा तो प्रांत नाही,

दुसरे हे की आपण सरसकटॆकरण केले आहे की बायकांना सीलिंग तोडणे कठीण जाते. असेच काही मला वाटत नाही.

बाकी मनाचा कोतेपणा हा वेगळा दृष्टीकोन आपण पुढे आणलात याबद्दल आभारीच आहे. पण कोणाचं कुत्रा-मांजर मेले म्हणून शोकसंदेश पाठविणे मला अतिशय भंपक (रिडीक्युलस) वाटते.

लंबूटांग's picture

16 Apr 2014 - 8:31 am | लंबूटांग

मला असेच काहीसे म्हणायचे होते. पण म्हटले फक्त शुची मामी च्या प्रत्येक धाग्यावरच प्रतिसाद कशाला द्यायचा. ते लीडरशीपच्या पोझिशन्स अन ग्लास सीलिंग वगैरे वगैरे शी नाही सहमत.

धाग्यातील पहिल्या दोन मुद्द्यांशी अंशतः सहमत.

पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली.

बाकी तुम्हाला कार्डावर सही करायची नसेल तर सरळ पुढच्याला नेऊन देण्याचा ऑप्शन असतोच. मी तर ओळख पाळख नसलेल्यांच्या कार्डावरही सही ठोकून दिली आहे. आणि मग केक खायलाही गेलो आहे :).

बाकी तुम्ही फेसबुकवर वर्‍षानूवर्‍ष न भेटलेल्या लोकांना बड्डे विशेस देताच ना? मग इथे रोज ज्यांच्याबरोबर दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ घालवतो त्यांना द्यायला काय हरकत आहे.

कुत्रा गचकला वगैरे तुम्ही म्हणू शकता पण बर्‍याच लोकांसाठी ते घरातील सदस्यच झालेले असतात. उद्या कोणाची आई गेली तर तुम्ही थेरडी गचकली आणि कार्डे कसली देतात असे म्हणाल का?

आपण अमेरिकेत राहत असताना भारतात असे करतो का आणि तसे करतो का हा विचार करण्यात काय हशील आहे? भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का? मला तर बर्‍याच भारतीय मित्रांचा हा कन्फ्युजड प्रकार कळतच नाही. इथे येताना अगदी खुशीने आले स्वतःहून अन मग भारतात कुठे असे करतात, कसली थेरं असे म्हणत जगायचे. असो. धाग्यावर अवांतर नको.

पाणी देणे नं देणे वगैरे तर मी भारतातही पाहिले आहे, त्यात रेसिझम असावा असे वाटत नाही. पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.

आनन्दा's picture

16 Apr 2014 - 11:20 am | आनन्दा

अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?

प्रसाद१९७१'s picture

16 Apr 2014 - 6:19 pm | प्रसाद१९७१

अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?>>>+१००००००००००००००००००

मृत्युन्जय's picture

16 Apr 2014 - 1:59 pm | मृत्युन्जय

भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का

अजुन कसे जाणार मग? १ मैल = १.६ किमी. इतके अंतर पायी फक्त मॉर्निंग वॉकलाच चालले जाते हो.

पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.

हे शब्द त्या बाईच्या वृत्तीतून आलेले आहेत. अन्य कोकेशिअन स्त्रिया मला गोर्या चा वाटतात. त्यांचे निळे डोळे अन विविधरंगी केस आकर्षकच वाटतात.

आजानुकर्ण's picture

16 Apr 2014 - 7:02 pm | आजानुकर्ण

पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली.

हाहा.. .खरंय

जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान।
अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम. सक्तिने सह्या करून घेण्यास काहीच अर्थ नाही. वेळेचा अपव्यय आहे. वाढदिवसासाठी मला वाटते टीम मीटिंग मध्ये सुरवातीला वा शेवटी सर्वांनी त्या आठवड्यातील सर्व बड्डे असलेल्यांचे एकमुखाने अभिनंदन करावे. किती लाइवली वाटेल आणि टीम स्पिरिट ही दिसून येईल.
आमच्या ऑफिस मधील एकाचे २ कुत्रे काही महिन्यांच्या अंतराने गेले. पण त्याने हे जगजाहिर केले नाही आणि अगदी २-४ जणांनाच विषय निघाला म्हणून समजले. शोक संदेशाचे कार्ड वगैरे हां प्रकार नाहीचे. वाढदिवस असेल कोणाचा तर टीम लंच करतात. तसेही एरवी लंच मिटिंग्ज असतातच. त्यामुळे त्यात खुप नाविन्य नाही पण ग्रीटिंग्ज कार्ड साइन करण्यात कोणाला फारसा रस नसावा त्यामुळे तो प्रकार आमच्या US ओफ्फिस टीम मध्ये तरी नाहीये.
कुत्रा मांजर घरातले सदस्यच असतात त्यांच्या जाण्याने त्यांच्या मालकाला दू:ख होतेच. पण त्या बाबतीतील शोक संदेश हे व्यक्तिगत पातळीवर असावेत. हे शोक संदेश पाठवणारे पेट म्हणून फक्त कुत्रा मांजराचीच दखल घेतात की अजुन इतर पेट्स ची पण घेतात. माझ्या एका मित्राचा गेल्या वर्षी एक पॅराकीट गेला आणखी एका मित्राचा फिशटैंक मधील एक मोठा मासा गेला. अशा केस मध्ये ते काय करतात ?

शुचि's picture

16 Apr 2014 - 5:24 pm | शुचि

जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान।
अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम.

जसजसे तुम्ही मॅनेजमेंट्च्या पायर्‍या चढाल तसे सर्वांना बरोबर घेउन पुढे जाणे. कलीग्ज समजून घेणे महत्त्वा चे
ठरत जाते. मी फक्त माझे काम करणार आणि पगार घेउन गप्प बसणार अशीच वृत्ती असेल तर काय म्ह्णायचे? अर्थात काही लोक्स ना अ‍ॅस्पर्जर सिंड्रोम असतो व मिळून मिसळून वागणे खरेच अवघड जाते
भारतात देखील आजकाल टीम बिल्डिंग साठी खास प्रयत्न केले जातात. सर्वांना व्हर्टिकली वर जाण्यात रस ही नसतो. कुत्रे मांजरी घरातील सदस्यच असतात ह्याला अनुमोदन. आजकाल अमेरिकन स्त्रियांना कुत्रे पाळायला जास्त आवडते, मुले होउ देण्यापेक्षा असे परवाच वाचले. इस अवस्थामें अगर किसीका कुत्ता मर
जाता है तो कंडोलन्स तो बनता है. आपल्या देशी कल्चर मध्ये पण लग्न आणि मयत ह्या दोन महत्त्वाच्या
सामाजिक गोष्टी मानल्या जातात ह्या दोन प्रसंगी नक्की हजर राहावे असे मानले जातात.

अर्थात तुमचा वैयक्तिक चॉइस आहे. उगीच न्यागिंग केल्यासारखे वाटायला नको.

सौंदाळा's picture

16 Apr 2014 - 2:25 pm | सौंदाळा

ठेण्शन कायको लेताय शुचिताय
एक सजेशन, टिममधल्या लोकांना हे भेट्/शोक पत्र कॉमन जागी ठेवायला सांगा आणि जो/जी याचा लीडर आहे त्याला म्हणावे टीमला मेल पाठव. भेट्/शोक पत्र माझ्या डेस्कवर (किंवा अमुक अमुक जागी) आहे ईच्छुकांनी आज सह्या/संदेश लिहावेत उद्या/इओडी ते योग्य व्यक्तीला देण्यात येईल.

हो ना असाच प्रस्ताव ठेवासा वाटला. पण म्हटलं - परत ते "It is very disappointing." ऐकावे लागू नये.

तुमचे म्हणजे असे झाले आहे कि तुम्ही तिकडे आणि तुमचे मन इकडे !
तिकडे आहात तर तिकडचेच होउन रहा.
उगीच वांझोट्या चर्चा नको.

प्रभाकर पेठकर's picture

16 Apr 2014 - 3:48 pm | प्रभाकर पेठकर

असे वाढदिवसाचे, शोकसंदेशाचे कार्ड आपल्या टेबलावर आले तर ते तसेच पडून राहु द्यावे. कोणी विचारल्यास 'काम आटोपल्यावर करते सही' वगैरे सांगावे. त्यांना घाई असेल तर घेऊन जा कार्ड सांगायचे. नंतर आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा त्या सहकार्‍याला भेटून किंवा दूरध्वनीवर शुभेच्छा/शोकसंदेश द्यावा.

कामाचा मूड लागला असताना मध्ये मध्ये कोणी अवांतर गप्पांसाठी (गॉसिपसाठी) विचलीत केले तरी विचारशृंखला तुटते आणि कामाचा वेग मंदावतो. कार्यलचाचे नुकसान होतेच पण आपले वैयक्तिक समाधानही उणावते.

जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते :)

कवितानागेश's picture

17 Apr 2014 - 6:23 pm | कवितानागेश

बरोबर आहे. शोक आणि आनंद या भावना उत्स्फुर्तपणे आल्या पाहिजेत. तेच नॉर्मल आहे.
पण त्या जर का तश्या येतच नसतील, उलट कामाच्या मूडमध्ये असा चटकन बदल होउ देणे, (' बदल करणे' नाही 'होउ देणे') आणि कोरडेपणा आला असेल तर दुरुस्ती कुठे करायची?
पाचेक मिनिटे आपण त्या आनंदाच्या किंवा दु:खाच्या भावनेमध्ये वाहात जाणार असलो तरी त्यात काही हार्म नाही.
इथे मला हिडन तक्रार, 'अरे बापरे, आता इमोशनल व्हायचंय!!' अशी दिसतेय.
कदाचित ती तशी नसेलही. माझं रीडिन्ग चुकू शकतं... :)
अर्थात म्हणून कार्डावर प्रत्येकानी कम्पलसरी काहितरी लिहावंच अशी कुणी दुसर्‍यावर जबरदस्ती करणं योग्य नाहीच.

नाही ग माऊ. तक्रार ही आहे की "बळजबरी करु नका". एक इइमेल पाठवा की अमुक यांचे अभिनंदन करा अथवा अमुक यांचा पोपट्/गाढव काय तो पेट मेला. मग आम्ही करायचं तेव्हा करु. कामात केंद्रीत (फोकस्ड) असताना हे काय, सही करा अन्य कुणाला शोधा/येरझारा घाला.

काय शुचीमामी, मनतालं बोलून झाल्यावर बरं वाटलं की नाही अजून? ;)
जौ दे गं! आता पुढल्यावेळी आपण हिरवीन आहोत आणि आपला सगळेजण ऑटोग्राफ घेताहेत असे मनात आण. तुझ्या सहीला कित्ती कित्ती महत्व आहे हे विसरू नकोस. तुझ्याशिवाय टीम अपूर्ण आहे. ;) जो मनुक्ष मिटींगा घेत बसला असेल त्याला एक ईमेल पाठवून तुझ्या क्युबिकलपाशी थांबून जायला निरोप ठेव नैतर त्याच्या क्युबिकलमध्ये चिकट पावती (स्टिकी नोट) लावून 'सही कर मेल्या!' अस निरोप ठेव . कमी मनस्ताप!

जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते >>>

मला वाटते तुम्ही पराचा कावळा करता आहात. ह्या गोष्टींना तुम्ही Part of Job का समजत नाही. आपण नोकरी मधे कीती टक्के गोष्टी आपल्याला पाहीजे तश्या करतो? तसेच हे पण करायचे.

ह्या गोष्टी पण KRA आहेत असे समजायचे आणि करायच्या.

थोरांचे बोल कसे समजूत घालणारे असतात नै ;)
किती झालं तरी रेवती'आज्जी' मोठ्याच असणार ना शुचि'मामी'पेक्षा!

उगा 'परीची चिमणी' करतेय ही मामी. ल्ही कि दोन शब्द.

श्री. रा. रा. बॉब,
आपला सरडा गेल्याचे (गेल्याचे म्हनजे मेल्याचे. आमच्याकडं असंच लिहीतात.)समजले. आमची गेल्या वर्षी तुमच्या घरच्या बागेतल्या पार्टीमध्ये एकदा भेट झाली होती. सुंदर निळसर शर्ट चड्डी घातलेला तो सरडा पाहून मी अत्याधिक आश्चर्यानं किंचाळले. ते ऐकून सरड्यानं आपले कपडे काढून तो चॉकलेटी झालेला पाहून मला पुन्हा ओरडावेसे वाटले. पण आधीच्या ओरडण्यानं दोन चार माणसं धक्का बसून कोमात गेल्यानं आवंढा गिळून गप्प बसले.
तर ते असो. मुळात तो रंग बदलणारा सरडा असल्याचे नंतर समजले. आपण मीटिंगमध्ये नेहमीच कसे सेफ राहू शकता त्याचं उत्तर सरड्यासारखं रंग बदलणं जम णं हेच असू शकेल. पुन्हा असो.
एकदाच भेटून मला आश्चर्याचा धक्का देणार्‍या सरड्याचा 'सोल पिस्स्फुली रेस्ट' करो हीच आकाशातल्या बापाकडं प्रार्थना.

कळावे,
(आतून आनंदी)
शुचि

असं काही बाही लिहावं! सोप्पं असतंय.

आदूबाळ's picture

16 Apr 2014 - 6:58 pm | आदूबाळ

__/\__ :))

"अ‍ॅकॉर्डिंग टू अवर भग्वदगीता, द सोल चेंजेस इट्स बॉडीज लाईक युवर लेट शॅमिलियन चेंजेस इट्स कलर्स" वगैरे तारेसुद्धा तोडता येतील!

शुचि's picture

16 Apr 2014 - 7:00 pm | शुचि

हाहाहा :) मस्त.

साती's picture

16 Apr 2014 - 7:24 pm | साती

भारी आहे शोकसंदेश!

सुहास..'s picture

16 Apr 2014 - 6:44 pm | सुहास..

एकदा मॅनेजर सांगत होता , अरे हे सर्व एक्स्ट्रा - करिक्युलम अ‍ॅक्टिविटी आहेत !!

मी " सर मी इथ काम करायला येतो , हे फालतुचे धंदे करायला येत नाही !! '
( आधीच भेंडी दिवसाचे १२ तास खाता आमचे, २ तास ट्रॅव्हलिंग चे, आणि वर हे केक थापुन घ्या तोंडाला !! )

कधी ही ऑफीस पार्टीज ला हजर नसलेला
खडुस

ऑफीसात कशासाठी जातो आपण - अगदी हेच्च हेच्च माझ्या मनात येतं .

फेरफटका's picture

16 Apr 2014 - 9:16 pm | फेरफटका

माफ करा, पण मला तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे तेच नाही कळलं.

आपल्या सुख-दु:खात कुणी सहभागी झालं तर आपल्याला बरं वाटतच ना, मग ईतरांच्या सुख-दु:खात आपण औपचारिकता म्हणून सहभागी व्हायला काय हरकत आहे? बरं, एका सहीनं तुमचा असा कितीसा वेळ 'वाया' जातो, जो तुम्ही अदरवाईज सत्कारणी लावणार असता?

हा प्रकार न आवडणं / पटणं हे देखील समजू शकतो, पण त्याचा ईतका राग करणं, त्याला शिव्या देण्याईतका गंभीर नाहीये.

भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)

शुचि's picture

16 Apr 2014 - 9:20 pm | शुचि

भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)

धन्यवाद.

नक्की विचार करेन.

आत्मशून्य's picture

16 Apr 2014 - 9:30 pm | आत्मशून्य

अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ......

होतं. होतं असं कधी कधी... याप्रकारात कधी आपण शिकारी असतो तर कधी शिकार इतकचं.... स्थान स्थळ आणी स्तवन... यातच काय तो फरक.

परवा खरं तर वैतागूनच हा धागा काढला होता. खरच फार फार वैतागले होते. पण बर्‍याच प्रतिक्रियांनी स्वतःमध्येच डोकावून पहाण्याची संधी मिळाली. माझा आत्मकेंद्रितपणा लक्षात आला. खरं स्वपरीक्षणासाठी, या धाग्याचा खूप उपयोग मला झाला. पेट थेरपी यांचे विशेष आभार ज्यांनी धाग्याला किंचीत बोचरी पण आवश्यक कलाटणी दिली. अन्य सर्व प्रतिसादकांचे आभार आहेतच.