✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंगीत, रसरशीत मिर्च्या

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 01/26/2014 - 23:26  ·  लेख
लेख
मला या रंगीबेरंगी रसरशीत मिर्च्या फार आवडल्या म्हणुन टिपल्या. गणपाशेठ, पेठकरसाहेब, स्वाती यांसारखे चविष्ट मिपकर त्यांना न्याय देतीलच. m1a m1 m2 m3 m4 m5 m6 m7 मोरया m8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5160 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

हाय...हाय...हाय!

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/26/2014 - 23:39 नवीन
हाय...हाय...हाय! स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल कस्ल झ्याक फोटू काढलत व्हं! :)
  • Log in or register to post comments

मस्तच!

रेवती
Mon, 01/27/2014 - 00:02 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्त...

आनन्दिता
Mon, 01/27/2014 - 03:33 नवीन
मस्त... त्या कापलेल्या मिरच्यांचा फोटो भोकाड पसरल्या सारखा आलाय!
  • Log in or register to post comments

भोकाड पसरल्या सारखा

रमेश आठवले
Mon, 01/27/2014 - 13:59 नवीन
१+
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

क्लास!!!

लॉरी टांगटूंगकर
Fri, 01/31/2014 - 00:12 नवीन
मला तो जांभई देणारा वाटला. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

छान आलेत फोटो

दिपक.कुवेत
Mon, 01/27/2014 - 12:36 नवीन
ह्या रंगीत मिरच्या दिसतात मात्र दिलखेचक
  • Log in or register to post comments

आयला काय जबरा फोटो आले आहेत.....

मुक्त विहारि
Mon, 01/27/2014 - 13:33 नवीन
(फोटोग्राफी अजिबात न येणारा, महाभाग) मुवि
  • Log in or register to post comments

ऊफ्फ्फ...!

प्रभाकर पेठकर
Tue, 01/28/2014 - 15:04 नवीन
क्या बात है, साक्षीजी. तुम्ही चुकीच्या व्यवसायात पडलात हो. छायाचित्रण शिक्षणासाठी तुमचा वर्ग लावावा म्हणतो.
  • Log in or register to post comments

खूप मस्त!

पैसा
गुरुवार, 01/30/2014 - 23:28 नवीन
अप्रतिम! फ्रेश रंग आणि तितकेच छान फोटो!
  • Log in or register to post comments

या तिन्ही एकत्र असल्या की

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 01/31/2014 - 01:07 नवीन
या तिन्ही एकत्र असल्या की त्याला आमचा वाणी 'ट्रॅफिक सिग्नल' मिरच्या म्हणतो.
  • Log in or register to post comments

हम्म!

पिवळा डांबिस
Fri, 01/31/2014 - 02:40 नवीन
या तिन्ही एकत्र असल्या की त्याला आमचा वाणी 'ट्रॅफिक सिग्नल' मिरच्या म्हणतो.
परदेशात गेल्यावर आपल्या 'राणी'ची आठवण काढत बसणारे खूप पाहिलेत; पण आपल्या 'वाण्या'ची आठवण काढणारी ही पहिलीच!!!! ;) भाग्यवंत तो वाणी आणि भाग्यवंत त्याच्या त्या मिरच्या!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ज ब रा हा!!!

पिवळा डांबिस
Fri, 01/31/2014 - 02:36 नवीन
खर्‍या कलावंताचं हे आसं आसतंय बघा. त्यांना कशातही सौंदर्य शोधून दाखवता येतंय!! नायतर आमी, तिच्यायला, आयुष्यभर मिरच्यांची भजी खाल्ली, पण त्यांचा फोटू काढायचं कधी सुचलंच नाय!!! जियो!!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

सुवर्णमयी
Fri, 01/31/2014 - 05:09 नवीन
छान टिपले आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Fri, 01/31/2014 - 16:38 नवीन
मस्त ! :) बाकी प्रत्येक मिर्चीत बळवंत पटवर्धन दिसले ! ;) जाता जाता :- आज तोच प्रश्न पुन्हा स्वतःला विचारावासा वाटतो,आपली नाम मुद्रिका प्रकाशचित्रावर उमटवण्याची खरचं गरज असते ? ते बर्‍याच देवळात एकाध्या टाईलवर, एखाद्या दगडावर अमुक अमुक यांनी समर्पित केला आहे,किंवा यांच्या स्मरणार्थ असे लिहलेल असतं ना... तसा काहीसा फिल येतो मला.. मिर्चीतला तिखटपणा आपल्यात नाही, हे ठावुक असल्याने हा जाता जाता चा टंकन उध्योग केला आहे बरं का बळवंतराव ! ;)
  • Log in or register to post comments

बाणा,...

सर्वसाक्षी
Fri, 01/31/2014 - 22:36 नवीन
तुलना पटली नाही रे:) एखाद्या देवळात देणगीदाराने आपले नाव प्रदर्शित करावे की नाही हा चर्चेचा विषय असायला हरकत नाही. पण स्वतःच्या घरावर नावाची पाटी लावायला कुणाची हरकत का असावी मी कुणी नामांकित प्रकाशचित्रकार नाही आणि माझी चित्रे कुणी माझ्या नकळत माझ्या परवानगीशिवाय बिनदिक्कत स्वतःची म्हणून वापरावीत इतक्या मोठ्या मनाचाही नाही. असो.
  • Log in or register to post comments

तुलना पटली नाही रे:)

मदनबाण
Mon, 02/03/2014 - 11:47 नवीन
तुलना पटली नाही रे:) हरकत इल्ले ! एखाद्या देवळात देणगीदाराने आपले नाव प्रदर्शित करावे की नाही हा चर्चेचा विषय असायला हरकत नाही. पण स्वतःच्या घरावर नावाची पाटी लावायला कुणाची हरकत का असावी ह्म्म... हरकत नाही. पण पाटी ही कलाकुसर युक्त आणि योग्य ठिकाणी लावली असेल तर दरवाजाची शोभा अधिक वाढवु शकते.फोटोत देखील ते करता येणे अशक्य नाही असे मला वाटते.लक्ष आधी पाटीवर जावे की दरवाजावर हे त्याच्या मालकावर अवलंबुन आहे,त्याची इच्छा अर्थात मान्यच आहे.पण नक्की दरवाजा आधी लक्षात यावा की पाटी याचा मालकाने देखील विचार करावा...कारण दरवाजाचे प्रदर्शन प्रामुख्याने व्हावे अशी मालकाची इच्छा असावी असे इथे धरुन चालतो.दरवाजावर पाटी असेल आणि पाहणारा जर डोळ्यांचा योग्य वापर जाणत असेल तर दरवाजावर बसवलेली पाटी कुठेही असेल तरी तो ती वाचलेच याची खात्री आहे. मी कुणी नामांकित प्रकाशचित्रकार नाही आणि माझी चित्रे कुणी माझ्या नकळत माझ्या परवानगीशिवाय बिनदिक्कत स्वतःची म्हणून वापरावीत इतक्या मोठ्या मनाचाही नाही ह्म्म... हा सुद्धा मालकाच निर्णय आहे आणि तो मान्यही आहे.परंतु मग मला माझी तुलना परत आठवते ! जर भगवंताकडे तुम्ही मला हे दे, मला ते दे म्हणता, तेव्हा तुम्ही याचक आहात्,इथे सर्वकाही देणारा तोच आहे हे तुम्ही मान्य केले आहेत.मग त्याच देवाच्या देवळासाठी खर्च करताना तुम्हाला पाटीवर नाव नोंदवण्याची तसदी का घ्यावी वाटते ? कारण जर सर्वकाही देणार तोच आहे,आणि त्याच्यामुळेच जर तुमच्याकडे अर्थशक्ती आली आहे... तर दात्यासाठी /त्याच्या प्रित्यर्थ काही करण्यावर याचकाने स्वतःच्या नाव लावुन खर्च करण्याचा अट्टहास नसावा असे मला तरी वाटते ! तसेच जर तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी आणि इतरांना आनंद देण्यासाठीच जर फोटो काढत असाल तर...स्वतःचे नाव त्यांवर उमटवणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही.तेव्हढा मनाचा मोठेपणा आणणे नक्कीच अवघड नसावे असे मला वाटते. ;) {बळवंतराव इतक दणदणीत नाव असणारे जेव्हा, इतक्या मोठ्या मनाचा नाही असे म्हणतात याचे खरं तर नवल वाटले मला.} तुम्ही इथे जे फोटो डकवत आहात ती काही किलोबाइट पेक्षा अधिक नसावीत असा माझा अंदाज आहे,त्यामुळे त्याच्या कितपत फायदा व्यावसायिक {प्रिंट्-फ्लेक्स...इ, आणि अनेक} कारणांसाठी होईल ते मला ठावुक नाही.शिवाय जालावर इतकी सॉफ्टवेअरस उपलब्ध आहेत की तुमचा जो मूळ उद्देश {स्वामित्व} आहे,तो सहजपणे बदलला जाउ शकतो.फोटोग्राफीचा आनंद लुटताना, ते एक कलाकॄती पाहताना फोटोत पटकन दिसणारे नाव माझ्यातरी पटकन नजरेत येते. हा माझ्या नजरेचा दोष मानावा का ? की इतरांनाही ते लक्षात येते ते मला ठावूक नाही.परंतु जर फोटोंना बारीक बॉर्डर्,फ्रेम करुनही ते सहज साध्य करता येइल असे वाटते. अर्थात हे सर्व तेव्हाच लागु आहे जेव्हा तुम्हाला दुसर्‍यांनी तुमच्या फोटोचा अधिक आनंद घ्यावा असे वाटते की स्वामित्वाचा मुद्दा तुमच्यासाठी त्यापेक्षाही महत्वाचा आहे ते. तुम्ही अधिक काळजी घेउ इच्छित असाल तर... फोटोची EXIF माहिती नष्ट करु शकता.त्यामुळे तुम्ही तुमची तांत्रिक माहिती सुद्धा इतरांना मिळणार नाही.उदा.शेवटचा फोटोची माहिती खालील प्रमाणे आहे. तुमच्याकडे मूळ फोटो EXIF सकट असेल आणि अपलोड केलेल्या { विदआउट EXIF }फोटोचा वापर कर्त्या बरोबर वाद झाल्यास ही माहिती महत्वाची ठरेल असे वाटते.{इथे तुमचे नाव फोटोवर आहे हे गॄहीत धरले आहे} f/11 shutter speed :- 1/100 ISO-1600 step:-+0.3 Focal length :- 90mm Metering mode :- Matrix Flas :- No Camera Model :- Nikon D90 जाता जाता :- मी स्वतः फोटोग्राफी एक हौस म्हणुन शिकतो आहे,आणि माझ्या सहीत नेहमी {हौशी फोटोग्राफर} असेच लिहलेले आढळेल.कुठल्याही प्रकारे आपणास दुखवण्याचा हेतू नाही,केवळ मला जे तटस्थपणे वाटते तेच मत व्यक्त केले आहे.सहीचा वापर अयोग्य आहे असे माझे मत नाही पण त्यामुळे मूळ फोटोचा आनंद घेताना फरक पडु नये असे मात्र नक्कीच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

तुलना पटली नाही रे:)

सर्वसाक्षी
Mon, 02/03/2014 - 22:57 नवीन
पाटीचा उद्देश स्पष्ट आहे, एका कोपर्‍यात नाव असले तर विशेष कष्ट न घेता चित्र कातरुन नाव वगळुन चित्र वापरता येते. त्यामानाने मूळ चित्राला नाव कापल्याने बाधा येईल अशा प्रकारे नाव टाकल्यास ते खोडुन चित्र बळकावायला जास्त कष्ट पडतील. चोर घराचा दरवाजा, फटफटी, तिजोरी वगैरे सर्व प्रकारची कुलुपे उघडु शकतात पण तरीही आपण कुलुपे लावायचे सोडत नाही. निदान चित्र परवानगी शिवाय वापरणार्‍याला 'चित्र कुणाचे ते माहित नव्हते' अशी सबब तरी मिळु नये आणि वेळ पडल्यास आपले स्वामित्व सहज सिद्ध करता यावे हाच उद्देश आहे. चित्र कुणाला आवडल्यास त्याने अवश्य घ्यावे, जेव्हा कुणी मला विचारते तेव्हा मी आनंदाने परवानगी देतो. मात्र माझ्या नकळत माझे चित्र स्वतःचे म्हणून दुसर्‍या कुणाला वापरु द्यायला माझा विरोध आहे. एका मराठी प्रकाशनाने असा प्रकार माझ्या चित्राच्या बाबतीत केल्यानंतर मी माझी चित्रे नांव घातल्याशिवाय प्रसिद्ध करत नाही. तुमच्या चित्रावर तुम्ही नांव घालावे की नाही आणि घातले तर कसे घालावे हा तुमचा निर्णय असेल, त्यावर मला भाष्य करायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुलना पटली नाही रे:)

मदनबाण
Tue, 02/04/2014 - 09:19 नवीन
तुलना पटली नाही रे:) हरकत नाही. खरेतर तुम्हीच या तुलनेचे उत्तर दिले आहे, ते म्हणजे देवळातल्या पाटीवर नाव कोरणार्‍या व्यक्तीकडे देखील मनाचा मोठेपणा नाही. ;) वेळ पडल्यास आपले स्वामित्व सहज सिद्ध करता यावे हाच उद्देश आहे. ओक्के. एका मराठी प्रकाशनाने असा प्रकार माझ्या चित्राच्या बाबतीत केल्यानंतर मी माझी चित्रे नांव घातल्याशिवाय प्रसिद्ध करत नाही. ह्म्म्म... या बद्धल आपला अनुभव शब्दबद्ध केला असल्यास तो वाचायला नक्की आवडेल. नसेल तर तो करावा ही विनंती,कारण यामुळे अनेकांना त्याचा उपयोग होवु शकेल. { यात मी देखील आलो. ;) } तुमच्या चित्रावर तुम्ही नांव घालावे की नाही आणि घातले तर कसे घालावे हा तुमचा निर्णय असेल, त्यावर मला भाष्य करायचे नाही. धन्यवाद. आपली फोटोग्राफी आवडत असल्यानेच या आधी आणि अत्ता देखील विचार करण्याचे कष्ट घेतले. कळावे. लोभ असावा. आपलाच... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

धन्यवाद

सर्वसाक्षी
Tue, 02/04/2014 - 13:29 नवीन
एका मराठी मासिकाने मी काढलेला घरच्या बाप्पाचा फोटो आपल्या पुढील वर्षीच्या अंकात एका गणपती विषयक लेखात खुशाल टाकला होता. पिच्छा पुरवल्यावर 'हा फोटो कुणाचा हे माहित नसल्यामुळे असाच वापरला' असे उत्तर मिळाले. आणखी थोडा पत्रव्यवहार झाल्यावर 'जर आपलाच फोटो असेल तर पुढील अंकात आपला नामनिर्देश करु' असे आश्वासन मिळाले. मात्र हा फोटो कुठुन मिळविला हे सांगणे हरप्रकारे टाळले व अखेर 'ते तुम्हीच शोधा' असे उडवाउडवीचे उत्तर मिळाले. या मंडळींनी इ-मेल वर माझा फोटो वापरल्याची कबुली दिली आहे तसेच फोटो मी टिपलेलाच आहे हे मी सहज सिद्ध करु शकतो. आमच्या एका महान वकील मित्राला जेव्हा सवड असेल तेव्हा सदर प्रकाशनास नोटिस दिली जाईल. प्राप्त माहितीनुसार निर्मिलेल्या कलाकृतीवर नाव असो वा नसो, निर्मात्याचा उपजत स्वामित्व ह्क्क असतो असे समजले आहे. अशा परिस्थितीत जर कलाकृतीवर आपले नाव व कॉपीराईट चिन्ह असेल तर खटला भरला असता सदर चौर्य हे अज्ञानामुळे वा निरागसपणे घडले नसून जाणिवपूर्वक व समजुन करण्यात आले आहे हे न्यायालयाच्या निदर्शानास आणुन देणे व अर्थातच सिद्ध करणे सोपे जाईल व 'चूक' ही पळवाट कृत्यकर्त्यास बंद होईल. दाखविलेल्या स्वारस्याबद्दल व आपुलकीबद्दल आभारी आहे. साक्षी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आणि

तिमा
Sun, 02/02/2014 - 17:18 नवीन
त्या कापलेल्या मिरच्यांचा फोटो भोकाड पसरल्या सारखा आलाय! आणि शेवटचा फोटो 'सेक्सी' आलाय असे म्हणता येईल. अप्रतिम फोटोग्राफी!
  • Log in or register to post comments

सेक्सी आल्यात मिरच्या!

प्यारे१
Sun, 02/02/2014 - 19:07 नवीन
सेक्सी आल्यात मिरच्या! (अपेक्षित कमेंट करणारांना दशभुजा गणपती, पौड 'फाटा' सद्बुद्धी देवो)
  • Log in or register to post comments

वाह!

दक्षिणा
Mon, 02/03/2014 - 13:07 नवीन
सुरेख आलेत फोटो :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा