✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

द टायटन

त
तुषार काळभोर यांनी
Sun, 08/19/2012 - 23:35  ·  लेख
लेख
* १. मला फुटबॉलमधलं काही कळत नाही. * २. त्यावेळी पेप्रात वैग्रे जे वाचलं होतं, त्यावरून आणि आता नेटावरनं थोडंफार माहिती करून घेऊन लिहितोय. मागील १० वर्षे हा फोटो मनावर कोरला गेलाय... फुटबॉल वर्ल्डकपः२००२- अंतिम सामना - ३० जून २००२ जर्मनी वि ब्राझील जर्मनी : जगातील सर्वोत्तम बचाव असलेला संघ (आणि जगातील सर्वोत्तम गोलकीपर व संघाचा कर्णधार-ऑलिवर कान) ब्राझील : जगातील सर्वोत्तम आक्रमण असलेला संघ (३ R: रोनाल्डो, रिवाल्डो आणि रोनाल्डिनो) (उदा. द्रविड, लक्ष्मण, सचिन आणि गांगुलीची मधली फळी किंवा भागवत-चंद्रशेखर-प्रसन्ना-वेंकटराघवनची फिरकी चौकडी) खरंतर या ३ रो-रि-रो मुळे ब्राझील हॉट फेवरिट होते. त्यामानाने जर्मनीकडून कुणाला फार अपेक्षा नव्हत्या. पात्रता फेरीत अपयशी ठरून पहिल्यांदाच जर्मनीला वर्ल्डकप प्रवेशासाठी झुंजावं लागलं होतं. अर्जेंटिना, इटली व गतविजेता फ्रान्स यांच्यापैकी एक फायनलचा दुसरा प्रतिस्पर्धी असेल, अशी अटकळ होती. पण, भरभक्कम बचावाच्या जोरावर-अंतिम सामन्यापूर्वी फक्त १ गोल स्वीकारत- जर्मनीने अंतिम सामन्यात धडक मारली. जर्मनीचा आघाडीचा स्ट्रायकर- बलाक (Michael Ballack) ला उपांत्य सामन्यातील येलो कार्डची शिक्षा म्हणून फायनल खेळता येणार नव्हती. अर्धी लढाई जर्मनीने तिथेच गमावली. शिवाय अभेद्य मानला जाणारा ऑलिवर कानसुद्धा १०० % फिट नव्हता. त्याच्या उजव्या हाताच्या अनामिकेचे स्नायू दुखावले गेले होते. ग्रुपस्टेज व बादफेर्‍यांमध्ये कान ने केवळ १ गोल स्वीकारला होता. ६७व्या मिनिटापर्यंत ऑलिवर अभेद्य होता. पण ६७व्या मिनिटाला त्याच्या हातून चूक घडली. रिवाल्डोने गोलच्या दिशेने मारलेला एक फटका ऑलिवरने अडवला, पण त्याला बॉल पकडून ठेवता आला नाही. बॉल त्याच्या हातातून निसटला आणि गेला....रोनाल्डोच्या पायापाशी!!! पहिला गोल. सामन्याच्या ६७व्या मिनिटाला केवळ ब्राझीलच्या सुदैवाने गोल आणि बाराच मिनिटांनी रोनाल्डोने आणखी एक गोल केला- हा गोल मात्र १००% रोनाल्डोचा होता. अंतिम सामन्यात ऑलिवर कान वर २ गोल स्वीकारण्याची वेळ आली. जर्मनी हरला होता. शिट्टी वाजताच ब्राझीलच्या खेळाडूंनी जल्लोष चालू केला आणि ऑलिवर जागेवरच मटकन खाली बसला. सर्वाधिक गोलः गोल्डन बूट - रोनाल्डो २र्‍या क्रमांकाचे गोलः सिल्वर बूट -मिरोस्लाव क्लोज-जर्मनी (५गोल-सौदी अरेबिया विरुद्ध हॅटट्रिक- सर्व पाच गोल हेडरने ) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: गोल्डन बॉल - द टायटन-ऑलिवर कान गोलपोस्टला हताशपणे टेकून बसलेला टायटन आज १० वर्षांनीही लोकांच्या मनातून गेलेला नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3816 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

बरोबरे

मी-सौरभ
Sun, 08/19/2012 - 23:38 नवीन
कान हा माझ्या अत्यंत आवडत्या फुटबॉल पटूंपै़की एक आहे :)
  • Log in or register to post comments

क्लास!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/19/2012 - 23:39 नवीन
क्लास!
  • Log in or register to post comments

एक राहिलं...

तुषार काळभोर
Sun, 08/19/2012 - 23:40 नवीन
Image removed. स्पर्धेच्या इतिहासात केवळ एकाच गोल कीपरला गोल्डन बॉल सन्मान मिळालाय.
  • Log in or register to post comments

मस्तच, पण हात फार लवकर आखडता

गणपा
Mon, 08/20/2012 - 01:07 नवीन
मस्तच, पण हात फार लवकर आखडता घेतलात. अजुन लिहा की.
  • Log in or register to post comments

अहो...

तुषार काळभोर
Mon, 08/20/2012 - 06:03 नवीन
कळत नसलेल्या गोष्टीवर लिहिलंय. उगाच कशाला लांबण लावायचं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

येक नंबर हो... !

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/20/2012 - 08:21 नवीन
येक नंबर हो... ! :-)
  • Log in or register to post comments

If

मन१
Mon, 08/20/2012 - 08:26 नवीन
If anyone can then Oliver Kahn असं काहीतरी म्हणायचे पठ्ठ्याबद्दल. ब्राझीलच्या R मध्ये रॉबर्टो कार्लोस ह्या दिग्गजाचही नाव येतं. फुटबॉलातलं मलाही कै ठाउक नै.
  • Log in or register to post comments

कार्लोस हे नाव का येतं त्यासाठी हा व्हिडीओ....

मोदक
Mon, 08/20/2012 - 10:02 नवीन
(अवांतर) कार्लोस हे नाव का येतं त्यासाठी हा व्हिडीओ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

फुटबॉल च्या जगात जर्मनी हा

sagarpdy
Mon, 08/20/2012 - 11:15 नवीन
फुटबॉल च्या जगात जर्मनी हा तसा सर्वोत्तम बचाव असलेला संघ मानला जात नाही. आपल्यावर किती गोल होत आहेत याची चिंता न करता धडाधड गोल टाकणारा म्हणून ओळखला जातो. परंतु २००२ च्या स्पर्धेत ऑलिवर कान ने मात्र जर्मनीचा बचावही किती बळकट आहे हे दाखवून दिले. टीप : इटली चा बचाव सर्वोत्तम मानला जातो.
  • Log in or register to post comments

मस्तच !!

सानिकास्वप्निल
Mon, 08/20/2012 - 16:04 नवीन
मस्तच !!
  • Log in or register to post comments

आवडल. पण त्रोटक वाटलं

स्पा
Mon, 08/20/2012 - 16:27 नवीन
आवडल. पण त्रोटक वाटलं
  • Log in or register to post comments

त्रोटक

तुषार काळभोर
Mon, 08/20/2012 - 22:07 नवीन
मला मुळातच फुटबॉल मधलं काही कळत नाही. केवळ हा एक प्रसंग मनावर कोरला गेलाय, त्याच्याविषयी मनातलं उतरवलं, झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छान ...

छोटा डॉन
Mon, 08/20/2012 - 22:39 नवीन
>>केवळ हा एक प्रसंग मनावर कोरला गेलाय, त्याच्याविषयी मनातलं उतरवलं, झालं. :) छान केलं तुम्ही असे म्हणेन. ऑलिव्हर कान्हचे बॅडलक असेकी नेमके त्या वेळेस ब्राझिल फायनलला आले, ब्राझिलचे ४-स्टार 'आर' टिममध्ये असताना आणि त्यांनी संपुर्ण स्पर्धा गाजवली असता हा कप त्यांना मिळाला नसता तर तो त्यांच्यवर अन्याय झाला असता. त्या दिवशी मॅच संपल्यावर गोलपोस्टपाशी सुन्न होऊन बसलेला कान्ह आजही सगळ्यांच्या लक्षात आहे पण त्या वेळेस सगळ्यांचा ( अलमोस्ट बरं का,गणपा आणि मेव्या आदींनी पर्सनली घ्यायचे कारण नाही, धन्यवाद) सपोर्ट हा ब्राझिललाच होता. बाकी आठवण एकंदरीत छान, आवडली. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हे मात्र खरं. कान भारी पण

बॅटमॅन
Wed, 08/22/2012 - 19:31 नवीन
हे मात्र खरं. कान भारी पण सपोर्ट मात्र ब्राझिललाच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

लिखाण आवडलं

जाई.
Mon, 08/20/2012 - 21:02 नवीन
लिखाण आवडलं
  • Log in or register to post comments

आठवण छान!

पैसा
Mon, 08/20/2012 - 23:24 नवीन
लिखाण आवडलं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा