न्याय दर्शन आणि बिग बॅंग
न्यायदर्शन आणि बिग बॅंग
न्याय दर्शनात अणुवादाचा (दार्शनिक विवेचनाचा) उगम दिसतो. प्रत्येक प्राकृत पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो, हा सिद्धांत. " अंत्यावयवत्वम् अणुत्वम् " (ज्या पदार्थाचे पुढे आणखी अवयव पाडता येत नाहीत),त्याला अणु म्हणावे अशी अणूची व्याख्या आहे. सृष्टीच्या आरंभी चार प्रकारचे अणु असतात. परमेश्वराच्या इच्छेने त्यांच्यात हालचाल उत्पन्न होते व मग दोन अणूंच्या एकत्रीकरणाने द्व्यणुक, मग त्यणुक व नंतर चतुर्णुक उत्पन्न होतात. अशा रीतीने स्थूल पृथ्वी, स्थूल जल, स्थूल तेज व स्थूल वायू ही द्रव्ये अस्तित्वात येतात. जेव्हा सृष्टीचा प्रलय व्हावयाचा असतो तेव्हा द्व्यणुकाचे दोन अणु एकमेकापासून विभक्त होतात व द्य्वणूकाचा नाश होतो व मग याच क्रमाने त्र्यणुक व चतुर्णुक यांचाही नाश होतो व सृष्टीतील सर्व पदार्थांचा विनाश होतो.
बिग बॅंग ची प्राथमिक माहिती असलेल्यांनाही आठवण होईल की प्रथम फिरणारे एलेक्ट्रॉन्स वगैरे काहीच नव्हते. जे काही होते त्यात हालचाल सुरू झाली. प्रथम एक एलेक्ट्रॉन फिरणारा हायड्रोजन तयार झाला, मग हेलिअम व मग मोठे अणु.
प्राचिन काळी संशोधन केंद्रे नव्हती हे मान्य करूनही साम्य विस्मयकारक आहे की नाही ?
(आमचे पूर्वज महान होते ... नक्कीच. त्यांच्याकडे असलेल्या कित्येक गोष्टी आज आमच्याकडे नाहीत, उदा. शेपूट.)
शरद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अर्ध सनातनी
ज्या मधे कल्पना विलास असतो पण
शरदराव,
ओह
बिग बँग थियरी
फोर्स्ड मूव्ह
साम्य विस्मयकारक नाही
जरा गंमत म्हणून बघा कीं
अ, ब, क ही साम्ये नाहीतच
न्याय दर्शन आणि बिग बॅंग या