फोडणे-वाढवणे

आपण जेंव्हा देवाला वगैरे जातो व नारळ फोडतो. पण नारळ फोडण्याच्या कृतीस नारळ वाढवणे असे म्हणतात.
जेंव्हा बांगडी फुटते तेंव्हा सुद्धा बांगडी फुटली असे न म्हणता बांगडी वाढली असे म्हणतात. ज्या गोष्टी आपण अक्षरशः फोडतो, त्याला वाढवणे हे गोंडस नाव का द्यावे याचा बोध काही केल्या झालेला नाही.
देवाच्या ठिकाणी फोडलेल्या नारळाला 'नारळ वाढवणे' असं म्हणायचं; तेच निवडणुका लागल्या की वर्तमानपत्रात बातमी येते की 'अमूक अमूक यांच्या हस्ते भागातल्या प्रचाराचा नारळ फुटला.' त्याला मात्र नारळ वाढवला असे म्हणायचं नाही. हे काय गौडबंगाल आहे बरे?????????
कोणी हा गोंधळ निस्तरेल का?
At Wits End

बांगडी

बांगडी वाढली असे म्हणतात कारण पुर्वी च्या काळी बांगडी फुटणे अशुभ मानले जात असे.
मग अश्यावेळी बांगडी वाढते म्हणजे नविन बांगड्या घेतल्या जातात कारण बांगड्या हे सौभाग्याचे लक्षण आहे.
असे मला वाटते.

Nerd

बरोबरे गं ऋचा

नारळ वाढवतात हे मला माहित नव्हतं मी तरी नारळ फोडायचा असंच ऐकलंय...

प्रथा

पूर्वी स्त्री विधवा झाली की ती बांगड्या फ़ोडत असे.त्यानंतर बांगड्या वापरत नसे.
बांगड्या(हिरव्या काचेच्या) सऊभाग्य-अलंकारामध्ये मोडतात.
म्ह्णून चुकीने जरी बांगडी फ़ुटली तरी अशुभ...म्हणून वाढवली असे म्हणण्याचा प्रघात पडला.

आपला
हर्षद

बांगडी

बांगडी वाढवली म्हणजे "नवरे वाढवले" असे तर नव्हते ना? ह. घ्या. Wink
मला हे वाक्प्रचार माहित नव्हते. नारळ फुटला, बांगडी फुटली असेच आजीसकट सगळे लहानपणापासून म्हणायचे. 'बळी चढवला' हे मात्र ऐकले आहे.

अरे पण

अरे पण अजुन नारळाचा मुद्दा तसाच राहिला की.

मी एकदाच म्हणालो होतो घरी, "मी फोडतो नारळ" आजीनं इतकं सुनावलं..."आजकालची कार्टी तुम्ही जळ्ळी अक्कल म्हणून नाही..आपण काय बोलतो, काय शब्द वापरतो जरा नीट विचार करुन बोलावं"

अजुनपर्यंत मला माझं काय चुकलं हेच कळलं नाहीय्ये!

का बुवा "नारळ वाढवणे" म्हणत असावेत?

अरे वा...

छान माहिती मिळतिये.
चालु द्या.

आपलाच,
(शाळेतील भांडणात कित्येकांचे डोके,कित्येकांच्या पाट्या,कित्येक खिडक्या "वाढवलेला")
मनोबा

नारळ हे नरमुंडाचे

शेंडी डोळे असतात म्हणुन नारळ हे नरमुंडाचे प्रतीक म्हणुन वापरले जाते.
नारळ फोडतो म्हणजे आपण लौकिक अर्थाने नरबळी देत असतो.
उद्घाटन करताना / शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात

माणुस

माणुस मेल्यावर जेंव्हा त्याला जाळतात तेंव्हा चितेवर त्याच्याबरोबर सोबत म्हणुन नारळ पाठवतात.
त्याला नारळ फुटणे असे म्हणतात.

म्हणुन आजी ने तुमची तासंपट्टी केलि असवी.

असेच कुंकू

असेच कुंकू पुसले असे म्हणत नाहित कुंकू वाढवले असे म्हणतात ऋचा शी सहमत आहे.

आईशप्पथ! हे

आईशप्पथ!
हे असं आहे होय?

बरं झालं सांगितलंत Smile

मंगळ्सुत्र..

मंगळ्सुत्र पण वाढवले असेच म्हणतात.. सौभाग्याचे लक्षण म्हणुन अशुभ शब्द टाळत असावेत.
>>शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात
- बरोबर

पिढिजात

पिढिजात व्यापारी, दुकान बंद केले(रात्री) अस न म्हणता दुकान वाढवले अस म्हणतात..

ढोंग

भारतीय समाजात 'ढोंगीपणा' हा राजमान्यच आहे. म्हणूनच नागडे सत्य कोणी स्वीकारु शकत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारांना गोंडस रुप दिले जाते. निरोप घेताना 'मी जातो' न म्हणता 'मी येतो' असं म्हणतात तोही यातलाच प्रकार! जातो म्हटले की परत येणारच नाही हे कशावरुन ? त्या भीतिने उलट का बोलायचं ?