श्री रा रा परिकथेतीलजी राजकुमारजीसाहेब
मला झालेल्या आकलनानुसार सदर जिफ श्री अविनाश कुलकर्णी यांनी श्री गणपा यांनी मिपावर लिहिलेल्या रेसिपीमधील चित्रांना एकत्र करुन प्रदर्शन करण्यासाठी बनवली आहे. या जिफमधे श्री गणपा यांचे आभार मानायचा उद्देश नसुन श्री गणपा यांचे कर्तृत्व वाचकांसमोर पोहोचवणे अशी भुमिका श्री कुलकर्णी यांची आहे असे मला वाटते हे मी नमुद करु इच्छितो.
श्री गणपा यांच्या पाककृतींना मिपाचे कोंदण लाभले नसते तर इतर अनेक तथाकथित सुगरण बायाबाप्यांप्रमाणे त्यांचे कुणीही भेट न देणारे ब्लॉग आंतरजालीय धुळ खात पडले असते याची श्री गणपा यांना सुद्धा कल्पना आहे. त्यामुळे मिपा, मिपा मालक आणि संकेतस्थळ समृद्ध करण्यासाठी मोलाचा वाटा असणारे ज्येष्ठ संपादक यांचे आभार मानणे गरजेचे आहे.
अर्थात हा प्रश्न वैयक्तिक असुन ज्याची त्याची जाण वगैरे अनेक गोष्टी यात अंतर्भुत आहेत. असो.
धन्यवाद.
--अवलिया
अविनाशरावजी हा प्रतिसाद वैयक्तीक पातळीवर घेउ नये.
जिफ जेपिजी चित्रे हे बहुतेकदा कलाकाराच्या वैयक्तीक अनुभुतीतून उतरतात. ( उदा: पहा ही जिफ ) ज्यानी तो अनुभवच घेतलेला नाही त्याना ती भावना कशी कळणार. आवलिया अजूनही मवालियाच आहेत. सुकालिया झाल्यावर त्याना बर्याच गोष्टी उमजतील अशी आषा करुयात. ( सुकालिया हे मिपा सदस्याचे नाव नाहिय्ये गैर समज करून घेउ नये.)
कोणाला कोणत्यावेळेस काय सुचावे हे मानसशास्त्राने जोखले आहे.
बहुतेक वेळेस नव्या कल्पना /चित्रे , जिफ्स हे बहुतेकवेळा तीन महत्वाच्या ठीकाणी असताना सुचतात असा एक सर्व्हे आहे. ही तीन ठीकाणे म्हणजे बेड, बस ,अॅन्ड टॉयलेट
( उदा: "घ्या केळं" हे कोणाला बसच्या मागच्या सीट वरंच सुचलं.
भविष्याचा विचार करता करता ... ओरडणार्या कोणाला "तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे हे सार्वजनीक टॉयलेट मधेच सुचलं)
हे वाक्य वाचताना मी "कर्तुत्व" ऐवजी "वक्तृत्व" असे वाचले
अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही.
एका मवालिया ला शाळेत असताना "सोन्याचे उत्पादन कोठे होते" हे विचारल्यानन्तर त्याने चंदुकाका सराफ ह्यांच्या दुकानात .. असे उत्तर दिले होते.
" ऐश्वर्या प्रितीच्या तसल्या जिफ्स कोठे मिळतात " असे विचारल्यावर त्याने "यरलवक्ष.कॉम" असे उत्तर दिले होते.
"सूर्य कोठे मावळतो" या प्रश्नाचे उत्तर त्याने पलीकडच्या सोसायटीच्या मागे असे दिले होते. असो संपादक आणि मालक ह्यांचे आभारप्रदर्शन केले नाही तरी चालते हे मवालियांना कळेल आहे हेच पुष्कळ. वाचनमात्र होण्याने सुकामेवा सुसाट सुटतो असे ते म्हणाले नाहीत हेच आपले नशीब समजायचे.मवालियांना जिफे डाऊनलोडवून मिळते.
अविनाशकुलकर्णीजी तुम्हाला नाउमेद करण्याचे हे डावपेच आहेत. नाऊमेद होउ नका. " की जोडीला टारु; फोडू जोमाने टाळू " या न्यायाने तुमच्यावर केलेला प्रत्येक वार एक नवी जिफ जन्माला घेऊन येईल
थोडी ढील द्या आपोआप हे पेच उध्वस्त होतील.
घाबरु नका.......तुमच्या मिनसे (मिसळपाव नवनिर्माण सेना) तुमच्या सोबत आहे.
- विकिभाऊ
श्री रा रा परिकथेतीलजी राजकुमारजीसाहेब
आपण दाखवलेल्या सहानुभुतीबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्यासारखे कळकळ असणारे सदस्य हीच मिपाची शान आहे. आपल्याला माझी परवड होत आहे असे वाटत असेल तर मी आपल्याशी सहमत नाही हे मी निक्षुन सांगु इच्छितो. कदाचित आपल्या सायबर क्याफेमधील कोंदट वातावरणात राहुन आपल्याला माझ्याबद्दल गैरसमज झाला असावा. तरी आपला गैरसमज दुर होण्यास हा प्रतिसाद मदत करेल. मात्र तसे न झाल्यास आपण माझ्याविषयी वावड्या उठवुन लोकांमधे गैरसमज निर्माण करण्यास हातभार लावत आहात अशा अर्थाचे पत्र प्रशासनास लिहिण्याचे मनात आहे.
धन्यवाद.
--अवलिया
कुलकर्णी साहेब..
छान आहे हो ही 'जिफ'!!
इतर वादांवर पडदा टाकण्यासाठी.. ''सगळ्यांचेच आभार!!''
आपण सगळे एका समृद्ध परिवाराचा भाग आहोत.. आभार न मानल्याने कोणाचेही कर्तूत्व वा महत्त्व कमी होत नाही!
-
कोकणी फणस
मालकांनी (कसे ते विचारू नये) पैसे खर्चुन नविन चर्चा काढण्यासाठी "काथ्याकुट" ही सुविधा पुरवली. आहे. कॄपया एखाद्या काथ्याकुटाचा प्रतिसाद बनवू नये.
=; =; =; कुटवडी =; =; =;
ज्ञानेशभौ.....
जि.फ. : जिभेचे फरगाडे.... (जे इथे सगळे जण काढत असतात ;-) )
GIF : Graphic Interchange Format
जो पाहीजे तो घ्या. फुकट आहे :))
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
अधिक माहितीसाठी हे पहा.
बाकी, कॉलेजच्या कट्ट्यावरही जी.एफ. हा शब्द परिक्षेच्या आसपास, पैसे संपल्यावर, जिच्यावर लाइन मारतो तिचा बा/भाऊ पोलीस आहे कळल्यावर नेहमी वापरला जायचा ;)
जि.फ. = GIF हा एक file format आहे. Graphics Interchange Format ह्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे GIF. अधिक माहिती
अजून एक असाच प्रचलित शब्द म्हणजे जेपेग = JPEG.
अधिक माहिती
1. JPEG or JPG: Joint Photographic Experts Group (graphics file compression standard)
२. MPEG: Moving Picture Experts Group (defines compression standards)
३. GIF: Graphic Interchange Format
४.PNG :Portable Network Graphics (Comparatively better then JPEG and support binary transparency and alpha channel transparency)
-
कोकणी फणस
सगल्या नोनवेज..काहि सोडल्या तर..
हिंसेचा निषेध!
"Non-violence leads to the highest ethics, which is the goal of all evolution. Until we stop harming all other living beings, we are still savages."
~ Thomas Edison
( अजून इथे वाचा http://choices.cs.uiuc.edu/~f-kon/vegetarian.html )
जाता जाता गणपाभाउ तुम्ही कुशल बल्लवाचार्य आहात यात शंकाच नाही..
प्रतिक्रिया
श्री रा रा
धाग्यावर
श्री रा रा
अविनाशराव
श्री.टारझन-
श्री रा रा
श्री.
जिफ मधे
संस्कृतीद
छान
छान!!
छान...!
जि.फ. चा फुल
मालकांनी
मान्य.
+१ चुचु
ज्ञानेशभौ..
अधिक
जि.फ. = GIF हा
आभार.
झ्याक रेसीपी जी.एफ.
जिफ : GIF
GIF: Graphic Interchange
आवडले.
जिफ
नोनवेज..