छत्रपती संभाजी महाराजांचे एक तथाकथित चित्र
लेखनप्रकार
काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीराजांविषयी एक फेसबुक पोस्ट पाहण्यात आली. तिच्याबरोबर एक चित्रही होते. अर्थातच मी मोठ्या उत्सुकतेने लगेच उघडली. चित्र तर मी आजपर्यंत पाहिलेले नव्हते. छत्रपती संभाजीराजांची अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी चित्रे आजवर उजेडात आली असल्याने छत्रपती संभाजीराजांचे नवीन चित्र म्हणजे फार मोठा शोध होता. त्याला तितक्याच बारकाईने तपासून पाहायला हवे होते. पण दुर्दैवाने ते चित्र कुठले ते त्या पोस्टमध्ये काही लिहिलेले नव्हते.
इंटरनेटवर बरेच शोधूनही मला काही ते चित्र मूळ कुठले ते सापडले नाही. त्या पोस्टमध्ये असा उल्लेख होता की छत्रपती संभाजीराजांचे नाव पुसट अश्या डच अक्षरात लिहिलेले आहे, पण मला ती अक्षरे त्या चित्रात काही सापडली नाहीत. आपले डच भाषा आणि मराठा इतिहासाचे तज्ज्ञ बॅटमॅन यांची मदत घेऊन डच मजकूर वाचता आला असता. चित्राचे हाय रेझोल्युशन स्कॅन नसल्याने मोठे करून पाहण्यावर मर्यादा येत होत्या, त्यामुळे मला ती गोष्ट तपासता आली नाही. नंतर अचानक दुसरेच काही शोधताना मला ते चित्र सापडले. छत्रपती संभाजी महाराज या ऐवजी 'शंभूजी' अश्या नावाखाली ते टाकल्याने ते चित्र सहज सापडत नव्हते. मूळ चित्र हे रिक्सम्युसिअम या नेदरलँडमधील संग्रहात आहे.
मूळ चित्र
=====
https://www.rijksmuseum.nl/en/collection/RP-T-1895-A-3066
चित्र पाहताच काही गोष्टी पटल्या नाहीत. शक्यतो याबाबत काही न लिहिण्याचा माझा विचार होता, पण मला हेच चित्र एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावरपण आढळले. त्यामुळे नकळत किंवा अनावधानाने भलतीच चूक कुणाकडून होऊ नये आणि ह्या चित्राची योग्य ती तपासणी व्हावी या हेतूने मी हा लेख लिहितो आहे. त्यामागे कुणाच्या भावना दुखावणे अथवा चुका दाखवणे हा उद्देश नाही. तसा समज कोणी कृपया करून घेऊ नये.
चित्र मोठे करून पाहताच मला जाणवले की डच मजकूर चित्रात नाही. चित्राच्या वरती काही पुसट मजकूर आहे खरा, पण तो फारसी आहे, डच नाही. सगळ्या गोष्टी बारकाईने तपासून पाहून आणि त्यावर बरेच दिवस विचार करून माझे असे मत झाले आहे की हे चित्र छत्रपती संभाजीराजांचे असणे शक्य नाही.
या चित्राच्या खोटेपणाची करणे सविस्तर सांगतो.
१) पुसट मजकूर मोठा केल्यावर असे दिसले की तो मजकूर उलट म्हणजे मिरर-इमेज असा आहे. असे होणे विचित्र वाटले तरी त्याचे एक सोपे कारण आहे. या चित्रावर एक आयताकृती चिट्ठी चिटकवलेली होती आणि मजकूर त्या चिट्ठीवर होता. चिट्ठी आधीच्या पानांमुळे चित्रावर दाबली जाऊन त्याची उलट प्रतिमा चित्रावर उमटली आहे. चित्र नीट पाहिले तर चिट्ठी कुठे चिटकवली होती ते दिसते.
हा मजकूर उलट करून घेतल्यावर आणि कॉन्ट्रास्ट वाढवल्यावर असा दिसतो.
यात शंभूजी अथवा संभाजी लिहिलेले आहे का ते मी शोधून पाहिले, पण मला तसा शब्द काही आढळला नाही. याउलट खालील विसंगत गोष्टी सापडल्या.
- हा मजकूर धार्मिक आहे (म्हणजे कुराण अथवा तत्सम ग्रंथातील), कारण धार्मिक मजकुरात सर्व उच्चारचिन्हे (जेर, जबर, पेश) दाखवलेली असतात (एकही अक्षराचा चुकीचा उच्चारही होऊ नये यासाठी). सध्या मजकुरात ती चिन्हे गाळलेली असतात. नक्की कुठला मुस्लिम धर्मग्रंथ आहे ते माझा अभ्यास नसल्याने मला सांगता येणार नाही.
- मध्यभागी असलेला शब्द 'अल्लाहू' असा वाचता येतो. हा शब्द चित्राशी विसंगत आहे, तो तिथे नको असायला हवा.
२) हिंदू व्यक्तीच्या चित्रात शक्यतो कपाळावर लावलेले गंध आणि कान टोचलेले आणि कानात आभूषण दाखवतात. या चित्रात तसे काही आढळत नाही. अगदी चित्रात दाखवलेल्या लहान मुलातही हिंदू असल्याचे काही लक्षण दाखवलेले नाही. तुलनेसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे हे दुसरे चित्र पहा.
३) छत्रपती संभाजीराजांच्या इतमामाला साजेशे अलंकार या व्यक्तीने घातलेले नाहीत. मोत्यांची माळ, शिरपेच, तुरा, बाजूबंद असॆ कुठलेच अलंकार नाहीत. अगदी साध्या सरदाराच्या चित्रातदेखील आपल्याला असे अलंकार दिसतात. हे चित्रातल्या लहान मुलाबाबतही (छत्रपती शाहू असायला हवा?) खरे आहे.
४) फक्त शंभूजी असं म्हणून या व्यक्तीला छत्रपती संभाजीराजे मानता येणार नाही कारण याच कालखंडात (१७००) नंदुरबार इथे शंभूजी देसाई नावाची व्यक्तीपण होऊन गेली. नंदुरबारच्या शंभूजी देसायाने मुस्लिम धर्म स्वीकारला असा उल्लेख औरंगझेबाच्या समकालीन अखबारात आहे.
५) हे चित्र नक्की छत्रपती संभाजीराजांचे आहे असे रिक्सम्युसिअमचेही ठाम मत नाही, यासाठीच तर त्यांनी चित्राच्या नावापुढे प्रश्नचिन्ह टाकले आहे. (मूळ शीर्षक Deccan-heerser (Maratha king Shambhuji?), anonymous, c. 1650 - c. 1699). या चित्राचा अभ्यास करणाऱ्या लंडन येथील संशोधकांशी माझा जुजबी परिचय ई-मेल द्वारे होता. त्यांना माझ्या शंका पाठवल्यानंतर त्यांनी त्यावर काही उत्तर पाठवलेले नाही.
वरील बाबींचे समाधानकारक निराकरण होत नाही तोपर्यंत या चित्राला छत्रपती संभाजीराजांचे चित्र म्हणणे योग्य होणार नाही.
तुमचे काय मत आहे?

वाचने
18303
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
मनो सर,
In reply to मनो सर, by बॅटमॅन
सहमत आहे.
In reply to मनो सर, by बॅटमॅन
+१
छान
या गोष्टीचा छडा लावल्याबद्दल
सहमत
@ मनो
In reply to @ मनो by माहितगार
२) चित्राच्या वर जो काही कागद
२) चित्राच्या वर जो काही कागद ; बहुधा चित्रच -किंवा जाड पृष्ठच राहीले असणार पातळ कागदाच्या मागे अशी चिठ्ठी असती तर त्या पातळ कागदाला फाटून आली असती आणि मिरर इमेज राहिली नसती .हा मजकूर (किंवा त्याची चिठ्ठी) चित्राच्या मागे नसून त्याच्या विरुद्ध असलेल्या (opposite) पानावर असावा. ते पान व चित्राचे पान एकमेकावर दाबले जाऊन चित्रावर उलटा मजकूर (mirror image) उमटणे सहज शक्य आहे.In reply to २) चित्राच्या वर जो काही कागद by डॉ सुहास म्हात्रे
हे पण शक्य आहे, खास करुन
सहमत आहे.
याचबरोबर छत्रपती संभाजी
In reply to याचबरोबर छत्रपती संभाजी by मनो
प्रतिक्षा आणि शुभेच्छा
In reply to याचबरोबर छत्रपती संभाजी by मनो
वाट बघतोय
In reply to याचबरोबर छत्रपती संभाजी by मनो
वाट बघत आहे
In reply to याचबरोबर छत्रपती संभाजी by मनो
इथे पण द्याल ते अस्सल चित्र.
अजून एक लक्षात आलेले
पट्टीवरचा मजकूर
In reply to पट्टीवरचा मजकूर by हारुन शेख
वरच्या प्रतिसादात डॉ.
In reply to वरच्या प्रतिसादात डॉ. by माहितगार
असे वाचावे
In reply to पट्टीवरचा मजकूर by हारुन शेख
कुराणात येशू????
In reply to कुराणात येशू???? by टवाळ कार्टा
एकाच श्रेणीत आहेत
In reply to एकाच श्रेणीत आहेत by manguu@mail.com
च्चायच्च कबूतर....मग इतकी
In reply to कुराणात येशू???? by टवाळ कार्टा
कुराणात येशू
In reply to कुराणात येशू by चित्रगुप्त
बाब्बो....२५ पैकी २४ सारखे तर
In reply to पट्टीवरचा मजकूर by हारुन शेख
नेमका रेफरन्स दिल्याबद्दल
चित्रावर व्यापक अभ्यास आणि चर्चा
थोडी नवीन माहिती
पाने जोडायची राहून गेली.
नंदुरबारवाली शंभूराजाची
चित्राचे आणखी सूक्ष्म निरिक्षण
In reply to चित्राचे आणखी सूक्ष्म निरिक्षण by चित्रगुप्त
मिरर इमेज आहे - आरशात
वा!!
अतिशय उत्तम चर्चा
तर मग हे संभाजी राजांचे चित्र का म्हणवले जाते ?
वेगळे धर्म?
या पुस्तिकेत या चित्राबद्दल काय लिहीले आहे
माहितीपूर्ण चर्चा.
संगमरवर
रोचक लेख
मूळ चित्राची लिंक आता काम करत
मागील वर्षी नेदरलँड्समध्ये
In reply to मागील वर्षी नेदरलँड्समध्ये by श्रीगुरुजी
स्पेशल विनंती करावी लागते
अशा प्रकारचे लेख आणखीही यावेत.