वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे
कोण म्हणतं , आता काही शक्य नाही
अरे , मोदी हे फक्त आडनाव आहे
खोऱ्याने ओढत जा तुम्ही , जोपर्यंत हातात टिकाव आहे
वाव आहे , अजूनही सुधारायला ( स्वतःला ) वाव आहे
धंद्याला लावणाऱ्यांचा देशाबाहेर एक गाव आहे
पळून जाण्यासाठी पैलतीरी , सरकारी नाव आहे
ललित गेला , विजय गेला , निरव शांतता झाली
येतील हळूहळू बिळातून बाहेर एकेक
साल्यांच्या मनातच काळे डाव आहेत
सर्व साले एकजात बरबटलेले
म्हणूनच सुधारायला वाव आहे
वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे
कोण म्हणतं , आता काही शक्य नाही
अरे , " मोदी " हे फक्त आडनाव आहे
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
19 Feb 2018 - 6:52 pm | गामा पैलवान
शहरात लाडवांचा काय भाव आहे ?
शहरात गाढवांचा घूमजाव आहे !
-गा.पै.
19 Feb 2018 - 10:57 pm | manguu@mail.com
Narendra Modi was crying in private. From nowhere Mahatma Gandhi appeared.
Asked him the reason for his sorry state of affairs
Modi crying nonstop , confessed that all these new age Modis are spoiling his Surname
Mahatma was unperturbed. Said Look at me my dear child
Am I crying ?
21 Feb 2018 - 8:54 am | कलंत्री
DSK चा सध्या जो काही विषय चालला आहे त्यावर मटा मध्ये संपादकिय टिपण्णी आली की DSK मूळे महाराष्ट्रीयन उद्योजक बदनाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी / गांधी बदनाम होत असतील तर काय चूकीचे आहे.
सध्या आपला तो बाब्या आणी दुसर्याचे ते कार्ट अशी स्थिती आहे.
21 Feb 2018 - 1:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अजून राज्/उद्धव ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही का? 'मराठी माणसाला 'पद्धतशीरपणे' डावलले जात आहे ...मोदी पळाला पण सावंत अडकला..' टाईपची विधाने..