प्रश्न साधासाच होता...
प्रश्न साधासाच होता,
त्याने उत्तर टाळले..
आणि अबोलीचे फूल
तिच्या केसात माळले.
त्याचा रोजचाच खेळ,
चार दाणे पक्ष्यांसाठी..
पाखरांच्या नकळत,
त्याने हक्काने पाळले.
क्षणभर विसावला
जीव बकुळीच्या खाली..
सडे अनाम दु:खाचे
तिने पायाशी ढाळले.
आहे सुखाचा पाऊस,
डोळे भरले कशाने?
वेडे मन तुझे का ग
मृगजळास भाळले?
सुंदर!
माय म्हटलंत, भरून पावले.
सुंदर !
आह !
वाह
अप्रतीम
भारी
पैजारबुवा, अ.आ., स्नेहांकिता,
सुंदर!
छान.
प्रश्न साधेच असतात..
पैताई, बिरुटे सर, माधुरी.....
अप्रतिम
आवडेश
नाखु, मुवि. __/\__
वाह्