Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्योति अळवणी on Fri, 12/29/2017 - 19:44
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
भोपळ्यात बसून आपल्या लेकीकडे जाणाऱ्या हुशार म्हातारीची गोष्ट आपण सर्वांनीच  लहानपणी ऐकलेली आहे. तिला अडवणाऱ्या कोल्ह्याल आणि वाघाला ती सांगत असते,"लेकीकडे जाईन तुप-रोटी खाईन जाडी-जुडी होईन मग तू मला खा."  गम्मत सांगू का? आमच्या लाहानपणी माझे आजी-आजोबा अगदी क्वचित राहायला यायचे आमच्याकडे. त्यावेळी माझी आई खरच आजीला आवडणारे पदार्थ मुद्दाम करायची. आजीसुद्धा,'अग कशाला इतकं करतेस?' अस म्हणत पण कौतुकाने खायची ते पदार्थ. त्यावेळी कधी कळल नाही पण आता जाणवत; लेकीने आपल्यासाठी आपल्या आवडी-निवडीचा विचार करून खास काहीतरी केलं आहे याचं समाधान तिच्या चेहेऱ्यावर तेव्हा दिसायचं.  काळ पुढे सरकला आणि माझं लग्न झालं. आता अधून मधून माझी आई माझ्याकडे येते.  मी मात्र तिला पिझ्झा-पास्ता असले आंग्ल पदार्थ करून देते. कारण मला माहित आहे की तिला आवडणारे पदार्थ तर ती स्वतः करून खाते. पण हे असे पास्ता आणि पिझ्झ्यासारखे पदार्थ तिची इच्छा असली तरी ती एकटी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणार नाही. आणि बाहेरचे पदार्थ तिला पचणार देखील नाहीत. म्हणून मग आमचा घरातच एकूण घाट असतो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर देखील मला एक समाधान दिसतं;. तिच्यासाठी कौतुकाने वेगळं काहीतरी मी करते याच. अर्थात मला स्वयंपाकात लागणारा गोडा मसाला, थालीपिठाची भाजणी, लिंबाचं-कैरीचं लोणच असे खास पदार्थ मी हट्टाने तिच्याकडून करून घेते. संक्रांतीची गुळ-पोळी तर तिची अगदी खास. माझ्या लेकी देखील विकतची खायला तयार नसतात. आजीची golden रंगाची पोळीच हवी. ही विकतची brown पोळी नको असं त्याचं सांगण असत. आणि आजी देखील लाडक्या नातींचा हट्ट हौसेने पुरवते.  आता काळ अजून पुढे सरकला आहे. आता माझी लेक देखील मोठी झाली आहे. नोकरीच्या निमित्ताने ती दुसऱ्या शहरात राहाते. मी जेव्हा तिला भेटायला जाते तेव्हा तिला आवडणारे पदार्थ मुद्दाम करून घेऊन जाते. स्वतंत्र राहाणारी माझी लेक मी गेले की खुश असते. कारण जोपर्यंत मी असते तोपर्यंत तिला स्वयंपाकघरातून सुट्टी मिळते. रोज आपणच करायचं आणि आपणच खायचं याचा आलेला कंटाळा तिच्या चेहेऱ्यावर मला स्पष्ट दिसतो.  मग माझ्या दोन-तीन दिवसांच्या वास्तव्यात मी तिला आवडणारे पदार्थ करत असते. ते खाताना ती जाम खुश असते. मात्र तिला गोडा मसाला आणि लोणची पापड नको असतात. तिचं म्हणणं असतं,'आई, हे सगळं मिळतं बाजारात. तू नको इतकी दगदग करुस. थोडा वेळ स्वतःसाठी काढ.' मग मी निघायच्या अगोदर ती मला  आग्रहाने एखाद्या छानशा नवीन रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाते. मला देखील कौतुक वाटतं की सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बिझी असणारी माझी लेक मी गेले की मुद्दाम माझ्यासाठी वेळ काढते आणि मला बाहेर घेऊन जाते. मात्र परवा तिच्याकडून निघाले तेव्हा त्या भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट आठवली आणि हसू आलं.. ती लेकीकडे जाड-जुड व्हायला जाणारी ती आई आणि आजची लेकीला खायला घालून जाड-जुड करण्यासाठी जाणारी आई.... क्या जमाना बदल गया हे! आणि तरीही आईच्या मनात असणारी लेकीच्या कौतुकाची भावना मात्र तीच आहे.
  • Log in or register to post comments
  • 5160 views

प्रतिक्रिया

Submitted by एस on Fri, 12/29/2017 - 20:19

Permalink

:-) एक वेगळाच पर्सपेक्टिव्ह!

:-) एक वेगळाच पर्सपेक्टिव्ह!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Mon, 01/01/2018 - 17:15

In reply to :-) एक वेगळाच पर्सपेक्टिव्ह! by एस

Permalink

+११

+११
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Sat, 12/30/2017 - 12:26

Permalink

+१

+१ . छान .
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sat, 12/30/2017 - 12:49

Permalink

बदल छान मांडलाय.

बदल छान मांडलाय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 12/31/2017 - 10:09

Permalink

मस्त लिहले आहे....

मस्त लिहले आहे....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sun, 12/31/2017 - 16:17

Permalink

मस्त

लेक ते लेकीची आई हा बदल छान मांडला आहे लेकीचा पालक लेकायनी नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 12/31/2017 - 18:08

Permalink

मनोगत आवडले !

मनोगत आवडले !
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Sun, 12/31/2017 - 22:11

Permalink

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.

हृद्य मनोगत. बहिणाबाईंनी लिहून ठेवलय .... लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 01/03/2018 - 11:28

In reply to लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. by चामुंडराय

Permalink

बसलो मी देवध्यानी

बसलो मी देवध्यानी काय मधी हे संकट बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी मंग माहेरून आली सासरले कशासाठी ? सासुरवाशीन - आरे लागले डोहाये सांगे शेतातली माटी गाते माहेराचं गानं लेक येईल रे पोटी देरे देरे योग्या ध्यान एक काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते देव कुठे देव कुठे भरीसनी जो उरला अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला --कवयत्री : बहिणाबाई चौधरी
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 01/01/2018 - 17:09

Permalink

मस्त...

मस्त सुरेख आवडले. आजची लेक जेव्हा आई होईल तेव्हा तिची मानसिकता कशी असेल? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Mon, 01/01/2018 - 18:10

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Tue, 01/02/2018 - 23:37

Permalink

+1

मस्त आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Wed, 01/03/2018 - 02:10

Permalink

खुप आवडले.

खुप आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखरमोघे on Wed, 01/03/2018 - 09:14

Permalink

आपला लेख, खास करून त्यातला

आपला लेख, खास करून त्यातला बदललेला approach, आवडला. जरी आपण लिहिले आहे ... ती लेकीकडे जाड-जुड व्हायला जाणारी ती आई आणि आजची लेकीला खायला घालून जाड-जुड करण्यासाठी जाणारी आई.... क्या जमाना बदल गया हे! .......तरी "ही आईच्या मनात असणारी लेकीच्या कौतुकाची भावना" (लेकीला खायला घालून जाड-जुड करण्याची) लेकीला कळल्यास पन्चाईतच!! :०))
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on गुरुवार, 01/04/2018 - 15:44

In reply to आपला लेख, खास करून त्यातला by शेखरमोघे

Permalink

अगदी खरं शेखरजी. पण माझी लेक

अगदी खरं शेखरजी. पण माझी लेक अजून तरी फारच बारीक आहे. त्यामुळे तिला चालतं मी हौसेने खायला घालते ते.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Wed, 01/03/2018 - 20:35

Permalink

छान लेखन!

आवडले. :-)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com