आवळ्याचं लोणचं

केडी's picture
केडी in पाककृती
20 Nov 2017 - 7:49 pm

AmlaPickle1

साहित्य

१५ ते २० आवळे
३ चमचे मोहरी
२ चमचे मेथ्या
२ ते ३ चमचे लाल तिखट [थोडेसे काश्मिरी वापरले, तर रंग छान येतो]
१ चमचा हळद
१ चमचा हिंग
२ ते ३ मोठे चमचे तेल, फोडणीसाठी
मीठ, चवीनुसार (मला साधारण ३ ते ४ चमचे लागले)

कृती

एका पातेल्यात आवळे बुडतील एवढे पाणी घालून, त्यात एक चमचा हळद टाकून, झाकण ठेवून, आवळे 5 ते ७ मिनिटे वाफवून घ्या [आवळे खूप शिजवून घ्यायचे नाहीयेत, नाहीतर चिरताना त्याचा लगदा होईल]. आवळे बाहेर काढून गार करत ठेवा.

Step1  Step2

पळी मध्ये २ चमचे मोहरी आणि २ चमचे मेथ्या वेग वेगळे गॅस वर भाजून घ्या. बाजूला गार करत ठेवा. आवळे गार झाले कि त्याच्या मोठ्या फोडी करून घ्या.

Step3  Step4  Step5

मेथ्या आणि मोहरी मिक्सर मधून फिरून बारीक करून घ्या.

Step6  Step7

एका कढईत तेल गरम करून त्यात १ चमचा मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्या. ह्यात आवळ्याचे तुकडे घालून ते एक ते दोन मिनिटे परतून घ्या.

Step8  Step9

ह्यात लाल तिखट आणि चवीनुसार मोठं घालून ढवळून घ्या. २ ते ३ चमचे मोहरी-मेथ्या ची पूड घालून, परतून घ्या.

Step10  Step11  Step12

लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. एक दोन दिवसात लोणचं मुरलं कि छान लागतं.

प्रतिक्रिया

अगदी चटपटीत लोणचं दिसतय. फोटू छान आलेत.

babu b's picture

21 Nov 2017 - 12:03 am | babu b

छान

गम्मत-जम्मत's picture

26 Nov 2017 - 9:43 pm | गम्मत-जम्मत

मागच्या आठवड्यात केले होते. सेम पाकृ. लगेच संपतं :)

देशपांडेमामा's picture

27 Nov 2017 - 10:51 am | देशपांडेमामा

करुन बघणार नक्की !

देश

II श्रीमंत पेशवे II's picture

28 Nov 2017 - 12:19 pm | II श्रीमंत पेशवे II

मला खूप आवडत आवळ्याचे लोणचे

धन्यवाद झटपट रेसिपी बद्दल
पण एक शंका

अशा पद्ध्तीने बनविलेले लोणचे ट=किती दिवस टिकते ?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2017 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा

मा. मिपाअधिक्षक यांसी,

केडी नामक इसमाचे धागे अदृष्य करणे बाबत..

सदर इसम गेली काही वर्ष मिपावर अत्यंतिक लाळेरे धागे टाकुण मिपावासीयांचे डा-एट बि'घडवतो आहे.सदर इसमाचे धागे व विशेषतः त्यातील फोटू हे अत्यंतिक जिव्हालौल्य खवळविणारे असतात.तसेच ज्या घरांमधे मिपावरील सदर घागे उघड उघड (मंजी पि.शी.वर! ;) ) उघडले जातात तेथील गृहचारिणी तत्सम घरातील कारभार्‍यांस स्क्रीन आडून आडून येता जाता... "बघा...नैतर तुम्ही" "असं कैतरी लिहित जा,करत जा जरा...बसत्यात फेसबुकावर लोळत" असे अपमाणजण्य दगड हाणीत असतात.
वरील सर्व कारणास्तव या केडी नामक पदार्थयेडी आयडीस सौम्य फोटू टाकणेस सांगावे. ..

धण्यवाद. ;)
===================================
धाग्याखालील तीन व वरील टॉपच्या फोटूत तळाशी समाधिस्थ जाहलेला- अत्रुप्त आत्मा.

केडी's picture

5 Dec 2017 - 11:39 am | केडी

....प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
:-))
:-))

>>अशा पद्ध्तीने बनविलेले लोणचे ट=किती दिवस टिकते ?>>

आम्ही स्टॅाक बरणी फ्रिजमध्ये खाली ( भाजी ट्रेवरचा खण) ठेवतो. एवढा गारवा पुरेसा आहे. थोडे थोडे छोट्या बॅाटलमध्ये काढून वापरतो. बरेच दिवस टिकते.
मोहरी दळून घुसळून केला जाणारा प्रकारही आवडतो.

केडीशेफ हे असले धागे नाकावर टिच्चून चालू ठेवा न घाबलता. समाधिस्थ आत्म्यांची झोप उडवा.

हो फ्रिज मध्ये भरपूर टिकते....
धागे सुरूच ठेवणार हो.... :-)) :-))

II श्रीमंत पेशवे II's picture

4 Dec 2017 - 2:33 pm | II श्रीमंत पेशवे II

बरेच दिवस टिकते. - एक किलो चे केले तर २ महिने टिकेल असे वाटत आहे

जागु's picture

4 Dec 2017 - 3:30 pm | जागु

कातील फोटो.

स्मिता.'s picture

5 Dec 2017 - 5:19 pm | स्मिता.

असले कातिल फोटो बघून मीसुद्धा हे लोणचे करून पाहिले. स्वतःची भर म्हणून मोहरी आणि मेथीसोबत भाजलेली बडीशोपसुद्धा घेतली. लोणचे मस्तच झाले हे वेगळे सांगायला नको :)

दीपा माने's picture

29 Dec 2017 - 4:03 am | दीपा माने

साधे, सोपे पण उत्कृष्ट चवीचे आणि गुणधर्माचे लोणचे आहे. खुण साठवून ठेवली आहे. धन्यवाद!

मदनबाण's picture

29 Dec 2017 - 9:20 pm | मदनबाण

मस्त !
मिरची आवळा पण लयं भारी लागत... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pallo Latke... :- Shaadi Mein Zaroor Aana

अनिंद्य's picture

28 Mar 2020 - 3:16 pm | अनिंद्य

थोड्या तुरट-कडूसर चवीमुळे (आवळा+मेथी+मोहरी) फार आवडीचे. घरी असेच करतात फक्त दाणामेथी कमी आणि मोहरी जास्त असते. तळलेल्या हिरव्या मिरच्या टाकून रंगसंगती साधण्यात येते :-)