✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका अनावर कैफात

अ — अनन्त्_यात्री, Fri, 12/22/2017 - 10:42
एका अनावर कैफात लिहिली होती ती कविता नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत? मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली तेव्हा थोडी भुंडी पण थोडी खरीही वाटली ती कविता नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत? मग कापलं सपासप - वायफळ शब्दतण तेव्हा जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा जास्तच खरी वाटली ती कविता नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ? मग खोडायला गेलो दोन चार ओळी तेव्हा ओळीतल्या रिकाम्या जागेतून सण्णकन फणा काढत जिव्हारी डसली ती कविता

प्रतिक्रिया द्या
5578 वाचन

💬 प्रतिसाद (24)

जबरा

चाणक्य
Fri, 12/22/2017 - 10:54 नवीन
एकच नंबर.
  • Log in or register to post comments

आवडली...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 12/22/2017 - 11:45 नवीन
मस्त, सुरेख कचकन डसली कविता पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आवल्डी.... कविता नेक्स्ट डोर

पगला गजोधर
Fri, 12/22/2017 - 12:08 नवीन
आवल्डी.... कविता नेक्स्ट डोर ...
  • Log in or register to post comments

शब्दजिल्ब्यां वगळीता, अर्थ

पगला गजोधर
Fri, 12/22/2017 - 13:23 नवीन
शब्दजिल्ब्यां वगळीता, अर्थ गवसले नवे । आज दिसले काव्या, सखोल जे सर्वा हवे ।। अबोल शब्द बहरले, अभावे हळूच उमलले । ढोल हे सुखावले, मौन जागे तुझ्यासवे ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अहाहा!!!!

पुंबा
Fri, 12/22/2017 - 12:59 नवीन
अहाहा!!!! बर्‍याच दिवसांनी लखलखीत, बावनकशी कविता वाचायली मिळाली.
  • Log in or register to post comments

चपराक

नाखु
Fri, 12/22/2017 - 13:07 नवीन
मौनाची भाषा काही कमी नाही आवडलं नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

अतीव सुंदर! कल्पना

राघव
Fri, 12/22/2017 - 21:26 नवीन
अतीव सुंदर! कल्पना अत्त्युत्तम!! :-)
  • Log in or register to post comments

मस्तच !!!

हरवलेला
Fri, 12/22/2017 - 21:49 नवीन
मस्तच !!!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
Sat, 12/23/2017 - 11:01 नवीन
सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

प्रतिभा जेव्हा अशी उसळी घेते तेव्हाच उत्स्फुर्त आणि बावनकशी काव्

दुर्गविहारी
Sat, 12/23/2017 - 11:43 नवीन
खुपच छान ! प्रतिभा जेव्हा अशी उसळी घेते तेव्हाच उत्स्फुर्त आणि बावनकशी काव्य येउ शकते. कण्हत कुंथल काढलेल्या कविता एकताना आणि वाचताना जांभया आवरत नाहीत. या निमीत्ताने आरती प्रभुंच्या "ये रे घना ये रे घना" या काव्याच्या किस्स्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर!

प्राची अश्विनी
Sat, 12/23/2017 - 12:09 नवीन
अतिशय सुंदर!
  • Log in or register to post comments

वा! अस्सल बावनकशी कविता.

एस
Sat, 12/23/2017 - 20:33 नवीन
वा! अस्सल बावनकशी कविता.
  • Log in or register to post comments

दुर्गविहारी,"ये रे घना"चा

अनन्त्_यात्री
Sat, 12/23/2017 - 21:59 नवीन
किस्सा काय आहे ते सांगाल का? -आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

किस्सा सांगतो.

दुर्गविहारी
Mon, 12/25/2017 - 11:13 नवीन
आधी आरती प्रभु यांनी ये रे घना या कवितेचे फक्त एकच कडवे लिहीले होते, 'फुले माझी अळुमाळू, वारा पाहे चुरघळू'. हि कविता जेव्हा हॄद्यनाथांच्या हाती पडली तेव्हा त्यातील गेयता जाणवून त्यांनी गाणे करायचे ठरविले आणि खानोलकरांना बोलावून उरलेले कडवे पुर्ण करण्यास सांगितले. मात्र खानोलकारांनी बाळासाहेबांना सांगितले कि हे कडवे रचनाता आलेली प्रतिभा परत येणे कठीण आहे. म्हणून शांता शेळके यांना प्रभुकुंजवर उरलेले कडवे लिहीण्यासाठी बोलावले गेले, मात्र त्यांनाही पुढे जाता येईना. बाहेर गच्चीत पान खात खानोलकर उभे होते, अचानक ते आत आले आणि दुसरे कडवे लिहून घेण्यास सांगितले, 'टाकुनीया घरदार नाचणार नाचणार'. प्रतिभा अशी अवचित येते आणि काहीतरी भव्यदिव्य निर्माण करुन जाते. अजुन एक गाणे, 'ती येते आणिक जाते' हे ही अवचित आलेल्या प्रतिभेलाच उद्देशून आहे. बर्‍याचजणांना ते प्रेयसीला उद्देशून आहे असे वाटते, पण 'येताना कधी कळ्या आणिते अन जाताना फुले मागते' म्हणजे प्रतिभेच्या कळयाने निर्माण झालेली फुलेरुपी कविता असा सुप्त अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

क्या बात है! भारीच किस्सा. एक

एस
Mon, 12/25/2017 - 12:15 नवीन
क्या बात है! भारीच किस्सा. एक किस्सा शांताबाईंचा असाच आहे. सुरेश भट यांची गझल 'सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या...' मध्ये एक ओळ आहे 'पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे'. यातली 'तुझे हसू आरशात आहे' ही ओळ शांताबाईंनी सुचवलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

वा!

अभिजीत अवलिया
Tue, 12/26/2017 - 16:43 नवीन
वा! असेच मी मंंगेश पाडगावकर यांंच्या 'श्रावणात घन निळा बरसला' या काव्याबद्दल ऐकलेय. भर उन्हाळ्यात दादर ते चर्चगेट या जेमतेम अर्ध्या तासाच्या लोकल प्रवासात हे संंपूर्ण गीत त्यांंना सुचले असे ऐकलेय. अनन्त यात्री यांंची कविता देखील छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

एस, प्राची अश्विनी

अनन्त्_यात्री
Sat, 12/23/2017 - 22:01 नवीन
आपल्या प्रतिसादांबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

दुर्गविहारी, एस- पुन्हा आभार.

अनन्त्_यात्री
Tue, 12/26/2017 - 11:11 नवीन
आपण दिलेली प्रतिभा-प्रसादाची उदाहरणे आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/26/2017 - 12:33 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डॉ. दिलीप,

अनन्त्_यात्री
Tue, 12/26/2017 - 13:36 नवीन
प्रतिसादाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त कविता आहे.

शलभ
Tue, 12/26/2017 - 15:19 नवीन
मस्त कविता आहे.
  • Log in or register to post comments

अभिजीत अवलिया, शलभ

अनन्त्_यात्री
Wed, 12/27/2017 - 11:00 नवीन
आपल्या प्रतिसादांबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

माफ करा परंतु ...

गबाळ्या
Mon, 01/01/2018 - 09:08 नवीन
यातून तुम्हाला नेमकं काय व्यक्त करायचंय हे नीटसं कळालं नाही. (सहज वाटलं म्हणून ) तुमच्या बाकीच्या कविताही मी वाचल्या त्यातल्या काही छानही आहेत. त्यातल्या बऱ्याच कविता ह्या कविता या विषयावर आहेत. त्या सगळ्या वाचून असे वाटले कि त्यामार्फत तुम्ही तुमच्या कविता, कवितांची पद्धत 'justify' करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही आता पर्येंत काही चांगल्या कविता केल्या आहेत आणि इथून पुढेही चांगल्या कविता करू शकाल. त्यामुळे तुम्हाला असे 'justify' करण्याची गरज नाही. कविता करत रहा.
  • Log in or register to post comments

गबाळ्या. माफ करा परंतु

अनन्त्_यात्री
Wed, 01/03/2018 - 17:58 नवीन
माझ्या कवितांवरील कविता वाचून मी "माझ्या कविता, कवितांची पद्धत 'justify' करण्याचा प्रयत्न करीत आहे" हे आपणास का वाटले हे मला नीटसे कळले नाही. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

Recent comments

  • भोंदूगिरी...
    1 hour 22 minutes ago
  • खरातचं काय चुकलं? काही नाही…
    1 hour 31 minutes ago
  • भोंदूबाबा ह्याचा नक्की अर्थ…
    8 hours 6 minutes ago
  • छान लेखन !किंमत प्रणाली हे…
    8 hours 10 minutes ago
  • तरी नशिब
    10 hours 11 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा