Skip to main content
लेखक शब्दानुज यांनी रविवार, 03/12/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
"काका आहात का आत?" अस म्हणत मी काकांच्या घरात शिरलो. तर काका नेहमीप्रमाणे मिक्सर दुरुस्त करत बसले होते आणि काकू कधी मिक्सरकडे तर कधी काकांकडे करूण कटाक्ष टाकात होत्या. "काका तुम्हाला आधीपण म्हणालो होतो माझ्या अोळखीचा एकजण आहे , त्याकडे द्या दुरुस्तीसाठी " "राजे तुम्ही जन्मला ही नव्हता तेव्हा डिप्लोमा केला आहे मी. बघ कसा चालू होतो.." इति काका त्याच दिवशी संध्याकाळी काका , काकू आमच्याकडे चावी देऊन बाहेरगावी गेले. मी संधीचे सोने करत गुपचूप मिक्सर दुरुस्त करून ठेऊन दिला. दुस-या दिवशी बघतो तर काका मिक्सरला घेऊन बसलेले.. मग शेवटी अभिमानने काकांनी मिक्सर चालू केलाच काकूनी माझ्याकडे पाहून मिचकावलेले डोळे काकांनी पाहिलेच नाही..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5407
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया