प्रो कबड्डी - सिझन ५ - ले पंगा
नमस्कार मंडळी,
प्रो. कबड्डीच्या चौथ्या मोसमाचे मी जवळपास संपुर्ण महिनाभर वार्तांकान केले होते. जवळपास ३३ दिवस !
मागील वर्षापेक्षा या ५ वर्षाच्या सामन्यांची सुरुवात जवळपास एक महिना उशीराने सुरुवात होत आहे. उद्या २८ जुलै २०१७ पासुन सामने सुरु होतील. ३ महिने सलग वार्तांकन करणे हे माझ्यासाठी मोठेच आव्हान असणार आहे. सगळे सामने बघून मगच त्यावर लिहायचा विचार आहे. मागील वर्षी देखील सामना पाहुन झाल्यानंतर लगेच वार्तांकन लिहून इथे प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता तो सुफळ झाला. असो. तुणतुणे पुरे !
मागील वर्षांपेक्षा या वेळचे वेगळेपण म्हणजे तब्बल १२ संघ आणि जवळपास ३ महिने हे सामने चालणार आहेत. यावेळी दोन गट पाडण्यात आले असुन प्रत्येक गटात ६ संघ आहेत. सालाबादप्रमाणे याहिवर्षी संघांत इराणी आणि कोरियन खेळाडूंचा लक्षणीय सहभाग आहे.
जुने संघ :
१) यु मुंबा २) पुणेरी पलटण ३) दबंग दिल्ली ४) तेलुगु टायटन्स ५) जयपुर पिंक पँथर्स ६) बंगॉल वॉरियर्स ७) बंगळुरु बुल्स ८) पटणा पायरेटस
यावर्षी ४ नवे संघ येत आहेत.
९) गुजरात फॉर्च्युनजायंटस १०) हरियाणा स्टीलर्स ११) तमिळ थलैवाज १२) युपी योद्धा
तसं पाहिलं तर नवीन जुन्याला फार अर्थ राहिलेला नाहिये कारण मागील वर्षातील संघातील खेळाडू जवळपास पुर्णपणे वेगवेगळ्या संघांत गेले आहेत.
प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे.
सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स
सिझन २ : यु मुंबा
सिझन ३ : पटना पायरेटस
सिझन ४ : पटना पायरेटस
चला तर, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या !
उद्याचे शुभारंभाचे सामने :
सामना क्र. १
२८ जुलै २०१७, रात्री ८.०० वाजता (गच्चीबावली इनडोअर स्टेडिअम, हैदराबाद)
तेलुगु टायटन्स वि. तमिळ थलैवाज
सामना क्र. २
२८ जुलै २०१७, रात्री ९.०० वाजता (गच्चीबावली इनडोअर स्टेडिअम, हैदराबाद)
यु मुंबा वि. पुणेरी पलटण
मागील वर्षाच्या वृत्तांकनाचा दुवा इथे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपले खूप खूप आभार आणि
मागील सगळ्या सिझन प्रमाणे उत्तम खेळाची अपेक्षा
ह्या वर्षी अजुन धमाल येइल
ह्यावर्षी तरी
काशी मुंबईत आहे ह्या वर्षी?
काश्या मुंबईत
छान ! धाग्यावर लक्ष ठेऊन आहे,
दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही
मनजीत छिल्लर ला पुण्यानं
दिवस पहिला : सामना क्र. १ : तेलूगु टायटन्स वि. तमिळ थलैवाज
कोणत्या चॅनलवर बघता येतील
स्टार स्पोर्ट
इतका राग आलाय मला यु मुंबाचा
* भिक्कार
काल यु मुम्बा संघाकडून
दिवस २ रा : सामना क्र. ३ : जयपुर पिंक पॅंथर्स वि. दबंग दिल्ली
यु मुंबा वि. हरियाणा स्टिलर्स
गुजरात फॉर्च्युनजायंटस आणि युपी योद्धा मजबूत सुरुवात!
दोन दिवस मेहनतीने टाईप केलेले प्रतिसाद
बाकी
गुजरात फॉर्च्युनजायंटस आणि पटणा पायरेटस!
कोणीतरी या धाग्यावर
प्रो-कबड्डीचा पुढील टप्पा आजपासून मुंबईत