प्रवासी वाहतूक नियम कोणासाठी?

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in काथ्याकूट
23 Jun 2017 - 8:23 pm
गाभा: 

शाळेत असताना मित्राच्या सायकलवर डबलसीट बसून शहरातील रस्त्यावर फिरायला मजा वाटायची. असंच एकदा फिरत असताना एका सिग्नलला पोलिसाने आम्हाला अडवलं. सायकलच्या दोन्ही चाकांचे वॉल्व खोलून चाकातील हवा काढून टाकली व वॉल्वची रबरी नळी काढून मित्राच्या हातात दिले. आम्ही दोघे गांगरून पोलिसाकडे बघतच राहीलो. कितवीला आहात तुम्ही? पोलिसाने विचारले. सातवीला, मित्राने सांगितले. मग डबलसीट सायकल चालवू नये हे तुम्हाला शाळेत शिकविले नाही? शाळेत तुम्हाला वाहतुकीचे नियम शिकवले असतील ना? पोलिसाने विचारलं. नाही शिकवलं असं म्हणायची आमची हिम्मत झाली नाही.

शाळेत नागरीक शास्त्रात , रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला, सिग्नलवर लाल दिवा दिसला तर थांबा, हिरवा दिसला तर पुढे जा, झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता पार करा अशा प्रकारचे वाहतुकीचे जुजबी नियम शिकवले होते. सायकल डबलसीट चालवू नये हे शाळेत कधीच शिकवले नव्हते. कॉलेजला गेल्यावर बाईकचं लायसन्स काढताना वाहतूकीचे नियम कळाले. बाईक चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही ह्याची कटाक्षाने काळजी घेतो. वाहतूक पोलिस तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणार्‍या रिक्षाला दंड करतात किंवा ओव्हरलोड मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पकडतात. अर्थात ह्यात चुकीचं असं काही नाही, प्रवाशांच्या व वाहनाच्या सुऱ़क्षिततेच्या दृष्टीने ते योग्यच आहे.

प्रत्येक वाहनांकरता त्या वाहनाच्या क्षमतेनुसार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असते. एसटीच्या साध्या बसला ५२ सीट व १३ की १६ उभ्या प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक केली जाते. सायकल, बाइक, रिक्षा, टॅक्सी,खासगी बसेस ह्यांच्यावर प्रवासी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याचे बघितले आहे , परंतू एसटीवर किंवा सिटी बसवर अशी कारवाई झाल्याचे कधी बघितले नाही.

ह्यावरून मला प्रश्न पडलाय, की एसटी व सिटी बसेसला प्रवासी वाहतुकीचे नियम लागू होत नाही का? प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य आहे का ?
बाईकला आरसा नसल्यास , इंडिकेटर नसल्यास दंड केला जातो. परंतू कित्येक एसटी व सिटी बसेसला हॉर्न,इंडिकेटर , दोन्ही बाजूचे आरसे नसले तरी वाहतूक पोलिस कारवाई का करत नाही?

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

23 Jun 2017 - 9:20 pm | Nitin Palkar

एक संस्कृत सुभाषित आठवले.
अश्व नैव गज नैव / व्याघ्रं नैवच नैवच //
अजापुत्रं बलीं दद्यात्/ देवोपी दुर्बलघातकः//
अर्थ: यज्ञामध्ये घोडा किंवा हत्ती बळी देत नाहीत, वाघ तर नाहीच नाही.
बकरीच्या पोराला (बोकडाला) बळी देतात, (कारण) देव पण दुर्बळांचा घात करतो.

मुक्त विहारि's picture

23 Jun 2017 - 10:00 pm | मुक्त विहारि

+ १

होते कारवाई. गेल्या वर्षी पुण्यात पीएमपीएमएलच्या बसेसवर वाहतुकी पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्याबद्दल कारवाई केली होती. चालकांचे वाहनपरवाने जप्त करण्यात आले होते.

अर्थात, यात ते चालक वा वाहक तरी काय करणार? प्रवाशांना गाडीत घुसू नाही दिले तर प्रवाशांच्याही संतापाचा कधी उद्रेक होईल हे सांगता येत नाही. वाहतूक पोलिसही सार्वजनिक परिवहन सेवांच्या बसेसकडे शक्यतो दुर्लक्ष करतात. कारण लोकांचा खोळंबा व्हायला नको म्हणून. आधीच सार्वजनिक वाहतुकीची साधने अत्यंत अपुरी आहेत.

(हे बसेसच्या दुरवस्थेचे किंवा नियम न पाळण्याचे समर्थन नसून केवळ वस्तुस्थिती सांगत आहे. नियम सर्वांना समानच असले पाहिजेत. ते होईल तो सुदिन!)

आणि हो, पूर्वी सायकलींनाही बिल्ले असायचे. बिल्ला नाही, दिवा नाही, डबलसीट चाललेत म्हणून सायकलस्वरांना पूर्वी पोलीस हमखास पकडत असत. आता पुणेही सायकलींचे शहर उरले नाही.

ही माहिती नवीनच आहे. साधरण किती सालची ही बाब आहे?
tranzister/ रेडीयो आणि दूरचित्रवाणी संच वापरण्याकरता परवाना घ्यावा लागत असे व परवाना शुल्क भरून त्याचे पोस्ट कार्यालयात वार्षिक अथवा त्री वार्षिक नुतनीकरण करावे लागत असे हे माहित होते.

एस's picture

26 Jun 2017 - 6:23 pm | एस

http://www.aisiakshare.com/comment/65505#comment-65505 हा श्री. अरविंद कोल्हटकर यांचा प्रतिसाद पहावा.

पुणे महापालिकेचा कर भरल्याचा पुरावा म्हणून सायकलीच्या पुढेमागे असा बिल्ला लावणे बंधनकारक असे.

IT hamal's picture

26 Jun 2017 - 5:27 pm | IT hamal

मलाही एक प्रश्न कधीचा सतावतोय...२५-३० वर्षांपूर्वी ( कदाचित आज ही असेल..पण नक्की माहित नाही) ...ST बस मध्ये वाद्य वाजवण्यास /रेडिओ ऐकण्यास ...थोडक्यात ड्राइवर चे लक्ष विचलित होईल असे मोठे आवाज करण्यास बंदी होती...तशी सूचना च ड्राइवर केबिन च्या पाठीमागे लिहिलेली असायची...मग मागील २०-२५ वर्षात असे काय घडले कि ST बस ( किव्वा सगळ्याच खाजगी वाहनात ही) मध्ये मोठ्या आवाजात FM रेडिओ वा CD वरील गाणे लावले जाते..ड्राइवर च लावतात आणि ते चालून जाते? कि नियम बदलला आहे? असेल तरी असा आवाज ड्रायविंग करतांना योग्य असतो काय?

IT hamal's picture

26 Jun 2017 - 5:28 pm | IT hamal

मलाही एक प्रश्न कधीचा सतावतोय...२५-३० वर्षांपूर्वी ( कदाचित आज ही असेल..पण नक्की माहित नाही) ...ST बस मध्ये वाद्य वाजवण्यास /रेडिओ ऐकण्यास ...थोडक्यात ड्राइवर चे लक्ष विचलित होईल असे मोठे आवाज करण्यास बंदी होती...तशी सूचना च ड्राइवर केबिन च्या पाठीमागे लिहिलेली असायची...मग मागील २०-२५ वर्षात असे काय घडले कि ST बस ( किव्वा सगळ्याच खाजगी वाहनात ही) मध्ये मोठ्या आवाजात FM रेडिओ वा CD वरील गाणे लावले जाते..ड्राइवर च लावतात आणि ते चालून जाते? कि नियम बदलला आहे? असेल तरी असा आवाज ड्रायविंग करतांना योग्य असतो काय?