सदाभाऊ
एकेकाळी शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारे सदाभाऊ आज स्वतः सत्ताधारी विशेष म्हणजे कृषिमंत्री झाल्यावर त्यांच्या भूमिकेत झालेला बदल कवी व वक्ते जगदिश ओहोळ यांनी त्यांच्या *सदाभाऊंचा ऊर* या कवितेतून नेमकेपणाने मांडला आहे.
शेतकऱ्याचा जीव घेतेय
त्यानेच पिकवलेली तूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर
गोडी लागली सत्तेची
वारं लागलं AC चं
अन चळवळ झाली दूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर
भावनिक बोलून
गाजवायचे सभा
अन अश्रूंचा त्यांच्या
सभेत वाहायचा पूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर
मातीची नाळ तुटली
की माणूस माणसातनं उठतो
शेतकऱ्यांतला पांडुरंग त्याला
लाल दिव्यातच भेटतो
अन आयुष्यभर लागून राहते
स्वतः ला फसवल्याची हुरहूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर
कधीकाळी कुणब्याचं बोलणार तुमी
आता TV वर सरकारवाणी बोलता
तुमचीच जुनी तत्व तुमी
इटी वानी कोलता
शोभत नाही तुमच्या तोंडी
सत्ताधाऱ्यांचा सूर...
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर
या मातीशी गद्दारी करणारांना
माती करत नाही माफ
गद्दारांचं भविष्य
माती करते साफ
एका लाल दिव्या पायी
मातीमोल झाला चळवळीचा कोहिनूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर
वाचने
12391
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सदाभाऊ खोत हे काही पहिलं
सदाभाऊ, शेट्टी हे बोगस शेतकरी
साबळे जी...
In reply to साबळे जी... by विशुमित
२ वर्षांपूर्वी तूर महाग झाली
In reply to २ वर्षांपूर्वी तूर महाग झाली by अभिजीत अवलिया
सरकारनेच शेतकऱ्यांना तूर
In reply to सरकारनेच शेतकऱ्यांना तूर by विशुमित
अभिजित जी...
बरं नाही सदाभाऊंना सध्या
In reply to बरं नाही सदाभाऊंना सध्या by वरुण मोहिते
अभ्यासू आहेत हे एक निरीक्षण
स्वतः राजु शेट्टी पण शरद
या मातीशी गद्दारी करणारांना
जिकडे खाऊ तिकडे सदाभाऊ!!