कसे या मनाला कसे जोजवावे?
कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!
कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!
किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!
कधी ओल जाते कधी ऊल जाते
कळेना कसे या मनाला चिणावे!
तिचे ओठ देतील तपशील नंतर
मुक्याने तिने जर तुला बोलवावे!
विसरणे तसे फार असतेच अवघड
उगां एकमेकां कधी गुणगुणावे!
(असे या मनाला,असे जोजवावे!)
—सत्यजित
छान !
भारीच.....
धन्यवाद!
धन्यवाद !