||ओम नमः शिवाय ||
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नमन माझे तुला नटवरा..
हे शिवशंभो, भोळ्या शंकरा..
कृपासिंधो तू, हे गौरीहरा..
प्रसन्नवदन तू , कर्पूरगौरा..
तांडव करुनि, तु ब्रह्मांड पेलिसी..
प्राशुनि हलाहल, नीलकंठे मिरविसी..
फासुनि विभुती, तू हिमालये वससि..
उमापती शिव, हस्ती त्रिशूल घेसी..
मस्तकी तुझिया चंद्र विराजे..
हाती डम डम डमरू वाजे...
तुझ्या जटा-मुकुटातुनि वाहे मुक्त मंदाकिनी..
सर्प-भुजंग खेळति देहावरी, तू शूलपाणिनी..
मुंडक-माला धारिसी तू, चिता-भस्म विलेपुनि,
विश्वजननी महामाया , असता तुझी अर्धांगिनी..
महेश्वर तू, महादेव तू, धन्य धन्य देवी सती..
पुन्हा मिळविण्या तुज भूपती, जन्मली ती पार्वती..
अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:संग तू..
काळपुरूषाचा काळ रेखिसी, त्राही त्राही भगवान तू..
नमन माझे तुला नटवरा..
हे शिव-शंभो भोळ्या शंकरा..
||ओम नम: शिवाय||
वाचने
10707
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
छानच.....
वा! सुंदर
In reply to वा! सुंदर by विसोबा खेचर
लै भारी ग ...
In reply to वा! सुंदर by विसोबा खेचर
असेच म्हणतो
धन्यवाद!!!!!
ओम नम: शिवाय|
In reply to ओम नम: शिवाय| by राधिका
|| ओम नम: शिवाय||
सुंदर
In reply to सुंदर by दशानन
धन्यवाद
||ओम नम: शिवाय||
सुरेख रचना..
In reply to सुरेख रचना.. by ढ
+१
In reply to +१ by सहज
+२,
In reply to +२, by छोटा डॉन
+३
In reply to +२, by छोटा डॉन
वाटले
In reply to सुरेख रचना.. by ढ
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
||ओम नमः शिवाय ||
छान! || ॐ
बऽऽऽम बोले !!!!!!!!!!!!!!
||ॐ नमः शिवाय ||
अप्रतिम आणि सुंदरच....
||ॐ नमः
सुंदर रचना
महशिवरात्
सुंदर ओळी ....
सुरेखच..
काय गं नयनी!... किती वर्षं या
सुंदर रचना
In reply to सुंदर रचना by मुलूखावेगळी
राधिका ताई, मुलुखावेगळी!
In reply to राधिका ताई, मुलुखावेगळी! by मृगनयनी
।। ओंम नमः शिवाय ।।
In reply to ।। ओंम नमः शिवाय ।। by शशिकांत ओक
आहो णाडीचार्य , त्या ३
In reply to आहो णाडीचार्य , त्या ३ by टारझन
- शिस्पेंसिल टोक =)) काय
|| ओम नम: शिवाय ||
अप्रतिम काव्य ...
सुंदर कविता, आवडली. ||ॐ नमः
मस्त कविता - आवडली
॥ओम नमः शिवाय॥ मी दर श्रावणी
बं....भोले