✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ती एकदाच दिसली...

स — सत्यजित..., Mon, 04/24/2017 - 05:01
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला! होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन् एकेक मंद ठोका मग बंद होत गेला! केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला! टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला! ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला! केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
3837 वाचन

💬 प्रतिसाद (14)

वाह!!! अतिशय सुंदर. खूप आवडली

पद्मावति
Mon, 04/24/2017 - 15:18 नवीन
वाह!!! अतिशय सुंदर. खूप आवडली. मला आवडलेल्या यातल्या ओळी quote करण्याचा मोह होत होता पण अशाने ही पूर्ण कविताच quote करावी लागली असती :)
  • Log in or register to post comments

सुंदर! आवडली रचना.

दशानन
Mon, 04/24/2017 - 21:33 नवीन
सुंदर! आवडली रचना.
  • Log in or register to post comments

ही ओळ...

अनन्त्_यात्री
Tue, 04/25/2017 - 09:13 नवीन
"एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!" ...मनात रु॑जी घालत राहिली !
  • Log in or register to post comments

सुरेख...

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 04/25/2017 - 11:31 नवीन
छंदबद्ध कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अफलातून !

वेल्लाभट
Tue, 04/25/2017 - 11:38 नवीन
अफलातून ! अ फ ला तू न ! मस्तच. वाह क्या बात है!
  • Log in or register to post comments

खूपच छान !!

मितान
Tue, 04/25/2017 - 13:01 नवीन
खूपच छान !!
  • Log in or register to post comments

मस्त,

नीलमोहर
Tue, 04/25/2017 - 15:25 नवीन
सुरेख लिहिता अगदी,
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
Tue, 04/25/2017 - 16:50 नवीन
आवडेश. :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
गुरुवार, 04/27/2017 - 13:46 नवीन
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
  • Log in or register to post comments

वा!!

एस
गुरुवार, 04/27/2017 - 15:36 नवीन
वा!!
  • Log in or register to post comments

वाह!!!

Pradip kale
Fri, 04/28/2017 - 07:19 नवीन
वाह!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

आगाऊ म्हादया......
Tue, 05/09/2017 - 08:19 नवीन
होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! वा, छा गये
  • Log in or register to post comments

क्या बात है !

सस्नेह
Tue, 05/09/2017 - 12:18 नवीन
मस्त मदहोश गझल !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Wed, 05/10/2017 - 09:11 नवीन
एस,Pradip,आगाऊ म्हाद्या,स्नेहांकिता धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा