मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ये, दिग्बन्ध तोडून ये,

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी एकच क्षण था॑ब, कालच्या कवितेच्या कलेवरावर कफन घालून येतो

वाचने 2110 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चाणक्य Tue, 04/25/2017 - 19:47
कडक एकदम. शेवटून दुस-या शेर मधे जरा मीटर बघायला हवाय का ? विशेषतः पहिल्या ओळीत.

In reply to by चाणक्य

चाणक्य Wed, 04/26/2017 - 06:15
गल्ली चुकलं आमचं. सत्यजित यांच्या गजलेला लिहायचा होता हा प्रतिसाद.