३-६ फेब्रुवारी या काळात ट्विटरवरील @marathiword या हँडलने ट्विटर्संमेलन हा उपक्रम आयोजित केला होता. हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या जोडीने आयोजित होणार्या या उपक्रमाला पहिल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सोशल मिडियावरील मराठीचं अस्तित्व भक्कमपणे समोर येणं, मराठी मंडळींना सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठीची एक विशेष संधी, अवसर मिळणं ही या उपक्रमाची निवडक उद्दिष्ट.
उपक्रमाच्या आयोजकांतर्फे या वर्षी मला यातील 'ट्वीटव्याख्यान' सदरात सहभागी होण्याचं निमंत्रण आलं. मराठी भाषेसंदर्भातला एक विषय घेऊन त्यावर दिलेल्या वेळात ट्वीट करायचं होतं, आणि ट्विटरकरांशी संवाद साधायचा होता. त्यांची विनंती स्वीकारून मी 'मराठी भाषेत संवाद साधताना सामान्यतः होणार्या चुका' या विषयावर ट्वीट केलं. हा अनुभव छान होता, आणि तो मिपाकरांसोबत वाटण्यासाठी हा धागाप्रपंच.
आजचं युग हे सोशल मिडिया चं युग मानलं जातं, आणि ते तसं आहेच. माणसाला जिथे भेटीगाठींसाठी आणि व्यक्त होण्यासाठी वेळ कमी उरलेला आहे तिथे इंटरनेट, मोबाईल या साधनांमुळे तो या गोष्टी तितक्याच सहजतेने करू शकतोय. सोशल मिडिया म्हटलं की फेसबुक आणि ट्विटर या दोन प्रमुख नावांशिवाय पुढे जाता येत नाही. त्यापैकी फेसबुक हे काहीसं मनोरंजनात्मक व्यासपीठ असलं तर ट्विटर हे त्या तुलनेत अधिक मुद्देसूद आणि विषयवार चर्चा करायचं ठिकाण आहे असं म्हणायला हरकत नाही. या ट्विटरवर जरी जगभरातले लोक व्यक्त होत असले तरी गेल्या काही वर्षात ट्विटरवर मराठीचा वापर बराच वाढला आहे आणि त्याला चालना देण्यासाठी काही ट्विटर हॅन्डल्स उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
हे माझं भाग्य होतं कि @marathiword ने मला ही संधी दिली. मी निवडलेला विषय तसा बराच व्यापक होता आणि वादप्रवण होता.
शिवाय मी व्याकरणाबद्दल अधिकारवाणीने बोलू शकेन इतकी माझी पात्रताही नाही. असं असलं तरी त्याबद्दल वाटणार्या तळमळीपोटी मी हा विषय निवडला आणि माझ्या परीने त्याचं गमक लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला.
मराठी व्याकरण म्हटलं तर सोपं, आणि म्हटलं तर क्लिष्ट वाटू शकतं. पण सद्य काळात मराठी शाळांची कमी होणारी संख्या, लोकांचा इंग्रजी माध्यमाकडे असणारा ओढा, मराठीचा वृथा न्यूनगंड, या सगळयामुळे शिकल्या, बोलल्या, आणि लिहिल्या जाणाऱ्या मराठीचा दर्जा प्रचंड घसरलेला आहे. त्यात त्याला सोयिस्करपणे जातीयवादाचं, किंवा बोली विरुद्ध प्रमाण अशा वादाचं वळण दिलं जातं. त्यामुळे त्याचं पर्यवसान मराठीच्या एकूणच दुरावस्थेत होत जातं.
ट्विटरसंमेलनाद्वारे मला प्रत्येक मराठी माणसाला हेच सांगावंसं वाटलं, की आज आपण एकत्रितपणे मराठी म्हणून ओळखले जातो. आपल्यातला दुवा, आपली ओळख आहे ती म्हणजे आपली भाषा. ती नुसती राखून उपयोग नाही तर शुद्धही राखली पाहिजे. तिच्या बोलीभाषांनाही जपलं पाहिजे. भाषेच्या नावावर जर आपल्यात भिन्नता आली तर ती आपल्या सगळ्यांसाठी आणि मराठी भाषेसाठी घातक असेल. तेंव्हा सगळे मिळून व्याकरणाचा आग्रह धरायला हवा, सुधार करायला हवा. प्रमाणभाषा शुद्ध आणि बोलीभाषा समृद्ध करणं हे मराठी म्हणून मला आपल्या सगळ्यांचं कर्तव्य वाटतं.
मला माझं हे कर्तव्य करायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल @marathiword च मनापासून कौतुक करावंसं वाटतं. अधिक विश्लेषण न करता 'ट्वीटव्याख्यान' साठी केलेली काही निवडक ट्वीट्स इथे देत आहे.
या उपक्रमाची एक ई-पुस्तिका निघणार आहे. ती प्रकाशित झाल्यावर मिपावर त्याचा दुवा देईन.
या उपक्रमाची एक ई-पुस्तिका निघणार आहे. ती प्रकाशित झाल्यावर मिपावर त्याचा दुवा देईन.
वाचन संख्या
9193
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझं भाषण
त्यात त्याला सोयिस्करपणे जातीयवादाचं, किंवा बोली विरुद्ध प्रमाण अशा वादाचं वळण दिलं जातं. त्यामुळे त्याचं पर्यवसान मराठीच्या एकूणच दुरावस्थेत होत जातं.हे निरीक्षण भारीये !टेक्स्टमधे ट्विटरवर आहेच.
In reply to तुझं भाषण by संजय क्षीरसागर
लिंक दिलीस तर बघतो
In reply to टेक्स्टमधे ट्विटरवर आहेच. by वेल्लाभट
मराठीसंबंधी उपक्रमाबाबत
In reply to टेक्स्टमधे ट्विटरवर आहेच. by वेल्लाभट
नोंद घेतो.
In reply to मराठीसंबंधी उपक्रमाबाबत by यशोधरा
कोणी का वापरा, मराठी वापरा :)
In reply to नोंद घेतो. by वेल्लाभट
ट्विटरवर हे माध्यम काही
कसं काय बुवा?
In reply to ट्विटरवर हे माध्यम काही by कंजूस
हमारे खयाल कितने मिलते-जुलते है कंजूसभाई !
In reply to ट्विटरवर हे माध्यम काही by कंजूस
प्रसिद्ध व्यक्ती त्यांचे
फुटबॅालचे कोच डगाउटमध्ये काय
In reply to प्रसिद्ध व्यक्ती त्यांचे by कंजूस
व्याकरण हा महत्वाचा विषय आहे.
धन्यवाद पिरा.
In reply to व्याकरण हा महत्वाचा विषय आहे. by पिलीयन रायडर
छान प्रयत्न.
सोयीस्कर - मान्य.
In reply to छान प्रयत्न. by एस
अभिनंदन!
हो नक्कीच पैतै.
In reply to अभिनंदन! by पैसा
या संमेलनाची स्मरणिका गूगल
मस्त उपक्रम
संपादन असले तर चुकलेले शब्द