✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझा पहिला मिपा कट्टा

ह
हुकुमीएक्का यांनी
Tue, 06/24/2014 - 03:42  ·  लेख
लेख
दि. २२ जून २०१४ रोजी झालेल्या मि.पा. कट्ट्याचा वॄतांत
मी तसा मिपाचा दोन वर्षे जुना सदस्य आहे. परंतू मिपाकरांना भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ. खुप दिवसांपासून मि. पा. करांना भेटायची इच्छा होती ती श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांच्यामुळे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे आभार. शनिवारी वल्लींनी मेसेज करून सांगितले की रविवारी कट्टा आहे श्रीरंग जोशी व इतर सदस्य येणारेत. तेव्हाच ठरवले की हा चान्स सोडायचा नाही. रविवारी संध्याकाळी ४ ला शनिवार वाड्याला पोहोचलो. शनिवार वाड्यात पोहोचल्यानंतर मी व चौकटराजे दोघेच होतो कारण वल्ली आमच्याआधी शनिवार वाड्यात आले होते. तेव्हा कोणीच दिसले नाही. वाटले कदाचित ५-६ जण येतील. परंतू वल्ली आल्यानंतर मागे पाहिले तर सर्व मिपाकर उभे! मग प्रत्येकाने एकमेकाची ओळख करून घेतली. आम्ही सर्व शनिवार वाड्याच्या बाहेरील चबूतर्‍यावर उभे होतो. शनिवार वाड्याचा दर्शनी भागाचा फोटो खाली पहावा. (Photo Credit : Shrirang Joshi) . शनिवार-वाड्याच्या कोरीवकामाचा फोटो. (Photo Credit : Shrirang Joshi) . खाली उभे असताना देशपांडे काकांनी पानशेत धरणफुटीचा 'आखोदेखा' वृतांत आम्हाला सांगितला. वयाच्या १८ व्या वर्षी असा प्रसंग पाहणार्‍या काकांचे धरणफुटीचे वर्णन ऐकल्यावर हाच तो शनिवार वाडा ज्याच्या भिंतींपर्यंत पाणी आले होते हे ऐकल्यावर खरंच काकांनी किती धैर्य बाळगून प्रसंग निभावून नेला असेल याची कल्पना आली. आजूबाजूला फिरणारे लोक हे अधे-मधे येऊन काका सांगत असलेला प्रसंग ऐकत होते. देशपांडे काकांना दुरून पाहिल्यावर मला क्षणभर ते बाबासाहेब पुरंदरे वाटले होते. कदाचित इतर लोकांनाही तसाच भास झाला असावा. ( या गोष्टीला देशपांडे काकांनी पण दुजोरा दिला.). पानशेत धरणफुटीचा वृतांत ऐकल्यावर तिथेच ग्रूप फोटो काढले ते खाली पहावेत. (Photo Credit : Shrirang Joshi) . . श्रीरंग जोशी यांनी आणलेली चॉकलेट्स, पैसाताईंनी गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णाताईंनी आणलेला बेळगावचा कुंदा, ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी अशा starters नी कट्ट्याला सुरूवात झाली. खादाडीचे पदार्थ खाली. (Photo Credit : Shrirang Joshi) . . आत गेल्यानंतर शनिवार वाडा दर्शन फक्त नावालाच झाले कारण खुप दिवसांनी कट्टा जमल्याने गप्पांनाच जास्त प्राधान्य होते. शनिवार वाड्यातून आतील भागाचा काढलेला लँडस्केप खाली पहावा. . थोड्या गप्पा झाल्यानंतर पुन्हा ग्रूप फोटो घेणे सुरू. फोटो खाली पहावेत. (Photo Credit : Shrirang Joshi) . . . . सर्व मिपाकरांचा एकत्रित फोटो (Photo Credit : Shrirang Joshi) . तसा प्लॅन मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर पहाण्याचा ही होता परंतू वेळेअभावी तो रद्द झाला. त्यामूळे तेथीलच एका बुरुजातून पलीकडे दिसणार्‍या मंदीराचा फोटो घेतला. तो खाली पहावा. . त्या मंदिराकडे पाहताना अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्या मंदीराकडे पाहताना Optical Illusion चा आविष्कार. खालील Crop केलेला फोटो पहावा म्हणजे आपल्या लक्ष्यात येईल. फोटो मधील मंदीर हे एक मजला खाली होते परंतू ते त्या बुरुजावरील कमानीमध्येच आहे असे वाटते. . तिथून पुढे गेल्यावर एका बुरूजावर काढलेला चौकटराजा व इस्पिकचा एक्का यांचा फोटो. . गप्पा झाल्यानंतर संध्याकाळी ६ ला शनिवार वाडा बंद होत असल्याची सूचना देणारी शिट्टी वाजली आणि आम्ही सर्व मिपाकर बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर अपर्णाताई, पैसा ताई, अजित सावंत, देशपांडे काका आणि मोदक यांचा निरोप. (Photo Credit : Shrirang Joshi) . . वरील मंडळींचा निरोप घेऊन हॉटेल भोज च्या दिशेने वाटचाल सुरू. हॉटेल भोजमधील जेवणानंतर सर्व मिपाकर बाहेरील कट्ट्यावर स्थानापन्न आणि खर्‍या अर्थाने कट्ट्याला सुरूवात. शनिवार वाड्यात फिरताना बसायला कट्टा असा कुठेच मिळाला नसल्याने या कट्ट्याचा आनंद वेगळाच होता. (Photo Credit : Shrirang Joshi) . . साधारण ९ च्या सुमारास हॉटेल भोजवरून घराकडे प्रयाण. श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांचे कट्टा आयोजन केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. कट्ट्याला उपस्थित असलेल्या सभासदांची नावे व फोटो पुढीलप्रमाणे. . . . . १. वल्ली (डावीकडे) आणि अत्रुप्त आत्मा (उजवीकडे) . २. ५० फक्त . ३. अजित सावंत . ४. अपर्णा ताई . ५. देशपांडे काका . ६. हुकुमीएक्का(डावीकडे), चौकटराजा(मध्यभागी) आणि इस्पिकचा एक्का(उजवीकडे) . ७. मोदक . ८. समीर शेलार . ९. पैसा ताई . १०. प्रशांत . ११. श्री.श्री.श्री. धनाजीराव वाकडे . १२. श्री व सौ. श्रीरंग जोशी . १३. सूड . . . . . . . आता वाट पहायची पुढील कट्ट्याची. . . ---समाप्त---
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
138360 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

खरं काय ..?

चौकटराजा
गुरुवार, 06/26/2014 - 08:15 नवीन
मोदक हा जरा बारीक झाला असून सूड्राव जरा गोरा झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सूडही थोडा उंच झालाय मागे

स्पा
Fri, 06/27/2014 - 16:45 नवीन
सूडही थोडा उंच झालाय मागे भेटला होता तेंव्हापेक्षा.
यंदा कर्तव्य असल्याने त्यांचा जोरदार workout सुरुये अशी बातमी खात्रीदायक सूत्रांकडून समजली आहे, मे बी पूल अप्स मारून उंची वाढली असावी , आणि पुण्यात राहून रंग उजळला असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सॉरी.

प्रभाकर पेठकर
Sat, 06/28/2014 - 13:12 नवीन
>>>>पुण्यात राहून रंग उजळला असावा मी चुकून 'उधळला असावा' असे वाचले. सॉरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मस्त कट्टा.

त्रिवेणी
Wed, 06/25/2014 - 16:44 नवीन
मस्त कट्टा. अनाहिताचा कट्टा बराच वेळ चालल्यामुळे शनिवारवाड्याचा कट्टा रद्द करावा लागला.
  • Log in or register to post comments

50 फक्त यांचे अभिनंदन करायचेच

त्रिवेणी
Wed, 06/25/2014 - 16:49 नवीन
50 फक्त यांचे अभिनंदन करायचेच राहिले. खुप खुप अभिनंदन आणि छोट्या अनाहिताला भरपुर आशिर्वाद.
  • Log in or register to post comments

मस्त कट्टा

पियुशा
Fri, 06/27/2014 - 12:59 नवीन
मस्त कट्टा :)
  • Log in or register to post comments

माझा पण हा पहिलाच कट्टा! पण

स्पंदना
Fri, 06/27/2014 - 14:59 नवीन
माझा पण हा पहिलाच कट्टा! पण अजिबात जाणवल नाही की आपण पहिल्यांदाच भेटतोय. पैसाताईबरोबर रहाताना सुद्धा नव्या अश्या माणसाच अजीबात दडपण वाटल नाही. अतिशय संस्मरणीय कट्टा (कट्टे) !
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Fri, 06/27/2014 - 15:17 नवीन
अगदी अगदी! सेम सेम!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अश्या??

प्रभाकर पेठकर
Fri, 06/27/2014 - 15:40 नवीन
>>>>अश्या माणसाच अजीबात दडपण वाटल नाही. 'अश्या' म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

सग्गळं वाचा हो!

पैसा
Fri, 06/27/2014 - 16:40 नवीन
'नव्या अश्या' आहे ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आय मिस्ड इट... ग्रँड झालाय हा

वपाडाव
Sat, 06/28/2014 - 08:55 नवीन
आय मिस्ड इट... ग्रँड झालाय हा कट्टा...
  • Log in or register to post comments

तू अत्तर नेल्यानंतर तर

प्रचेतस
Sat, 06/28/2014 - 09:15 नवीन
तू अत्तर नेल्यानंतर तर कितीतरी कट्टे मिसलेत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+++१११

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/28/2014 - 09:37 नवीन
+++१११ =)) वपाडाव ,,, आपण आता-"एक धागा अत्तराचा" काढाच! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अत्तर-वपाडाव-कनेक्षण कृपया

बॅटमॅन
Sat, 06/28/2014 - 13:57 नवीन
अत्तर-वपाडाव-कनेक्षण कृपया एक्स्प्लेनवावे, ही इणंती. (अज्ञ+उत्सुक) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वो एक लंबी कहानी है....

प्यारे१
Mon, 06/30/2014 - 22:53 नवीन
वो एक लंबी कहानी है.... बीस साल पेहले, उस विरां हवेली के बाजूवाली कोठी में.... ब्रेक ब्रेक ब्रेक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अत्तर का लपविता?

स्पा
Sat, 06/28/2014 - 15:49 नवीन
अत्तर का लपविता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पांडू.......

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/28/2014 - 18:12 नवीन
=)) पांडू....... =)) हल कटा... मारीन हं फटाफटा!!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

एक नंबर कट्टा!!!

जव्हेरगंज
Tue, 01/03/2017 - 12:04 नवीन
एक नंबर कट्टा!!!
  • Log in or register to post comments

वेगळ्या नावांचे आयडी कसे दिसत

ज्योति अळवणी
Sat, 01/28/2017 - 23:29 नवीन
वेगळ्या नावांचे आयडी कसे दिसत असतील ही उत्सुकता कायम होती. काहींची ओळख या कट्ट्यातून झाली. मस्त!
  • Log in or register to post comments

छान वृत्तांत

dhananjay.khadilkar
Tue, 02/21/2017 - 16:02 नवीन
छान वृत्तांत
  • Log in or register to post comments

पुन्हा कधी?

इरसाल कार्टं
Wed, 02/22/2017 - 15:01 नवीन
पुन्हा कधी कट्टा जमावताय?
  • Log in or register to post comments

जून्या आठवणी ताज्या झाल्या...

संकेतजी कळके
Sun, 05/13/2018 - 22:01 नवीन
मी आज खूपच दिवसानंतर ईथे आलोय. पण अजूनही कट्टा भरतो कुठे तरी ह्यानी भरून आले.... पूर्वी ठाण्याला रेग्युलरली व्हायचा. लै मज्जा यायची राव. वैचारिक देवाणघेवाणीचे व्यासपीठ होते ते...... लवकरच भेटूया
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा