मुलं त्यांची ती मुखत्यार असतात आणि त्यांना जे पाहिजे तेच करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! ;)
परफॉर्मन्स हा बाकीच्यांसाठी असतो त्यांच्यासाठी ती फक्त एंजॉयमेंट असते. मनात आलं केलं, नाही तर राहिलं.
तुमची कन्यका एकदम चुणचुणित दिसते आहे. अतिशय बोलके डोळे आहेत धिटुकलीचे.
भर स्नेहसंमेलनात तुमच्या डोळ्यांसमोर तारे चमकवणार्या तिचे आणि अशा मुलीचे पालक म्हणून आपलेही अभिनंदन! :)
चतुरंग
मस्तच. लहान मुलं कधी कोणाचा पो करतील काही सांगता येत नाही. पण तुम्ही पण हे सगळं इतकं छान समजून घेतलं त्याचं पण कौतुक वाटतंय. :)
पोट्टी गोडच.
बिपिन कार्यकर्ते
छान लिहिलंय...
लहान मुलं अशीच गंमत करत असतात...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
रागावतोय कुठला?
उलट तीच आमच्याकडून (म्हणजे बर्याच वेळा माझ्याकडून) तिच्या न्रुत्याच्या स्टेप्स बसवून घेते आणि मी चुकलो, कंटाळलो, तर बरीच बोलणी खावी लागतात! X( शाळेत ती जाते की मी, हा प्रश्नच पडतो अशा वेळी!!
जमाडी जम्मत ! गमाडी गम्मत ... पण मूड असेल तेव्हाच !
just an observation --- तुमच्या मुलीचे डोळे खुपच छान टपोरे आहेत
Fascinating ,Captivating eyes with eyebrows been archived (sorry याला मराठीत काय म्हणतात माहीत नाही )
~ वाहीदा
काय मस्त प्रकार आहे हा!
नाच मस्तच आहे. टाळ्या देतानाची मजा बघून जाम हसले.
तुमची मुलगी मुग्धासारखीच गोड आहे. दोघींच्या चेहेर्यात साम्य नक्कीच आहे.
रेवती
तुमच्या गोड लेकीला नटण्याची खूप आवड दिसते आहे. :)
अजूनही ते आमच्यासाठी एक गूढच आहे!
मुलांच्या छोट्या डोक्यात काही तरी चालू असते बहुदा अशा वेळी. कधीकधी समोरच्या गर्दीकडे पाहून गप्प बसतात, कधी कॅमेर्याच्या फ्लॅशची सवय नसल्याने त्याने लक्ष विचलित होते. पण तुम्ही मुलीला उगीच खोदून प्रश्न विचारले नाहीत हे चांगले झाले.
अरे ही तर सेम माझ्या भाची सारखी दिसते आहे.. सेम तु सेम उभ्या वेण्या.... ;)
सुंदर !!
तुनळीचा दुवा पाहीला... :)
अपेक्षा.... !
अपेक्षेच्या वजन एवढं वाढवू नका की तुम्हालाच जानवेल की फुगा फुटला ते ;)
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
पोरगी अगदी गोडोबा आहे. :) चुणचुणीत!!
बाकी परफॉर्मन्स बद्दल आपण "काय बी बोलनार नाय!". अवो त्याबाबतीत आडातच नाय आपल्या तर पोहर्यात कुठुन येईल? :)
मुमुक्षु
अवो त्याबाबतीत आडातच नाय आपल्या तर पोहर्यात कुठुन येईल?
हा उपटसुंभपणा करायला कुणी सांगितलं होतं? माझा नाच बघायला तुम्ही कधी आला होतात?? 8>
बाकी तुम्ही हे माझ्या बाबतीतच म्हणालात ते ठीक आहे. तिच्या आईच्या बाबतीतली ही कॉमेंट असेल, तर मात्र तुम्ही आडात असे जाऊन पडाल, की पोहर्याने सुद्धा वर काढता येणार नाही!!
मुलगी दिसण्यात आईच्या आणी परफॉर्मन्स मध्ये बाबांच्या वळणावर गेली आहे ;)
हि प्रतिक्रिया चालेल काय ?
बाकी टाळ्या देतानाचा व्हिडीओ बघुन मज्जा आली, त्या वेळी शिक्षकांच्या चेहर्यावर उमटलेले भाव बघण्यात अजुन आनंद मिळाला असता !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
अवो, थ्ये आमी सोताबद्दल म्हनत हुतो! मपल्याला सोताला परफॉर्मन्स चा प बी येत नाय तर त्याबद्दल काय बोलनार असं म्हनायचं हुतं आमास्नी!
आपुन तर थुमचे फ्यॅन हाउत. थुमच्याबद्दल आमी असं कसं बोलनार?? :)
मुमुक्षु
अभिजीत, पोरगी एकदम बाहुली आहेच. तुम्ही तिचं बालपण हिरावून घेत नाही आहात हे पाहून खरंच खूप आनंद झाला. तिला उदंड शुभेच्छा.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
अभिजितभाऊ,
ह्या पोरांचा असाच असता. खंय चार लोकांत आयशी-बापसान सांगल्यान, "अगदी छान कविता म्हणून दाखवते... म्हण म्हण, चांदोबाची म्हण..." काय पोरान निस्ता "अँ" येवडाच बोलूचा असता, असो नियम हा!
पोरांच ती. टेपरेकॉर्डर थोडोच हा? मनात इला काय वाजलो?
तुमी ह्या समजून घेतंस, ता बरा हा. नायतर "माज्या चेडवान ह्या करूकच व्हया" म्हणान बापूस हटान बसाक लागलो, काय पोरांचे हाल सुरू...
नि एक सांगूचा हा, राग मना नुको. चेडवाची चाक (दृष्ट) काडा आज :)
माका काय? वाटला काय चल!
प्रतिक्रिया
वा! खूप गोड
बॉक्स
सह्ही!
खरंतर तुझी पोरगी
मस्तच.
मस्त अनुभव
छान
रागावला नाहीत ते महत्वाच!
डोंबल!
जमाडी जम्मत ! गमाडी गम्मत !
>>एकमेकींना
मस्तच.
तुमच्या
काय मस्त
नाच फारच छान!
मस्त
+१
अभिजित, मजा
अरे ही तर
मस्त लिहिलंय!
हा
ह्म्म्म्म
अवो, थ्ये
अभिजीत,
अभिजितभाऊ,