गहू - नाचणी बिस्कीट अका मातृत्व कुकीज ..
मातृत्व कुकीज ( नाव साभार आत्याबाई रेवतीताई .. :-) )
साहीत्य -
१. गव्हाचे पीठ १ मध्यम वाटी
२. नाचणी सत्व १ मध्यम वाटी
३. बटर/ तूप - १०० ग्रॅम
४. पिठीसाखर १ मध्यम वाटी किंवा आवडीनुसार कमीजास्त
५. बेकिंग पावडर १ टीस्पून
६. हवे असेल तर एखादे इसेन्स - मी वेलची पावडर टाकली
७. दूध
सजावटीसाठी -
ड्रायफ्रूट तुकडे / टूटी फ्रुटी
कृती -
१) गव्हाचे पीठ+नाचणी सत्व+ बेकिंग पावडर नीट चाळून घ्या.
२) त्यात बटर/तूप टाकून मळा . एक रवाळ मिश्रण तयार झाले पाहिजे
३) मग त्यात पिठीसाखर मिक्स करा. इसेन्स,ड्रायफ्रूट पावडर घालणार असाल तर ते ही घालून आणि मिक्स करा
४) आता थोडे थोडे दूध घालून मळून घ्या.
५ )पूर्ण मळलेला गोळा प्लास्टिक पेपरमध्ये / एखाद्या बंद डब्यात ठेवून १५-२० मी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
६) नंतर मळलेला गोळा बाहेर काढून थोड्या कोरडया पिठावर /तुपावर लाटायला घ्या आणि दुसरीकडे ओव्हन १८० डिग्री सेन्ट ला १५-२० मी प्रिहिट करुन घ्या
७) लाटलेल्या पोळीचे कुकी कटर / बाटलीच्या झाकणाने बिस्कीट कापून घ्या, ड्रायफ्रूट तुकडे / टूटी फ्रुटी लावून सजवा.
८) बटर पेपर किंवा तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवून १८० ला १५-२० मी / रंग बदले पर्यंत बेक करा
वाचने
24743
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
मस्त कृती! :) कधी येऊ खायला?
क्या बात है
अरे वा! आली का रेशिपी! छान
उत्तम.
फोटो दिसत नाही
फोटो कुठायंत?
In reply to फोटो कुठायंत? by किसन शिंदे
टाकलाय की फोटो.
फोटूऊऊऊऊऊऊऊऊऊ
असं कसं झाले ? फोटो धागा
In reply to असं कसं झाले ? फोटो धागा by स्मिता चौगुले
दिस्तोय...
In reply to दिस्तोय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिसत नाही.
In reply to दिसत नाही. by किसन शिंदे
अरे यार
In reply to अरे यार by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कन्फ्युज .. :-(
मस्त
मस्त आहे
फटू नाय दिसत
आता दिसतोय का फोटो लोकहो ?
In reply to आता दिसतोय का फोटो लोकहो ? by स्मिता चौगुले
नाही
In reply to आता दिसतोय का फोटो लोकहो ? by स्मिता चौगुले
फोटो आधी दिसत होते, आता दिसत
फोटो दिसत नाहिये
हा फोटो दिसतोय का?
In reply to हा फोटो दिसतोय का? by पिलीयन रायडर
पाकृ दिसली. कुकीज छान दिसत
In reply to हा फोटो दिसतोय का? by पिलीयन रायडर
फोटो
In reply to फोटो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहित्य संपादक पद
In reply to साहित्य संपादक पद by राघवेंद्र
नाय हो!
In reply to हा फोटो दिसतोय का? by पिलीयन रायडर
धन्स गं..:)
खुपच सोपी आणि पौष्टिक रेसेपी!
मस्त रेसिपी.
झकास पाकृ
खुप मस्त पाकृ.
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekhoमस्त.. नक्की करुन पाहणार!
धन्यवाद सर्व मिपा़करांचे..
मस्त रेसिपी.
छानच.
स्मिताताई मस्त रेशीपी.
In reply to स्मिताताई मस्त रेशीपी. by प्रीत-मोहर
नक्की.. :)
ओवन कोणत्या कंपनीचे वापरला