✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आशय - प्रस्तावना आणि भाग १

क
किंबहुना यांनी
Wed, 08/10/2016 - 09:55  ·  लेख
लेख
आशय तसा सुखवस्तू घरातला मुलगा. वडील सधन नसले तरी सुखवस्तु शेतकरी. रत्नागिरीतील एका दुर्गम गावातील वडिलोपार्जित आणि त्यामुळे विभागलेली तरीही एकत्र असलेल्या १५-२० एकर शेतीचे मालक, आणि त्यात स्वकष्टाने पिकवलेली ५-७ एकरावरील आमराई. त्यामुळे चंगळ नसली तरी खाण्यापिण्याची तशी काही ददात नव्हती. बाकी कुटुंबीय त्यांच्या व्यवसायाप्रमाणे शहरात स्थायिक झाले होते. एकंदरीत त्यांचे आयुष्य तसे सुखी होते. ही गोष्ट तशी म्हटली तर आशयच्या आईवडिलांची नाही, पण आशयची गोष्ट समजून घेताना त्याच्या आईवडिलांना समजून घ्यायलाच पाहिजे ना. गावात तसे काही कमी नव्हते, कमी असलेच तर शिक्षण. आशयचे आई-वडील घर-शेती सांभाळण्यसाठी उच्चशिक्षणानंतर गावी येऊन राहिले होते. त्यामुळे बाकी काही नसले तरी आपल्या मुलांनी शिक्षणात कुठेही कमी पडू नये अशीच त्यांची इच्छा. आशय तसा २ भावंडांनंतरचा, त्यामुळे शेंडेफळ, साहजिकच लाडोबा. आशयची मोठी भावंडे पाचवीपासून तालुक्याच्या शाळेत जात असत, ती शाळा तशी नावाजलेली होती, आणि आशयच्या सगळ्याच कुटुंबियांचे शिक्षण त्या शाळेत झाले होते,त्यामुळे शाळेमध्ये पण आशयच्या घरच्यांना मान होता. लहानपणापासून आशय अत्यंत हुशार, एकपाठी, अंकगणित आकडेमोड वगैरे मधली त्याची प्रगती पाहून त्याला मात्र लवकरच तालुक्याच्या शाळेत घालायचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे तो आणि त्याचा मोठा भाऊ असे एकदमच तालुक्याच्या शळेत जाऊ लागले. मोठ्या भावाने त्याची जबाबदारी घेतल्यामुळे तसे शिक्षणही व्यवस्थित चालू होते. अर्थात ही कहाणी त्याच्या शिक्षणाची नाही. खरे तर कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही. आशय सातवीत गेला तेव्हापासून की वसतीगृहात गेला तेव्हापासून.. खरेतर याची सुरुवात झाली त्याच्या सातवीत.. सातवीत त्याचा मोठा भाऊ उच्चशिक्षणासाठी बाहेरगावी गेला, आणि आशयची रवानगी तालुक्याच्या गावातील एका परिचितांकडे झाली. सातवीची सहामाही होऊन गेली होती. आशयच्या स्वप्नात नाही पण स्वप्नरंजनात वर्गातीलच पर्‍या यायला लागल्या होत्या. म्हणजे काय होत आहे हे समजण्यासारखे ते वय नव्हते, पण त्या पर्‍यांचे आगमन झाले की त्याला बरे वाटायचे. त्यांच्या सहवासाची बालवयानुरूप स्वप्ने तो पहायचा. एक दिवस आशयच्या एका मित्राने त्याला सांगितले "ती वर्गातली रश्मी आहे ना ती तुझ्याकडे चोरून बघते". आशयला प्रचंड राग आला. सरळ जाऊन तिला झापू लागला. अर्थात तिने कानावर हात ठेवले. पण यानिमित्तानी मुले किंवा मुली एकमेकांकडे चोरून बघतात याचा त्याला शोधही लागला. तशातच एक दिवस वर्गात तास चालू असताना आशयला काहीतरी वेगळे जाणवू लागले, लघुशंकेची तीव्र भावना होतेय असे वाटू लागले. तास संपताच तो सरळ शाळेच्या स्वच्छतागृहात गेला. पण तिथे गेल्यावर त्याला जे बघायला मिळाले ते फारच वेगळे होते. तेव्हढ्यात त्याचा एक मित्र तिथे आला. त्याने पण ते बघितले. "अरे बापरे हे काय झाले तुला, हे फार वाईट असतेय". अर्थात आशय घाबरला नाही, पण घडलेली घटना काहीतरी वेगळी आहे हे मात्र त्याच्या मनाला समजले. नंतर या गोष्टीचे निरीक्षण करणे हा त्याचा छंदच बनला. (क्रमशः) प्रस्तावना: मुलांचे विशेषतः बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत, आणि त्यातून प्रौढावस्थेत जाताना होणारे बदल आणि आणि तदनुशंगाने घडणार्‍या गोष्टी वगैरेंचा विचार आपल्याकडे साहित्यातून विशेष केला जात नाही. या मुलांचे भावविश्व, त्यांच्या आजूबाजूचे वातावरण, त्यातले धोके या गोष्टी आपण चर्चेचा विषय नाही असे मानतो. किंबहुना मुले गरोदर राहू शकत नाहीत, त्यामुळे आपण सर या गोष्टी निसर्गावर सोडून देतो. पण खरे तर मुलींप्रमाणे मुलांना देखील योग्य वयात योग्य व्यक्तींकडून लैंगिक शिक्षण मिळाले पाहिजे असे वाटते. कथानायकाचे आणि कथेचे नाव आशय असे असते तरी त्या दोघांचा नामसाधर्म्यापलिकडे काहीही संबंध नाही. अधिक-उणे: हा विषय अत्यंत "बोल्ड" आहे. वाचकांना पहिल्या भागातच कल्पना आली असेल. पुढील भाग याहूनही अधिक "बोल्ड" असतील, शक्यतो सूचक शब्दांचा वापर करून ते सुसह्य करण्याचा माझा प्रयत्न राहील, पण तरीही जर हे धोरणात बसत नसेल तर कृपया संपादक मंडळाने तशी सूचना द्यावी ही विनंती. लेखनाची सवय नसल्यामुळे रंजकपणा थोडा कमी आहे. माझेही हे तसे पहिलेच लेखन आहे तेव्हा सूचनांचे स्वागतच आहे, अगदी कोणाला प्रूफरीडिंग करायचे असेल तरीही मला आनंदच आहे)
  • आशय - भाग २
  • आशय - भाग ३
  • आशय - भाग ४
  • आशय - भाग ५

Book traversal links for आशय - प्रस्तावना आणि भाग १

  • आशय - भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
6260 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

वाचत आहे. विषय थोडा गंभीर

आनन्दा
Wed, 08/10/2016 - 10:45 नवीन
वाचत आहे. विषय थोडा गंभीर दिसतो. अजूनतरी काही अक्षेपार्ह दिसलेले नाही. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

शक्यतो सूचक शब्दांचा वापर

मार्मिक गोडसे
Wed, 08/10/2016 - 12:42 नवीन
शक्यतो सूचक शब्दांचा वापर करून ते सुसह्य करण्याचा माझा प्रयत्न राहील
उदाहरणार्थ.
  • Log in or register to post comments

उदाहरणे पुढे येतील

किंबहुना
Wed, 08/10/2016 - 21:54 नवीन
उदाहरणे पुढे येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

माझ्या मुलाचे नाव आशय

अजया
Wed, 08/10/2016 - 12:56 नवीन
माझ्या मुलाचे नाव आशय असल्याने उगाच दचकून वाचलं! पुभाप्र
  • Log in or register to post comments

=)))

सस्नेह
Wed, 08/10/2016 - 13:05 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

उत्तम विषय...

मुक्त विहारि
Wed, 08/10/2016 - 13:12 नवीन
"पण खरे तर मुलींप्रमाणे मुलांना देखील योग्य वयात योग्य व्यक्तींकडून लैंगिक शिक्षण मिळाले पाहिजे असे वाटते." + १ ह्यासाठी मराठीत एक फार उत्तम पुस्तक आहे, "बंडू वयात येतो."
  • Log in or register to post comments

ओह.. वाचलेच पाहिजे.

किंबहुना
Wed, 08/10/2016 - 21:53 नवीन
ओह.. वाचलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माझा मुलगा याच वयाचा

गिरिजा देशपांडे
Wed, 08/10/2016 - 13:15 नवीन
माझा मुलगा याच वयाचा असल्यामुळे मला उपयोग होणार ह्या लेखमालेचा :) पुभाप्र
  • Log in or register to post comments

आवश्यक विषय

vcdatrange
Wed, 08/10/2016 - 13:23 नवीन
वाचतोय ......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा