✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

४० वर्षाच्या मुलीचा हट्टीपणा कसा कमी करु?

भ
भम्पक यांनी
Mon, 08/08/2016 - 12:02  ·  लेख
लेख
माझी ४० वर्षाची बायको प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. ती कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती तिला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. तिला म्हणे मी रागावतो आणि शाब्दिक फटके देतो याची भिती वाटते.हे अस बोलून ती माझ्या आई-बाबांची सहानुभूती मिळवते आणि शेवटी सगळं तिच्या मनासारखे करते , आणि मलाच काही कळत नाही ह्या निष्कर्षाप्रत सगळेच येतात. मला वाटते माझी बायको खरंच भयंकर नाटकी आहे.तिला खरच भिती वाटली असती तर ती चांगल्या (दुसऱ्यांच्या ; ))बायकोसारखी वागली असती . १.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? २. तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल? आपला नम्र शोधिशी पुण्यात गंगा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9238 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

अरे बापरे...

मुक्त विहारि
Mon, 08/08/2016 - 12:29 नवीन
१.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही फरक पडणार नाही. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्टा पुढे कुणाचेही काही चालत नाही. ===== २. तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल? बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य. ======== वरील प्रतिसाद हा निव्वळ टाइमपास म्हणून दिला आहे.
  • Log in or register to post comments

बायका सजूतदारच असतात पण आपली

पक्षी
Mon, 08/08/2016 - 17:12 नवीन
बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य.
+१११११११........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१८५७

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/08/2016 - 17:51 नवीन
>>>>>> बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य. चक्क, मूवीशी सहमत व्हावं लागतंय. छ्या. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हॅ हॅ हॅ

योगी९००
Mon, 08/08/2016 - 12:30 नवीन
हॅ हॅ हॅ शोधिशी पुण्यात गंगा ...लोल..!! १.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? दुर्लक्ष करा.... त्याने तिच्यात व तुमच्यात फरक पडेल.
  • Log in or register to post comments

तिच्या वागण्यात काय बदल घडवून

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 12:34 नवीन
तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू
आयडी सार्थ करताहात हं अगदी. ;)
  • Log in or register to post comments

मस्त जोक. अजून एक अजून एक.

उडन खटोला
Mon, 08/08/2016 - 12:46 नवीन
मस्त जोक. अजून एक अजून एक. (विडंबन म्हणूनही असला काही विचार करणं शक्य होत नाहीये. भम्पक आयडी घेऊन च असं काही शक्य होत असावं.)
  • Log in or register to post comments

आवरा...

नावातकायआहे
Mon, 08/08/2016 - 13:01 नवीन
आवरा...
  • Log in or register to post comments

पोकळ बांबुचा उपयोग अजिबात करु

त्रिवेणी
Mon, 08/08/2016 - 13:18 नवीन
पोकळ बांबुचा उपयोग अजिबात करु नका.बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या. आठव्यातून एकदा सासुरवाडीला स्वत:हून फोन करा(जरी मनात नसले तरी).केलेल्या स्वयंपाकाची खुप तारीफ करा.बघा जिवन कसे स्वर्गापेक्षा सुंदर होते ते.
  • Log in or register to post comments

बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 13:28 नवीन
बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या.
अग्दी जसे आहेत तसे बरका. बारकाईने निरिक्षण केले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

>> पोकळ बांबुचा उपयोग अजिबात

वामन देशमुख
Mon, 08/08/2016 - 21:57 नवीन
>> पोकळ बांबुचा उपयोग अजिबात करु नका "पोकळ बांबु" म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

40 प्लस बायकोच्या 50प्लस

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 22:07 नवीन
40 प्लस बायकोच्या 50प्लस नवऱ्यासाठी असतो तो. काही खास नसते. काहीही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

ते कधी बघायचे याचेही काही

त्रिवेणी
Mon, 08/08/2016 - 13:39 नवीन
ते कधी बघायचे याचेही काही नियम आहेत बर. नै तर लेने के देने पडायचे.
  • Log in or register to post comments

सोन्याबापू

महासंग्राम
Mon, 08/08/2016 - 13:44 नवीन
फारच जास्त वैयक्तिक होतंय काय?बाळी चं वय 40 आहे हे आपण विसरला आहात काय?
  • Log in or register to post comments

मौनम् सर्वार्थ साधनम्!

एस
Mon, 08/08/2016 - 13:48 नवीन
मौनम् सर्वार्थ साधनम्!
  • Log in or register to post comments

गायछाप काय?

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 13:49 नवीन
गायछाप काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

नाय ओ अभ्या भौ हा १२०-३००

महासंग्राम
Mon, 08/08/2016 - 14:01 नवीन
नाय ओ अभ्या भौ हा १२०-३०० ठंडाई किवाम विथ इलायची टाकलेला नागपुरी खर्रा दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

व्हॉटेव्हर किक्स. ;-)

एस
Mon, 08/08/2016 - 14:34 नवीन
व्हॉटेव्हर किक्स. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

हा हा हा, भारी!

अनुप ढेरे
Mon, 08/08/2016 - 15:47 नवीन
हा हा हा, भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बायकोचे वय "४०" आहे असे जाहीर

संत घोडेकर
Mon, 08/08/2016 - 13:52 नवीन
बायकोचे वय "४०" आहे असे जाहीर केल्यामुळे तुम्हालाच पोकळ बांबूचे फटके पडण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

हम्म.

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 13:56 नवीन
हम्म. जसे लाईफ तसे फटके. पोकळ पोकळ. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर

आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती

अजया
Mon, 08/08/2016 - 14:06 नवीन
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे. कधी पु ना गाडगीळ ज्वेलरी अँड जेम्स शाॅपिंग ट्राय केलंय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय. माॅल्स पण फार फायदेशीर या त्रासाला.
  • Log in or register to post comments

माझा ऐकाल तर रागाला तोंड

नूतन सावंत
Mon, 08/08/2016 - 17:19 नवीन
माझा ऐकाल तर रागाला तोंड द्यायची तयारी ठेवा,वय जाहीर केल्याबद्दल.आणि बायको कितीही वाईट असली तरी चार चौघात जाहीर केल्याबद्दल.त्रिवेणीतै आणि अजयतैचा सल्ला लगेच अंमलात आणा.
  • Log in or register to post comments

ख्या ख्या ख्या

बाबा योगिराज
Mon, 08/08/2016 - 17:32 नवीन
लोळवा.
  • Log in or register to post comments

उपाय एकच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/08/2016 - 17:45 नवीन
>>>>> की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल ? स्वतःवर कंट्रोल ठेवा. मन की बाते : मिपाकरांना एखाद्या गोष्टीचं कनेक्शन लागलं, सॉरी वेड लागलं की ते निघतच नै. वेड्याने मारलेली मीठी आहे, नाव सूटत नाही. -दिलीप बिरुटे (मिपावर वेडा झालेला मिपाकर) ;)
  • Log in or register to post comments

हा जालीम उपाय बघा करून ....

गामा पैलवान
Mon, 08/08/2016 - 19:04 नवीन
भम्पक, सवत आणायची धमकी देऊन पहा. जालीम उपाय आहे. प्रत्यक्ष सवत आणायची गरज नाही. केवळ धमकी पुरेशी ठरावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

सवत आणायची धमकी देऊन पहा. जालीम उपाय आहे.

मुक्त विहारि
Mon, 08/08/2016 - 19:16 नवीन
हा उपाय अजिबात करू नका. सध्याचे एकदम पोकळ अस्त्र आहे हे. सवत राहिली बाजूला एखादा सवत्या आला तर काय घ्या? (वरील प्रतिसाद अत्यंत बाष्कळ आहे, ह्याची कल्पना आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सवत्या आला तर ....

गामा पैलवान
Mon, 08/08/2016 - 19:25 नवीन
मुवि, .... तर सुंठीवाचून खोकला गेला म्हणायचा ! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तर सुंठीवाचून खोकला गेला म्हणायचा !

मुक्त विहारि
Mon, 08/08/2016 - 19:30 नवीन
असे असेल तर ठीकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आणि सवतीला हो म्हणाली तर....?

अनन्त अवधुत
Tue, 08/09/2016 - 00:06 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तुम्ही तिला नेहमीच रागवता असे

विवेकपटाईत
Mon, 08/08/2016 - 19:25 नवीन
तुम्ही तिला नेहमीच रागवता असे दिसते त्या मुळे ती आत्मविश्वास हरवून बसली आहे. रागावणे कमी करा. तिला तिच्या हिशोबाने कामे करू द्या. मी घरातले व्यवहाराचे सर्व कामे सौ. वर सौपवून टंकायला फ्री आहे.
  • Log in or register to post comments

हायला, बायका नवर्‍यांच एकतात

खटपट्या
Mon, 08/08/2016 - 22:10 नवीन
हायला, बायका नवर्‍यांच एकतात हे ऐकून मौज वाटली... कुटं भेटतात असल्या बायका ??
  • Log in or register to post comments

का? माहिती घेऊन काय उपयोग?

रेवती
Mon, 08/08/2016 - 22:22 नवीन
का? माहिती घेऊन काय उपयोग? तुमचं लग्न झालय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आयतर मायतर हायेत ना टका सारखे

खटपट्या
Mon, 08/08/2016 - 22:52 नवीन
आयतर मायतर हायेत ना टका सारखे, त्यांणा सांगता येइल...पुढच्यास ठेच मागचा शहाणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

जय मल्हार बघा

पैसा
Mon, 08/08/2016 - 22:46 नवीन
जय मल्हार बघा आणि खंडोबाचा आदर्श ठेवा.
  • Log in or register to post comments

हेच हेच मी सांगत असतो बायकोला

खटपट्या
Mon, 08/08/2016 - 22:54 नवीन
हेच हेच मी सांगत असतो बायकोला. जर काही घेण्यासारखे असेल तर त्या मालिकेतून तर हेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बायसेप्स पाह्यलं का त्या

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 22:57 नवीन
बायसेप्स पाह्यलं का त्या देवदत्ताचे? निघाले भंडारा उधळायला... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बायसेप्स पाह्यलं का त्या

खटपट्या
Mon, 08/08/2016 - 23:01 नवीन
बायसेप्स पाह्यलं का त्या देवदत्ताचे?
करावे लागतील...:) रच्याकने बायसेप्सवर अवलंबून असतं का त्ये ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रच्याकने बायसेप्सवर अवलंबून

टवाळ कार्टा
Mon, 08/08/2016 - 23:58 नवीन
रच्याकने बायसेप्सवर अवलंबून असतं का त्ये ???
स्वतंत्र हजारी धाग्याचे पोटेंशिअल आहे या प्रश्नात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खिक्क !!

खटपट्या
Tue, 08/09/2016 - 00:18 नवीन
खिक्क !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरेरे......बाईल कर्कशा

बाजीगर
Tue, 08/09/2016 - 05:07 नवीन
भं.राव तुमचं बॅडलक खराब असल्याबद्दल वाईट वाटतय.काहीं चांगलं व्व्हायचं असतं तर या आधीचं झालं असतं. 40 इज टू लेट.मडकं पक्क्कं झालयं आता आकार देता येणार नाही.एक करु शकता.....नाटक. चांगलं वागण्याचं,प्रेम असल्याचं ब्लाहब्लाहब्लाह पण त्याची किंमत चुकवावी लागेल.आत केमीस्ट्री हलेल,बॅड कोलॅस्टॅरोल साचत जाईल. त्यापेक्षा खरं वागा, बायकोच्या (विचित्र)वागण्यात आनंद घेऊन खरे मनमुराद खळखळून हसा. गम न कर जिंदगी यू गुजर जायेगी, रात जैसे गुजर गयी सोते हूये.
  • Log in or register to post comments

आय डी माझा नवसाचा....

भम्पक
Tue, 08/09/2016 - 08:35 नवीन
अभ्या , आय डी बद्दल बोलायचे काम नाही बरका...... माझ्या स्वभावानुरूप आहे मान्य.....पण बोलायचे नाही हां.....;)..... हलकं घे रे... बाकी (बड )सल्ले आवडले
  • Log in or register to post comments

आमचे काही मिपाकर प्रचंड

लालगरूड
Tue, 08/09/2016 - 08:41 नवीन
आमचे काही मिपाकर प्रचंड विडंबक आहे. ते एका धाग्याचे एवढे विडंबन करतात की शेवटी सगळ्यांना कंटाळा येतो आणि त्याची परिणिती लेख फाट्यावर मारण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते. त्यांना फाट्यावर मारल्यावर वाईट वाटते. हे असं बोलून ते काही कंपूबाज मिपाकरांची सहानुभूती मिळवतात,आणि शेवटी सगळं त्यांच्या मनासारखे प्रतिसाद पडतात मला वाटते की हे विडंबनकार भयंकर नाटकी आहे. त्यांना खरचं फाट्यावर मारण्याची भीती वाटत असती तर त्यांनी धागा वर आणण्याची पुनुरावृत्ती नसती केली. १. मी नक्की काय करावं की ज्यामुळे माझ्या लेखाचे विडंबन पडणार नाही? २. माझ्या लेखन शैलीत काय बदल करू पुण्यात दंगा करून पस्तावलेले :-(
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे सगळे सल्ले ऐका विचार करा

नाखु
Tue, 08/09/2016 - 09:00 नवीन
पण जरा थांबा.... मध्यंतरी मुवी आणि मी मुवींच्या "बाबांकडे (वडील नव्हे गुरु महाराज) सदीच्छा भेटीसाठी गेलो होतो. आम्च्या समोर एक जण असाच कौटुंबीक कटकटीवर ऊपाय मागायला आला होता. त्यांच्यातील संवाद येन प्रकारे.. बाबा: बोल वत्सा काय अडचण आहे? कौ.का.भ.:घरच्या कटकटींना वैतागलो आहे विशेषतः बायकोच्या शीघ्र+दिर्घ हट्टीपणाला,................................................................................................................................................!!
(....मध्ये बर्याच तक्रारी/आडचणी/समस्या होत्या चाणाक्ष वाचकांनी आपल्या मगदूरानुसार (स्वजबाब्दारीवर भरून घ्याव्यात)
बाबा:एक किस्सा सांगतो, त्यात तुला त्याचे शंका समाधान नक्की मिळेल. हिमालयात निबीड जंगल पार केल्यावर अगदी निर्मनुष्य जागेवर एक साधु महाराज तपस्येला बसले होते. उच्चासनावर ते बाजूला सहा आसनांवर त्यांचे अनुयायी बसले होते.भगवी कफनी ई नेहमीचा पारंपरीक वेष होताच. तिथे एक दु:ख्खी कष्टी ईसम आला तुझ्यासारखाच "बायकोच्या कटकटींना वैतागलो आहे काही उपाय सांगा " असा घोषा करीत बसला, पुढे अगतिकतेने म्हणा की आणखी कशाने तो असेही म्हणाला की" अता ऊपाय मिळाल्याशिवाय मी घरी जाणार नाही" ते सिद्ध साधु महाराज आपल्या शिष्याकडे वळून म्हणाले "बाळ विश्वंभर आठवे आसन दे याला बसायला आणि कफनीपण दे" यानंतर तो कौ.का.भ. एक क्षणही न थांबता निघून गेला. बाबांनी मुवींकडे पाहून स्मित केले आणि मुवींनी मला अता निघाले पाहिजे अशी खूण केली. बाबांचा परात्पर शिष्य नाखु
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Tue, 08/09/2016 - 11:21 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

(No subject)

कमवू
Tue, 08/09/2016 - 13:51 नवीन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा