
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा,
ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी,
तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी,
ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी,
एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण.
दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं,
एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं.
'
वाट होते जरी तुझी माझी वेगळी,
सोबतीची तरी आस सांग का लागली,
जीव तुटतो का असा रे.. सांग ना
तुझ्याविना, तुझ्याविना..'
आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी...
मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली,
मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला.
तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला..
'
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले,
ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..'
जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं,
काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा..
तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा.
'
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..'
आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं.
'
कोण होतास तू,
काय झालास तू
अरे वेड्या कसा
वाया गेलास तू..'
तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची.
त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती.
'
गडी अंगानं उभा नि आडवा,
त्याच्या रूपात गावरान गोडवा,
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा,
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..'
आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा.
'
अंगात माझिया भिनलाय ढोलिया,
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली,
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..'
त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती,
'
बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग,
बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..'
अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले.
मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली,
'प्रचू डार्लिंग !!'
अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली..
क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले.
'
बदलुन गेलया सारं,
पिरतीचं सुटलया वारं,
अल्लड भांबावयाला,
बिल्लोरी पाखरू न्यारं,
आलं मनातलं ह्या व्हटामंदी,
अन मनासंगं मन जुळलं जी..'
.............................................................................................

.............................................................................................
क्रमश:
* कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती.
** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल,
कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही.
मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात.
अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात.
.............................................................................................
प्रचू डर्लिंग वाचले आन
In reply to प्रचू डर्लिंग वाचले आन by अभ्या..
अभ्या (प्रिन्स) दादा
In reply to अभ्या (प्रिन्स) दादा by तुषार काळभोर
अभ्या 'प्रिन्स' ???
In reply to अभ्या (प्रिन्स) दादा by तुषार काळभोर
अग्गाअग्ग्ग्गाआग्ग्ग मेले
भारी लिहीले आहे !!
क्रमश: का? छान छान!
=))
नक्की कुणाचा आहे ब्वाॅ आयडी?
In reply to नक्की कुणाचा आहे ब्वाॅ आयडी? by किसन शिंदे
गपे उगी. स्टोरीत किसनू जानू
'प्रचू डार्लिंग !!' =)) =)) =
In reply to 'प्रचू डार्लिंग !!' =)) =)) = by गणामास्तर
मास्तुरे
In reply to मास्तुरे by मी-सौरभ
अजिबात तसे काही म्हणायचे
भारीय....
प्रचू डार्लिंग?
हम्म.
तरी म्हणत होतो, या आयडीपासून, सॉरी, डु आयडीपासून सावध राहा.
या लेखिकेचं लेखन इतर महिला लेखिकांपेक्षा वेगळंच होतं, आणि ते वाचक म्हणून आवडतही होतं. छान, कसं जमतं हो तुम्हाला हे ? -दिलीप बिरुटे
ते सगळं खरं,
आप महान हो!
आपल्याला नीमोवर कधीच भरोसा
In reply to आपल्याला नीमोवर कधीच भरोसा by पिलीयन रायडर
खोदकाम ??
=))
मेलो मेलो =))
In reply to मेलो मेलो =)) by प्रचेतस
नीमो, कळेल न कळेल अशी हलकेच
In reply to नीमो, कळेल न कळेल अशी हलकेच by यशोधरा
=))
In reply to नीमो, कळेल न कळेल अशी हलकेच by यशोधरा
भारी हं...!
In reply to भारी हं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धागालेखिका धागा टाकून कुठे
In reply to धागालेखिका धागा टाकून कुठे by प्रचेतस
तुम्ही पण निघायच्या बेतात
In reply to तुम्ही पण निघायच्या बेतात by अभ्या..
आम्ही इथेच हौत.
In reply to आम्ही इथेच हौत. by प्रचेतस
प्रचेतस तुम्ही धीराने घ्या.
In reply to प्रचेतस तुम्ही धीराने घ्या. by अभ्या..
ख्याक....=))
In reply to धागालेखिका धागा टाकून कुठे by प्रचेतस
शोधायला गेल्या असतील अजून
In reply to धागालेखिका धागा टाकून कुठे by प्रचेतस
येतील ना ?
In reply to येतील ना ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपकू कयसे पता? भागोऽऽऽ!!
In reply to आपकू कयसे पता? भागोऽऽऽ!! by यशोधरा
:(
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण तुम्हाला का म्हणे उत्सुकता
In reply to पण तुम्हाला का म्हणे उत्सुकता by यशोधरा
मयतरी
In reply to मयतरी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे तुम्ही "मज्यशी मयतरी
In reply to म्हणजे तुम्ही "मज्यशी मयतरी by सतिश गावडे
नै नै
In reply to नै नै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी
In reply to अगदी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हंजी काय केलय?
In reply to म्हंजी काय केलय? by यशोधरा
खिक्क !!
In reply to म्हंजी काय केलय? by यशोधरा
:(
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर जरा धमकी तरी बदला, किती
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्यार में गिरो नहीं प्रा डॉ,
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहू द्या सर,
In reply to राहू द्या सर, by नीलमोहर
ठ्ठो!!!
In reply to राहू द्या सर, by नीलमोहर
आग्गाग्गा!!!
In reply to राहू द्या सर, by नीलमोहर
भारी हं ! कसं जमतं गं....
In reply to मेलो मेलो =)) by प्रचेतस
प्रचू तुच सांग आता कसे सुचते
पुढच्या
एवढंच जर असतं तर सरळ प्रचू
In reply to एवढंच जर असतं तर सरळ प्रचू by किसन शिंदे
कोण लेखिका?
प्रचू डार्लिंग वाचून फुटलो =)
In reply to प्रचू डार्लिंग वाचून फुटलो =) by टवाळ कार्टा
चाहत्यांच्या लिश्टात नव्हे.
आमच बरंच खोड्काम/खोदकाम वाचवल
In reply to आमच बरंच खोड्काम/खोदकाम वाचवल by रातराणी
अपडेट कशाला?
In reply to अपडेट कशाला? by पैसा
अंहं !
In reply to अंहं ! by सस्नेह
मेले मेले!
In reply to मेले मेले! by पैसा
ती तर आलीय की लगेच चेंबूरच्या
In reply to ती तर आलीय की लगेच चेंबूरच्या by प्रचेतस
अरारारा!
In reply to अरारारा! by पैसा
सुरु व्हायच्या आधीच संपली का
लोल .. काय पण निमो चे धागे:)
In reply to लोल .. काय पण निमो चे धागे:) by स्रुजा
एकुटवाण्या राऊळात जास्त फिट्ट
50
अहाहा !
हंगामा है क्यु बरपा ?
In reply to हंगामा है क्यु बरपा ? by मारवा
बाकी प्रचु कोण हा प्रश्न
In reply to बाकी प्रचु कोण हा प्रश्न by किसन शिंदे
ते लेण्यांवर,मंदिरांवर,
In reply to ते लेण्यांवर,मंदिरांवर, by सतिश गावडे
बहुदा
हं...
In reply to हं... by विटेकर
फळं कसली
In reply to फळं कसली by पैसा
=))
विटेकर भौ !पण हे अस काही नसेल तर नकळत मोठा अन्याय होइल.
In reply to विटेकर भौ !पण हे अस काही नसेल तर नकळत मोठा अन्याय होइल. by मारवा
हो हो
Congrats on expressing the
अरेरे !!
In reply to अरेरे !! by नीलमोहर
बरं बरं.
In reply to बरं बरं. by प्रचेतस
लगेच पुढचा भाग यायला ती काय
आणि हो,
In reply to आणि हो, by नीलमोहर
बै बै मला तर अगदी भरूनच आलं
In reply to बै बै मला तर अगदी भरूनच आलं by रातराणी
उगी उगी. डोळे पुसा.
In reply to आणि हो, by नीलमोहर
:(
In reply to आणि हो, by नीलमोहर
वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा
In reply to वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा by सस्नेह
ओ ताई काय तुम्ही पण,
लय दुरुन आलोया... लेणी फिरून
In reply to लय दुरुन आलोया... लेणी फिरून by सतिश गावडे
झिंगाट नै झिम्माड झिम्माड
In reply to लय दुरुन आलोया... लेणी फिरून by सतिश गावडे
न करून हिम्मत, दर्पणाशी
In reply to न करून हिम्मत, दर्पणाशी by रातराणी
दर्पणाशी ब्रेकप? नो वे.
In reply to दर्पणाशी ब्रेकप? नो वे. by प्रचेतस
दोन दोन जीएफ. फसाल हो फसाल.
In reply to दोन दोन जीएफ. फसाल हो फसाल. by रातराणी
च्च!
In reply to च्च! by यशोधरा
=))