....विश्वाची उलगड होते.....
लेखनविषय:
....विश्वाची उलगड होते.....
केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते..
केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते..
पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते.
मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते.
तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते!
मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते.
मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही
तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.**
असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते...
नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते
धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी.
निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते...
सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते
मी तुझा पुजारी बनतो...पूजाही काकड होते
- कानडाऊ योगेशु
** : प.पू घासुगुर्जींना समर्पित. ;)
वाचने
3375
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
मस्तच.
In reply to मस्तच. by प्रचेतस
आजकाल
In reply to आजकाल by चांदणे संदीप
चांगलं ते चांगलंच :)
In reply to चांगलं ते चांगलंच :) by प्रचेतस
कविता म्हटलं की माझ्या
मस्त!
धन्यवाद वल्लीसेठ आणि संदीप्भौ
छान कविता!
मस्तच ! खुप आवडली !
झकास
वाह... मस्त. कविता आवडली.
सुरेख!
धन्यवाद एस (हे नाव एखाद्या
खरयं
क्या बात है
कविता आवडली.