< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
16 May 2016 - 11:44 am

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.

ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!

वयसे तो फत्तरकी आवाज
बूडुक्क आयशीच होती है
फक्त पानी में उस बूडुक्ककी
लै लह्यरे उठती है

जैसे तू,
मेरे झिन्ज्याक्कू पकडके
मेंदू की तळको लै बार छूकर
किदरसेभी उठाकर घरके अन्दर पौच जाती है

तेरा यही हुनर आये,
मुझे सगळे गल्ल्या गल्ल्या आन
बोळ बोळ पळके तुम्कोभी मेरे पिच्चे
पळनेको मजबूर कर देता है

कुटते रेहना
तेरी मजबूरी हय
आऊर (वाट फुटेंगी उधर) पळते रेहना
आपुनकी मजबूरी हय

||||||||||||||||||- मारखाऊ गावगल्ल्याप्रेमी -||||||||||||||||||
(१५-०८-१९४७)

(बुड-रफू: ज्याला शक्य आहे त्यांनीच वाचावी)

eggsअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीइशाराकखगकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीनागद्वारफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.लावणीवाङ्मयशेतीविठोबासांत्वनाभयानकहास्यकरुणअद्भुतरससंस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताबालगीतमुक्तकविडंबनभाषाव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासभूगोलक्रीडाकृष्णमुर्तीराशीशिक्षणमौजमजाछायाचित्रणरेखाटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 May 2016 - 11:56 am | प्रचेतस

अरे काय हे...!!!!
ब्येक्कार =))

टवाळ कार्टा's picture

16 May 2016 - 12:06 pm | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या...लैच

eggs

हे तर खासच =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 May 2016 - 12:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या
काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या
टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे

टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन
बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते
पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ
तळ्याच्या काठाला धडका मारत असतात

तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड
बराचवेळ झिणझीणत रहाते
अगदी मी जिथे असेन तिकडुन
घरी पोचे पर्यंत
आणि

तुमच्या ह्याच दहशती मुळे
मला गावभर सैरावैरा धावावे लागते
आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला
प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते

सतत नवनविन उद्योग करत रहाणे
ही माझी जन्मजात खोड आहे
आणि मी समोर दिसलो की
काहिही ऐकुन न घेता
मला झोडपणे ही
तुमची जुनी खोड आहे

फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला)

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

16 May 2016 - 12:48 pm | चांदणे संदीप

समदुखी:?? =)) =)) =)) =)) =)) =))

Sandy

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 May 2016 - 12:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात.

असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो.

पैजारबुवा,

नाखु's picture

16 May 2016 - 12:58 pm | नाखु

रंग जब मिलते चार यार अपने जख्मोंके साथ.

जहा चार यार वाला नाखु

प्रचेतस's picture

16 May 2016 - 1:41 pm | प्रचेतस

हैट्ट आहे राव. ))

जगत नाही आज.

एस's picture

16 May 2016 - 1:16 pm | एस

GmMaBhaNa cha pan vidamban zaala vaatataa!

aso. haa ghyaa _/\_

पैसा's picture

16 May 2016 - 1:19 pm | पैसा

=))

अजया's picture

16 May 2016 - 1:47 pm | अजया

=)))

जेपी's picture

16 May 2016 - 1:49 pm | जेपी

=))