तुमचं स्वप्न वरचढ ठरलं की सत्य ?
अशी कल्पना करा की हे जग एक रंगमंच आहे. इथले सगळेच लोक तसे कलाकार आहेत. प्रत्येक जण फक्त आपणच कसे उत्तम कलाकार आहोत हे इतरांना पटवून देण्यासाठी धडपडत असतो. काही आपली कला लीलया दाखवतात असेच तसेच त्यांची आजूबाजूची माणसे त्यांना प्रोत्साहन देत असतात. मात्र काहीजण नुसतेच आयुष्यभर त्यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवत राहतात याचं कारण त्यांना दिशा आणि मार्गदर्शन मिळतच नाही .
ज्यांना इतरांचा पाठींबा मिळतो, लोकप्रियता मिळते त्यांचा हा प्रवास खूप सुसह्य होतो. आपण जे काही करतोय त्याचा अंदाज आजूबाजूच्यांच्या वागणुकीवरून म्हणजे आई, वडील, बहिण, भाऊ,बायको ,मुलं किंवा गेला बाजार शेजारी ह्यांच्यामुळे बांधता येतो. एक प्रकारचा आरसाच तो … इतरांकडून येणाऱ्या प्रतिसादावर आपण आपली वागणूक ठरवतो. आरसे आपल्याला आपलेच प्रतिबिंब दाखवतात पण ते योग्य असेलच ह्याची खात्री नसते…. अशा वेळी कामाला येतो तो आपला आत्मविश्वास…! होकारार्थी आरसे पाहून आत्मविश्वास वाढलेली माणसं फार कमी दिसतात. मात्र सतत ज्यांना आपली नकारात्मक प्रतिमाच दाखवली जाते ती माणसे आपला आत्मविश्वास गमावून बसतात आणि कंटाळून त्यांचे वागणे किंवा आयुष्य नाईलाजाने बदलतात मग भले ते चूक आणि त्यांच्या मनाविरुद्ध का असेना ….
प्रश्न असा आहे की मुळात माणसाचा आत्मविश्वास आजूबाजूचे नकारात्मक आरसे सतत पाहून डळमळीत होऊ शकतो का ? इतर लोकांनाही समजा त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच करायचं होतं पण ह्या अशा आरशांमुळे त्याचं ते स्वप्न विरून गेलं असं होत असेल ना ? तुम्ही आज जसे आहात तसेच तुम्हाला व्हायचं होतं की तुमची अशी काही वेगळी स्वप्नं होती जी सत्यात उतरली नाहीत ? जी स्वप्नं सत्यात आणण्याची धडपड करूनही सोडावी लागली त्याची टोचणी आजही तुमच्या मनाला कधी लागते का ? ह्यावर उपाय काय ?
प्रतिक्रिया
माझितरी अजुन पर्यंत स्वप्नेच
:(
माणुस हा स्वप्न पाहतो,त्यात
बाकी माझे मत विचारात तर असे
मी रोज नवीन स्वप्न पाहतो,
आपण तर बुआ रोज स्वप्ने पाहतो.
आमचं आमच्या घराचं स्वप्न होतं
आतापर्यंत सत्य.