रंगीत दहशतवाद
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो.
पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे.
त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत.
पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत.
http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm
पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते.
आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का?
फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
वाचने
54541
वाचनखूण
प्रतिक्रिया
167
रंग माझा वेगळा
काल हैदराबादमध्ये दिलसुखनगर
आता
>>> आता दहशतवादाला कुठलाच रंग
NIA's cleanchit to Sadhvi Pragya, Karkare probe was fudged
In reply to NIA's cleanchit to Sadhvi Pragya, Karkare probe was fudged by काळा पहाड
थांबा थांबा......
In reply to थांबा थांबा...... by नितिन थत्ते
Prosecute
In reply to Prosecute by बोका-ए-आझम
ते कोर्ट ठरवेल हे बरोबरच.
In reply to ते कोर्ट ठरवेल हे बरोबरच. by नितिन थत्ते
भगवा दहशतवाद हा शब्द पुसायचा कशाला ?
In reply to भगवा दहशतवाद हा शब्द पुसायचा कशाला ? by गामा पैलवान
>>कारण की हिंदूंमध्ये
In reply to भगवा दहशतवाद हा शब्द पुसायचा कशाला ? by गामा पैलवान
बरोबर.
In reply to भगवा दहशतवाद हा शब्द पुसायचा कशाला ? by गामा पैलवान
हिंदूंमध्ये धर्माच्या
In reply to हिंदूंमध्ये धर्माच्या by टवाळ कार्टा
जात हा तर कलंक आहेच
In reply to जात हा तर कलंक आहेच by बोका-ए-आझम
हत्या ह्या अमानुषच असतात.
In reply to हत्या ह्या अमानुषच असतात. by तर्राट जोकर
बरोबर.
In reply to बरोबर. by बोका-ए-आझम
तुमचं मत वेगळं आहे असं
In reply to तुमचं मत वेगळं आहे असं by तर्राट जोकर
मी ranking करायचा प्रयत्न केला होता.