मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण... उच्च-दहा प्रसंग!

अज्ञात · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सादर करीत आहे, रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण... उच्च-दहा प्रसंग! १ ) गावाला जाताना एसटीच्या / मुंबईतल्या मुंबईत बेस्टच्या / माजी पुणे-पीएमटीच्या खिडकीच्या स्वैर नकारात्मक धोरणामुळे बोटांवर होणारा आघात! २ ) दुचाकीवर नीम-जलद गतीने जाताना मध्येच रस्त्यावरचा खड्डा दृष्टिक्षेपात उशीरा शिरल्यानी होणारा 'खड्यात जा!' चा आत्म-आविष्कार. ३ ) शिंकं + लघु / दीर्घ शंका ह्याचा मिलाप. ४ ) फटाका हातात घेऊन हवेत भिराकवुन देण्याचा असफल प्रयत्न. ५ ) वीज गेलेली असताना / काळोखात शेवटची पायरी आहे / नाही ह्याचा बेताल अंदाज. ६ ) गलेभेट किंवा परदेशी गाल-चुम्बन देताना, प्राधान्य नेमक्या कुठल्या बाजूस द्यावे ह्याचे आजतागायत न कळलेले गणित. ७ ) चारचौघात व्हस्ताप वरून आलेल्या भलत्या सलत्या ध्वनी/चित्रफीतींचा उच्च आवाजात होणाऱ्या क्षणिकस्फोटने होणारा मनःस्ताप. ८ ) थेट प्रक्षेपण असलेल्या सामन्याच्या शेवटच्या टप्य्यातले काही रोमहर्षक क्षण बाकी असताना (पूर्वी हमखास) वीज जाणे / (पूर्वी) व्यत्यय किंवा बातम्या लागणे / (नेहमी) घरी पाहुणे येणे. ९ ) धावपळ करूनही डोळ्यासमोरून एसटी/बेस्ट/पीएमटी/ट्रेन/लोकल सुटणे. १० ) काम/कष्ट करताना घाईगडबाडीत पाहिजे ती दक्षता न घेतल्यानी वाया जाणारे काम/कष्ट! इन इंग्लिश दे कॉल इट 'थ्रिल', हिंदीमें 'रोमांचक' आणि मराठीत 'उत्तेजक' ते हेच! #सशुश्रीके

वाचने 7030 वाचनखूण प्रतिक्रिया 35

In reply to by कपिलमुनी

असे धागे रक्तदाब वाढवतात, ही गोष्ट अगदी मान्य. मिपा हे मराठी संस्थळ मराठी माणसाला, मराठी भाषेतून अभिव्यक्त होण्याचं एक दर्जेदार माध्यम आहे, म्हणून रक्तदाबाच्या गोळ्या घेऊन हेही सहन करतो. :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा...जमेल तशी धाग्यात भर घालीन. आपल्यावर आमचा डायरेक्ट राग नै बरका, कुरड़ाया ज़रा चांगल्या झाल्या पाहिजेत. -दिलीप बिरुटे (आई बरोबर कुरड़ाया करण्यात बिझी असलेला) :)

In reply to by कपिलमुनी

मुनिवर टुकार कसा बरं? अतिशय महत्वाच्या विषयांना तोंड फोडला आहे लेखक मजकुरांनी. उदा प्रसंग क्र ३. अशी वेळ शत्रूवर देखिल येऊ नये पण असा प्रसंग लेखक मजकुरांवर वारंवार गुदरलेला दिसतो आणि त्या मुळे उव्द्विग्न होउन काही मदत मिळावी या उद्देशाने त्यांनी हा धागा काढलेला दिसतो. किंवा प्रसंग क्र ६ बघा किती शोचनीय आवस्था आहे ही? केवळ गोंधळ उडाल्याने असा गोल्डन चान्स हातातुन गेला तर कोणाचाही रक्तदाब वाढणारच ना? आणि त्यातूनही नंतर जर कोणी तुमच्या / माझ्या सारखा मित्र समोरच्या दोन्ही गालांना समान न्याय देताना दिसला तर लेखकाचा रक्तदाब पराकोटीच्या उच्च पातळीवर पोचत असेल. आमचे एका मित्रवर्य तर प्रसंग बघुन दोन्ही गालांच्या मधेही एखादा बोनस चिकटवुन देतात. तसेच प्रसंग क्र. १० बघा गुढगे फुटेस्तोवर मेहनत करुन शेवटच्या क्षणी जेव्हा ल्क्षात येते की पाहिजे ती दक्षता घेतली गेली नाहिये आणि आता त्याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागणार आहे, तेव्हा होणारी चिडचिड स्वाभाविक आहे. अशा वेळी लेखकाला सहानुभूतीचे दोन शब्द ऐकवायचे सोडून टुकार म्हणुन तुम्ही धाग्याची वासलात लावताय हे बरे नव्हे. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

आपल्याला कितीही त्रास होत असला तरी आपण न्यूट्रल राहून समोरच्याचा बीपी वाढवला पाहिजे, सालं ती एक कलाच आहे, ज्याला हे जमलं तो जिंकला. आपण ओझं नाय घ्यायचं सालं आपल्याला त्रास देणारा अस्वस्थ राहिला पाहिजे, काही आयड्या आहे का, कंजूससेठ ? -दिलीप बिरुटे

काळा पहाड 08/05/2016 - 15:19
१. गव्हर्नमेंट ऑफिसर्स (पक्षी: हरामखोर लोक) ना मिळणारे सातवे पे कमिशन २. गव्हर्नमेंट ऑफिसर्स (पक्षी: हरामखोर लोक) ना काम न करता उगीचच मिळणारा पगार ३. राजकारणी लोकां (पक्षी: xxxxxxx) चं फ्लेक्स आणि इतर सुद्धा होणारं दर्शन ४. मोगाखान आस्तित्वात असणे

In reply to by काळा पहाड

तुम्हाला उठसुठ घाऊक द्वेष करायला आवडते का हो साहेब? तुम्ही त्याला काय फार स्टाइलिश वगैरे असल्यासारखे समजता की काय? अतिशय केविलवाणे वाटते ते! सातव्या पे कमीशन वर दात ठेवायचे आपल्याला काय प्रयोजन आहे हो? मुळात पे कमीशनची प्रोविशन्स वाचली आहेत का आपण? का हॉबी उर्फ़ छंद द्वेष करणे आहे म्हणून काहीही आगापिछा ठाऊक नसताना उग्गाच गोळीबार हवेत ? ऑ? कॉर्पोरेट मधे किती कामं होतात हे हापिसातून मिपावर (हापिसचंच नेट चकटफू प्रसंगी प्रॉक्सी लावुन चोरी करुन) येणाऱ्या जनतेला पाहुन कळतेच पुरेपूर कश्याला उगाच आपले झाकून अन दुसऱ्याचे वाकुन वाकुन म्हणतो मी. तुमचा दुसरा आरोप म्हणजे सरकारी ऑफिसर्स अन नोकर कामे करत नाहीत, तर आपण कधी सरकारी कार्यालयाच्या दिवसभराच्या कार्यकलापाचे निरिक्षण केले आहेत का? एकदाच फ़क्त शेजारी असलेल्या पाकिस्तान बांग्लादेशची हालत बघा कळेल (पटवून घ्यायची इच्छा असल्यास) सरकारी नोकर काय अन किती काम करतात ते!. मानवी क्षमता नावाचा एक प्रकार असतो साहेब, जनधन योजना आली द्या सरकारी राष्ट्रीयकृत बँकना टारगेट, वरतुन कोणाला लोन्स मना करू नका, रिकवरी मधे अमानवीय व्यवहार करूनका, सगळी टारगेट पण त्यांनाच अन शिव्या पण त्यांनाच काय तर म्हणे काम करत नाहीत! कस्टमर टु एम्प्लोयी रेश्यो पहा जरा महसुल अन बँकिंग मधला एकदा ओवरबर्डन झालेले आहेत ते कर्मचारी वर्क लोड ने , जिल्ह्यातल्या सगळ्या लोकसंख्येवर एक पुरवठा अधिकारी त्याकडे 20 चा स्टाफ अन अपेक्षा काय तर 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्याचा सार्वजनिक वितरण डेटा अन सप्लाय सांभाळा, कुठल्याही कॉर्पोरेटला सुद्धा इतके जास्त वर्कलोड दिले तर फे फे उड़ेल उदाहरण घ्या आपल्याच लाडक्या इनफ़ोसिस चं नुसतं आधार कार्ड डेटा कलेक्शन अन मॅनेजमेंट दिले आहे हातात तरी मिसमॅनेजमेंट अन सावळा गोंधळ करुन ठेवलाय नुसता ! ऊगा फॅड आलंय राव काही नाहीतर सरकारी नोकरांना शिव्या घालायचं ! 3% किमान इयरली अप्प्रेसल पकडले तरी मानवीय वर्ककंडीशन असणाऱ्या कॉर्पोरेट जॉब्स मधे 10 वर्षात एकुण रेज 30% होतो तोच सातव्यावेतन आयोगात 23% दिलाय त्यातही इतकी गरळ ओकावी वाटते लोकांना ह्याचेच नवल वाटते.

In reply to by नाईकांचा बहिर्जी

सुबोध खरे 09/05/2016 - 10:37
पिराजी राव 'सरकारी" नोकरी सर्वाना हवी हवीशीच का वाटते याचे उत्तर मिळेल का? तुम्ही काय वाटेल ते करा तुमची नोकरी जात नाही. शिवाय मरेपर्यंत महागाई प्रमाणे वाढत जाणारे निवृत्तीवेतन आणी आयुष्यभर मिळणारी वैद्यकीय सुविधा याची किंमत किती करणार याचे सुत्र आहे का तुमच्या कडे . १०० टक्के सरकारी नोकरांना निवृत्त होताना मिळणाऱ्या पगारापेक्षा दहा वर्षांनी निवृत्ती वेतन जास्त मिळते हि वस्तुस्थिती आहे. वैद्यकीय रजा एक वर्षपर्यंत( बिनपगारी) मिळू शकते. नोकरीवरून डच्चू मिळत नाही शिवाय सेवाज्येष्ठता राखून ठेवली जाते. शिवाय आपण "अकार्यक्षम" असाल तरी आपली नोकरी जात नाही. हे वरचे फायदे पाहिलेत तर सरकारी नोकरी का हवीहवीशी वाटते हे समजेल. मी झाड हलवण्याची सोय असलेल्या विभागाबद्दल( आय कर, विक्री कर,जकात, अबकारी कर, राजस्व खाती याबद्दल) बोलत नाहीये . बँक व्यवस्थापक सुद्धा कर्ज मंजूर करण्यास काय काय करतात याबद्दल बोलत नाही. केवळ २३ टक्के वाढणारा पगार दाखवू नका.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 09/05/2016 - 10:41
अठरा वर्षाच्या सरकारी नोकरीत माझा पगार १२ पट (१२००%) वाढला होता १९८८-२००६. यानंतर सहावा वेतन आयोग आला अन्यथा विसाव्या वर्षी माझा पगार २५ पटीने वाढलेला असता. या सर्वाचा लेखी पुरावा माझ्याकडे पगाराची पट्टी (PAY SLIP) च्या स्वरुपात उपलब्ध आहे. पहिल्या पगारापासून शेवटचा पगार.

In reply to by सुबोध खरे

सुबोध जी, माझ्या प्रतिसादातले जितके विरोध करता येण्यालायक आहे तितकेच आपण उचललेले दिसते!.असो. वर्कलोड बद्दल आपण काहीच बोललेला नाहीत ते? शिवाय काही बाबतीत आपले ज्ञान आपण अपडेट करावे ही विनंती, निवृत्तीवेतना संदर्भात न्यू पेंशन स्कीम उर्फ़ NPS बद्दल आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो फ़क्त. आपल्याला (जर समजून घेण्यात इंटरेस्ट असला तर) माझा मुद्दा परत सांगतो, 1 सरकारी कर्मचारी मंडळीवर प्रचंड जास्त लोड असते जे मी लोकसंख्या ते सेवादाते कर्मचारी ह्यांचे गुणोत्तर ह्या स्वरूपात बघायची विनंती करतो आपल्याला 2 वर्कलोड आहे म्हणून ते फार बिच्चारे असा माझा मुद्दा नाही तर सरकारी कर्मचार्यात कामचोरी नक्कीच असते हे मी मानतो पण तुम्ही किंवा श्रीयुत काळापहाड़ ह्यांनी केल्यासारखे त्याचे सरसकटीकरण करणे योग्य नाही हे मी नम्रपणे सुचवतो 3 एफिशियंसी पण हवी सोबत सोशल डिविडेंट सुद्धा पे करा अश्या अपेक्षा करणे गैर आहे बॉस 4 कुठली वैद्यकीय सेवा दिसली तुम्हाला? हे मला पडलेले अजुन एक कोड़े आहे , डिफेंस सर्विस वगळता वेळेवर अन उत्तम वैद्यकीय सेवा देता का जरा दाखवून ? टियर 1 सिटीज (मुंबई दिल्ली) वगळता सीजीएचएस हॉस्पिटल्स नसतात, इमरजेंसी केस मधे डॉक्टर कडून इमरजेंसी सर्टिफिकेट्स लिहून आणायला लागतात, बिलं वेळेवर निघत नाहीत अन हे सगळे कर्मचारी असताना रिटायर झाल्यावर कोण कुत्रं हाल खात नसतंय साहेब उगाच काहीतरी बोलायचं म्हणून म्हणू नका मेडिकल सर्विसेज मिळतात वगैरे, सहकार विभागातून वडील रिटायर झाले आहेत माझे सर्जरी करायची होती गुड़घ्याची तेव्हा पाहून बसलोय ही सगळी दुनियादारी मी, अन ते ही मुंबई मधे! बाकी लहान गावांची बातच सोडा. 5 एक विनंती विशेष , सिलेक्टिव रीडिंग सोडा ज़रा!. नेमके मुद्दे उचलून गैरसोईच्या मुद्द्यांवर मौनव्रत धारण करणे बरे नव्हे साहेब विशेष - असे पब्लिक फोरम वर हरामखोर वगैरे लिहिलेले आपल्याला चालते असे समजावे काय?

In reply to by नाईकांचा बहिर्जी

सुबोध खरे 09/05/2016 - 12:13
हापिसचंच नेट चकटफू प्रसंगी प्रॉक्सी लावुन चोरी करुन) साहेब, वरील शब्द ही आपलेच आहेत ना ? मग सरसंकटीकरण दोन्ही बाजूनी होते आहे असे मानून मी त्यावर टिप्पणी करीत नाही. सरकारी नोकरीबद्दल आपण जितक्या पोटतिडीकीने लिहिले आहे तितक्याच पोटतिडीकीने लोक "सरकारी सेवांबद्दल" बोलत असतात हे मी पाहत आलो आहे. तेंव्हा आपला सात्विक संताप जितका सत्य आहे तितकाच लोकांचा सरकारी सेवांबद्दल उद्वेग सुद्धा सत्य आहे. मी म्हणतो कि आपण किती क्षुद्र आहोत हे समजण्यासाठी एकतर हिमालयात जा किंवा सरकारी कार्यलयात जा ४५ व्या वर्षी आपल्याला नोकरीतून डच्चू मिळाला तर काय होईल? याचे एक उत्तर द्या. या "सुरक्षिततेची" किंमत पैशात करता येणे अशक्य आहे. मी सरकारी नोकरीत असताना मुंबईच्या आयुक्त दर्जाच्या अधिकार्याला तोंडावर सांगितले कि तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही. आणि त्याला त्याची जाणीव असल्याने त्याने काहीही केले नाही. एल अन्ड टी मध्ये २०० मध्य वयीन इंजिनियरना एक महिन्याची नोटीस दिली आहे. घर आणि नोकरी खाली करण्याची असे ऐकतो आहे. माझ्या मित्राची वयाच्या ४६ व्या वर्षी नोकरी गेली. सोमय्या सारख्या चांगल्या कॉलेजातून मेकानिकल इंजिनियर असणारा हा हुशार मुलगा आता खोपोली येथे अर्ध्या पगारावर दुप्पट काम करीत आहे. आपल्या आयुष्याची वाताहत होताना तो आणि आम्ही डोळ्यांनी पाहत आहोत. वडिलांचा आजार, मुलांच्या शिक्षणाचा बोजा, धाकटा भाऊ निवर्तल्याने आलेली त्याच्या कुटुंबाची जबाबदारी यामुळे आत्महत्येपर्यंत विचार गेलेल्या हुशार तरुणाची हि सत्य कहाणी मी पाहत आहे. मध्य वयात नोकरी जाणार नाही या सुरक्षिततेची किंमत काय? या वयात तुम्हाला नवि कौशल्ये शिकणे सोपे नाही त्याहून हि नोकरी मिळणे आणि ती सुद्धा एकदम अर्ध्या पगारावर करायला लागणे यासारखी वाईट परिस्थिती तुम्ही कल्पनासुद्धा करणे शक्य नाही अशी आहे. राहिली गोष्ट केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेची "सीजीएचएस" ची. त्यातील भ्रष्टाचार या बद्दल मी तोंड न उघडणे शहाणपणाचे ठरेल. खोटी बिले देऊन पैसे लाटणे, स्वतःच्या नावावर दुसरयाची शल्यक्रिया करून पैसे मिळवणे इ इ गोष्टींमुळे ती सेवा फार मोठ्या तोट्यात चालली आहे हे आपण जालावर पाहू शकता.यामुळे जे खरोखरचे रुग्ण आहेत त्यांची मात्र ससेहोलपट होते. पण याला दुसरे तिसरे कोणी नसून "सरकारी कर्मचारी"च जबबदार आहेत. एका उत्तम रित्या तयार केलेल्या प्रणालीचा बोर्या कसा वाजवायचा याचे ते एक उत्तम उदाहरण ठरेल. असो. मी सरकारी नोकरी १८ वर्षे आणि ४ वर्षे कॉर्पोरेट रुग्णालयात नोकरी आणि आता स्वतंत्र व्यवसाय करून तिन्ही गोष्टी डोळ्याने पाहिल्या आणि अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे बिनबुडाचे आरोप मी करीत नाही. रच्याकने-- "श्री. काळा पहाड" हे काळे कि गोरे ते पाहिलेले माहित किंवा त्यांना मी ओळखतही नाही. कम्पुबाजीचा आरोप होऊ नये यास्तव हि ओळ.

In reply to by काळा पहाड

झेन 09/05/2016 - 14:32
कोणाहीवद्दल वैयक्तिक लिहिण्याचा उद्देश नाही. समाजाची मानसिकताच अशी आहे की सगळ्या गोष्टिंसाठी आपल्याला प्रतिकं लागतात. -    चांगल्या गोष्टींसाठी – देवाची/देवीची मूर्ति, तीर्थस्थानं(जागरूक), बाबा, बुवा, देवी इ. -    भ्रष्टाचारासाठी     – राजकारणी, सरकारी नोकर -    लफडी, भानगडी    – सीने कलाकार, टीव्ही कलाकार -    वर्दितले गुन्हेगार   -  पोलिस         -    कमी श्रमात जास्त पगार घेणारे - आय टी वाले   खूप सोइस्कर असतं, स्वत: अपोआप विरुद्ध पक्षात असतो, म्हणजे महान भक्त, प्रामाणिक, सद्वर्तनी, निरालस, पापभिरू, उपेक्षित वगैरे.

धनंजय माने 08/05/2016 - 15:54
आम्हाला राहायला घर मिळत नाहीये. रक्तदाब वाढणार च ना. किती दिवस त्या दोघांना 'दोघी' करुन ठेवायचं म्हणतो मी? आता तर सुधीर चं पण वय दिसायला लागलं आहे त्याला वाटत नसलं तरी. असो! आता आमच्यासाठीच औषध शोधावं लागणार आहे....

कंजूस 08/05/2016 - 19:06
हे सर्व मुद्दे पुन्हा वाचा तुमच्या लक्षात येईल लेखक महाशयांना सगळीकडे घाई असते क्र ६ मध्येही.कधी समोर बंद पडणारं यंत्र असेल अथवा दुसयाचा विचार करणारी मुलगी.तुम्हाला असते गाल-चुम्बन "देण्याची" घाई पण तिला विचारायचे असते पुढची कर्जत फास्ट कोणत्या प्लॅटफार्मवर आहे ते.जरा दमानं घ्या.ब्लड प्रेशर वाढणार नाही. दुसय्रांचा बीपी वाढवायचा असेल तर त्याला घाई दिसली की आपण दमानं घ्यायचं एकेक प्रश्न शांतपणे विचारत राहायचे.त्याला शांतपणे करायचं असेल काम तेव्हा आपण उरकायचं.

सतिश गावडे 08/05/2016 - 20:28
जनसामान्यांची नस अगदी अचुक पकडली आहे या लेखात. लेख आवडला. हस्तीदंती मनोर्‍यात बसून लिहिलेल्या अध्यात्मिक लेखांपेक्षा हा लेख मला अधिक रीलेट झाला.

कंजूस 09/05/2016 - 04:53
केमिस्ट दुकानचा मालक देवाच्या फोटुसमोर उदबत्ती फिरवून हेच मागत असतो.सगळीकडे रोग सैराट पसरू दे आणि गोळ्या मागायला इकडे गिह्राइक येऊ दे.

रातराणी 09/05/2016 - 11:11
११. अंगणात सापाची कात सापडणे. ती पहायला गेल्यावर अजून एका सापाची कात सापडणे. १२. वन वे मधून बिनधास्त गाडी चालवणे. पुन्हा त्या भागात फिरताना "इकडून चल हा शॉर्टकट आहे" हा फुकट सल्ला दिल्यानंतर भूत पाहिल्यासारखा चेहरा केलेल्या व्यक्तीने (कोण ते सुज्ञ ओळखतीलचं) गाडी बाजूला घेऊन "तो वन वे आहे!" हे सांगणे. ( अजून घालीन भर. माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत हायपर करणाऱ्या.)

रातराणी 09/05/2016 - 11:20
१३. rm -rf ( डिलीट झालेला अक्खा प्रोजेक्ट. गिट वापरायचा कंटाळा केल्याने कुठेही बॅक अप नाही. सिस्टीम अॅडमिनच्या हातापाया पडून त्याला रिकवरी रन करायला लावलेली. ज्या फाईल्स सापडल्या त्यातून आपला कोड हुड्कुन हुड्कुन प्रोजेक्ट पुन्हा पूर्ण करने :( वर्स्ट नाईटमेयर :( )

In reply to by रातराणी

यापुढे rm नावाचा alias बनवा. आणि त्याने delete होण्याऐवजी "ToDelete" अशा folder ला date-time चा subfolder बनवून त्यात move होईल अशी छोटीशी script फावल्या वेळात बनवून ठेवा. झालंच तर सहकार्‍यांना पण त्याची copy देवून भाव खावून घ्या :)

In reply to by टवाळ कार्टा

रातराणी 09/05/2016 - 18:19
=)) हा पराक्रम केल्यानंतर सिरीयसली दुसऱ्या दिवशी परत ऑफीसला जाताना तिकडे आग लागलेली असू दे असं वाटत होतं.

रातराणी 09/05/2016 - 18:28
१६. डिफॉल्टर लिस्टमधे आल्यानंतर पप्पा एचओडी ला भेटायला आल्यावर एकाच गावचे असल्याचा नवीन शोध लागतो. मग दोघांनी तासभर मित्र असल्यासारख्य गप्पा मारणे. परत जाताना सरांनी खवटपणे "आहे माझं लक्ष" असं म्हणणे. :(