✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बाई सोडून गेली

न — नीलमोहर, Mon, 04/18/2016 - 10:13
अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली एक सुनामी आली की जगबुडी झाली, अन बाई सोडून गेली किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली अन बाई सोडून गेली म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली अन बाई सोडून गेली तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली तरीही बाई सोडून गेली म्हटले चला तर आता, कामाला लागायची वेळ झाली बाई मंगळावर जरी पोचली, घरची कामे का तिला चुकली कशी बाई सोडून गेली झाडून काढता काढता, जळमटे डोक्यातली निघाली फरशी पुसता पुसता, लख्ख सफाई मनाची झाली हरकत नाही जरी बाई सोडून गेली कपडे रगडू रगडू धुता, कित्येकांची मनोमन धुलाई केली भांडी घासू घासू काढता, नकोशी बोलणी घासून काढली बरं झालं बाई सोडून गेली अखंड कामे करूनि अंग जरी दुखले, कंबर ढिली झाली पाठ कामातून गेली, हातांचीही वाट पूरी लागली ठीक आहे जरी बाई सोडून गेली सगळेच न मिळतसे, एक हे नाहीतर ते, कायम निवड करावी लागली आयुष्य म्हणजे घरचं बाहेरचं सांभाळत, तारेवरची कसरत सारी झाली त्यात बाई सोडून गेली स्त्रीमुक्तीच्या गप्पा कितीही मारा, खरेच का मुक्तता मिळाली एका बाईच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात दुसरी मुक्त झाली शेवटी बाई सोडून गेली स्त्रीमुक्ती वाल्यांनी समानतेसाठी आंदोलने जरी किती केली लढण्यासाठी बाहेर त्या पडता, कोण करत असेल कामे घरातली जर बाई सोडून गेली

प्रतिक्रिया द्या
8970 वाचन

💬 प्रतिसाद (25)

स्त्रीमुक्तीच्या गप्पा कितीही

विजय पुरोहित
Mon, 04/18/2016 - 10:15 नवीन
स्त्रीमुक्तीच्या गप्पा कितीही मारा, खरेच का मुक्तता मिळाली एका बाईच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात दुसरी मुक्त झाली शेवटी बाई सोडून गेली स्त्रीमुक्ती वाल्यांनी समानतेसाठी आंदोलने जरी किती केली लढण्यासाठी बाहेर त्या पडता, कोण करत असेल कामे घरातली जर बाई सोडून गेली वरती मजेशीर वाटते कविता. पण या २ कडव्यात कटु सत्य आहे आयुष्याचं.
  • Log in or register to post comments

दुसरी कामवाली शोधा..

जेपी
Mon, 04/18/2016 - 10:18 नवीन
दुसरी कामवाली शोधा..
  • Log in or register to post comments

@जेपी - Mon, 18/04/2016 - 10

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/24/2016 - 07:37 नवीन
@जेपी - Mon, 18/04/2016 - 10:48 दुसरी कामवाली शोधा.. ››› नाहीतर आपले काम हतानी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

=))

सतिश गावडे
Mon, 04/18/2016 - 10:19 नवीन
=))
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Mon, 04/18/2016 - 10:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हाय हाय !

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 11:17 नवीन
भापो...!! खरंच कटू सत्य.
तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली तरीही बाई सोडून गेली
अगदी, अगदी ! यांच्या तऱ्हा संभाळता संभाळता स्वत:च्या तऱ्हांना मुरड घालावी लागते. तरीही जातातच सोडून, मेल्या ! रच्याकने जरा नवरोजींना लावा की कामाला !
  • Log in or register to post comments

अरेरे...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 04/18/2016 - 13:00 नवीन
कविते मध्ये अतिशयोक्ती रस ठासून भरला आहे. कारण घरी हक्काचा, बीनपागारी, मान खाली घालून, सगळे निमुट पणे ऐकणारा व पडेल ते काम विनातक्रार करणारा, गडी असला तर, स्त्रीयांना या समस्या भेडसावत नाहीत असे एका निरीक्षणं आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अहो ताई,

एस
Mon, 04/18/2016 - 13:03 नवीन
'कामवाली सोडून गेली' असं म्हणा. एकतर मराठी अस्मिता म्हणून आणि दुसरं म्हणजे शीर्षकावरून काहीतरी भलतंच वाटलं होतं म्हणून..! असो. बाकी 'नवरोजी' क्याट्यागरीत मोडत असलो तरी भापो.
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Mon, 04/18/2016 - 13:07 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

भापो म्हणजे काय रे भाउ ?

संजय पाटिल
Sun, 04/24/2016 - 22:36 नवीन
भापो म्हणजे काय रे भाउ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लो,

सस्नेह
Mon, 04/25/2016 - 17:08 नवीन
ये पीएसपीओ नही जानता...=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

धाग्यापर्यंत

नाखु
Mon, 04/18/2016 - 14:14 नवीन
बोलवायचा शीर्षासन प्रयोग भारी आहे.. पुढील कामवालीकरीता शुभेच्छा!!!! काम्सू आणि काम्चुकार याच्या मधला नाखु
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
Mon, 04/18/2016 - 15:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments

मोलकरीण सोडून गेली होय!! आपण

सूड
Mon, 04/18/2016 - 18:14 नवीन
मोलकरीण सोडून गेली होय!! आपण करायची घरची कामं; मोलकरीण जे पंधरा मिनीटात करुन जाते ते आपण पण करु शकतोच की!!
  • Log in or register to post comments

=)) =)) 'आपण' महत्त्वाचा.

तर्राट जोकर
Mon, 04/18/2016 - 20:04 नवीन
=)) =)) 'आपण' महत्त्वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कर्रेक्ट !

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 20:54 नवीन
'आपण' केली कामं तर साडेसात मिनिटातच होणार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

किंवा अर्धा तासही लागू शकतो.

सूड
Tue, 04/19/2016 - 14:46 नवीन
किंवा अर्धा तासही लागू शकतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कविता आवडली.

रेवती
Mon, 04/18/2016 - 18:48 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मला वाटलं मोगाखान नं लिहिली

काळा पहाड
Tue, 04/19/2016 - 00:32 नवीन
मला वाटलं मोगाखान नं लिहिली की काय कविता!
  • Log in or register to post comments

कविता छानच आहे

बोका-ए-आझम
Tue, 04/19/2016 - 08:26 नवीन
पण मला काव्यरस आणि लेखनविषय पाहून जास्त हसायला आलं.
  • Log in or register to post comments

हा हा हा!!

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 04/19/2016 - 14:53 नवीन
मस्त विषय आहे. काळजाला भिडला. बाई सोडुन गेल्यावर(कामवाली) वाटच लागते.
  • Log in or register to post comments

प्रतिसादातला कंस काढला

विवेक ठाकूर
Tue, 04/19/2016 - 15:05 नवीन
तर तो एकदम भेदी होईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

;)

माहितगार
Tue, 04/19/2016 - 17:17 नवीन
;)
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Fri, 04/22/2016 - 09:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त

DEADPOOL
Sun, 04/24/2016 - 07:25 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा