जर्मनीमध्ये एम.एस - माहिती
जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे.
मेकॅनिकल इंजिनिरिंग मध्ये बी.ई केल्यानंतर अजुन थोड्याफार तयारीने मी जर्मनीतल्या डॉर्टमुंड ह्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवु शकले. सध्या मला जर्मनीमध्ये एम.एस कसे करावे ह्याची चौकशी करणारे फोन सतत येत आहेत. सर्वांना साधारण सारखेच प्रश्न असल्याने हा एक लेख लिहुन जास्तीत जास्त माहिती सर्वांना द्यावी म्हणुन हा प्रपंच!
मी पुणे विद्यापीठातुन B.E Mechanical केले आहे. साधारणतः सर्व सेमिस्टर मध्ये फर्स्टक्लास आणि अॅग्रिगेट ७०% असे मार्क्स मला आहेत. तुमचे डिग्रीचे मार्क हा एक मुद्दा महत्वाचा असला तरी माझ्यापेक्षा बरेच कमी मार्क असलेल्या मुलांनाही प्रवेश मिळाला आहे. अनेकांनी माझे विविध परीक्षांमधले मार्क विचारल्याने प्रत्येक ठिकाणी माझा स्कोअर सांगत आहे म्हणजे अंदाज यायला मदत होईल.
डिग्री नंतर नोकरी करता करता मी जर्मन भाषा शिकायला घेतली. पुण्याच्या मॅक्सम्युलर मधुन १ लेव्हल केल्यानंतर मला जाणवले की जर मला खरंच उत्तम युनिव्हर्सिटी हवी असेल तर त्यासाठी १००% वेळ द्यावा लागेल. म्हणुन मी नोकरी सोडुन पुर्णपणे एम.एसच्या तयारीला वेळ दिला. नोकरी सोडताना माझा अनुभव साधारण २ वर्षांचा होता.
१. जर्मन भाषा
जर्मनीमध्ये जर्मन आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये शिक्षण आहे. पण अर्थातच जास्तीत जास्त कोर्सेस जर्मन भाषेत असतात. तुम्हाला इंग्रजी भाषेतील कोर्स करायचा असेल तर जर्मन येणे आवश्यक नाही. पण अर्थात काही युनिव्हर्सिटी त्याला अपवाद आहेत. तुम्हाला किती चांगली भाषा येते ह्याला महत्व दिले जातेच. पण तुम्हाला अजिबात जर्मन भाषा येत नसली तरी तुमचा नोकरीतील अनुभव, तुमचे मार्क्स, प्रोजेक्ट्स इ. अनेक मुद्द्यांनाही महत्व दिले जात असल्याने तुम्हाला प्रवेश मिळु शकतो. पण तिथे नोकरी करण्यासाठी आणि एकंदरितच जर्मनीत रहाण्यासाठी जर्मन भाषा अत्यंत आवश्यक आहे.
भारतात गोथे (मॅक्सम्युलर) चे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. प्रवेशअर्ज करताना माझ्या जर्मनच्या तीन लेव्हल्स झाल्या होत्या (A1, A2 and B1).
२. GRE
काही ठिकाणी GRE आवश्यक आहे. काही युनिव्हर्सिटी मध्ये आवश्यक नसला तरी GRE Score सुद्धा लक्षात घेतला जातो. पण कुठेही गणित (Quant) विषयातले मार्क जास्त महत्वाचे असतात. आणि तेच गृहीत धरले जातात. माझा हा स्कोअर १६२ होता.
३. IELTS \ TOEFL
इंग्रजीसाठी ह्याच दोन परीक्षांचा स्कोअर पाहिला जातो. तुमची डिग्री इंग्रजीतुन असेल तर खरं तर युनिव्हर्सिटी इंग्रजी भाषेसाठी अजुन कोणतेही प्रुफ मागत नाही. पण व्हिजासाठी ह्या परीक्षा आवश्यक आहेत. व्हिजासाठी इंग्रजीचे प्रुफ म्हणुन ह्यंचा स्कोअर पहिला जातो. तो नसल्यास परीक्षा द्यायला वेळ दिला जाऊन परत बोलावले जाते. माझा IELTS स्कोअर ८ होता.
४. डिग्रीचे मार्क्स
प्रत्येक वर्षाचे आणि महत्वाच्या विषयांचे मार्क्स बघितले जातात. बॅकलॉग असतील तर तो मुद्दा निगेटीव्ह मध्ये धरलो जातो. अगदी व्हिजा इंटरव्ह्यु मध्येही बॅकलॉग बघितले गेल्याची उदाहरणे आहेत.
ही तयारी झाल्यावर आता मुख्य प्रवेश अर्ज करायला सुरवात होते. अर्ज दोन वेळा करता येतो :- समर आणि विंटर अशा दोन "इनटेक" साठी. समरला तुलनेने कमी कोर्स असतात. समरचे अर्ज साधारण ऑगस्ट ते जानेवारी पर्यंत चालु असतात. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या तारखा वेगवेगळ्या असतात. एप्रिल मे मध्ये कोर्सेस सुरु होतात.
मी विंटरसाठी अर्ज केला होता. अर्ज करायला सुरवात फेब - मार्च पासुन झाली. १५ जुलै पर्यंत काही युनिव्हरसिटी अर्ज घेत होत्या. जुन पासुन प्रवेश मिळाला की नाही ते कळायला सुरवात झाली. एकदा प्रवेश निश्चित झाला की व्हिजासाठी तारीख घेतली. ऑक्टॉबरच्या सुरवातीला मी जर्मनीला निघाले होते.
अर्ज करताना खालील गोष्टी लागतातः-
१. Statement of Purpose
साधारण वर्डमधले १-१.५ पान (किंवा युनिव्हर्सिटीने सांगितल्या प्रमाणे) भरुन तुम्हाला ह्या कोर्सला प्रवेश का हवा आहे हे सांगावे लागते. ह्या क्षेत्रात तुम्ही कसे आलात, तुम्ही डिग्रीमध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी केल्यात, नोकरीतील अनुभव, प्रोजेक्ट्स इ बद्दल, तुमचा कोर्स आणि युनि. मधला इंटरेस्ट... ह्या विषयावर लिहावे लागते. काही वेळा जर्मनीची निवड का केली हे ही सांगावे लागते.
२. Letter of Recommendation
तुमचे शिक्षक, नोकरीतील अधिकारी ह्यांच्याकडून शिफारसपत्र घ्यावे लागते. दोन ते तीन जणांकडुन हे पत्र लागते.
३. Transcripts
तुमच्या डिग्रीच्या कॉलेज / विद्यापीठातुन तुम्हाला Transcripts मागवाव्या लागतात.
४. ह्या व्यतिरिक्त जर्मन भाषा / GRE / TOEFL / IELTS इ चे स्कोअर कार्ड्स
५. जर स्कॉलरशिपची सोय असेल तर त्याचे लेटर
६. रिझ्युम - जर्मन फॉर्मॅट प्रमाणे हा रिझ्युम लिहावा. काही वेळा युनि. हा फॉर्मॅट देते.
वरील सर्व कागदपत्रे जर्मनीला कुरिअर करावी लागतात. काही युनि. फक्त ऑनलाईन प्रवेश अर्ज घेतात त्यांना हे कुरिअर करण्याची आवश्यकता नाही. कुरिअरसाठी DHL चांगली कंपनी आहे.
हा अर्ज केल्यानंतर १-२ महिन्यात तुम्हाला प्रवेश मिळाला की नाही हे कळवणारा इमेल येतो. कोणत्याही युनि. कडुन प्रवेश मिळाला की व्हिजासाठी तारीख घेता येते.
ह्याव्यतिरिक्त "डॉइच बँके"मध्ये ब्लॉक अकाऊंट काढावे लागते. ह्या खात्यात ८०४० युरो (साधारण ६ लाख) टाकावे लागतात. हे पैसे जर्मनीमध्ये वापरायला काढता येतात. दर महिन्याला ठराविक रक्कमच काढता येते. हे खाते सुरु व्हायला साधारण १५-२१ दिवस लागतात. आणि पैसे ट्रान्सफरला ३-४ दिवस लागु शकतात. म्हणुन प्रवेश अर्ज केल्यानंतर लगेच हे खाते काढुन ठेवावे. प्रवेश निश्चित झाला की पैसे टाकता येतात. व्हिजासाठी ह्या खात्यात पैसे दाखवणे आवश्यक आहे.
बँकेत खाते काढायला आणि व्हिजासाठी मुंबईला जावे लागते.
व्हिजा मिळायला साधारणपणे एक ते दिड महिना लागतो.
___________________________________________________________
DAAD - https://www.daad.de/en/
ही जर्मनीमध्ये शिक्षणाला मदत करणारी संस्था आहे. ह्यांच्या मार्फत कोर्सेसची माहिती दिली जाते. त्यांच्या वेबसाईटवर किंवा ऑफिसमध्ये ही माहिती मिळु शकते. DAAD स्कॉलरशिपही देते. जर्मनीला जाणार्यांसाठी Pre Departure Meet आयोजित केली जाते. त्यासाठी मी नाव नोंदवले होते. पुण्यात ह्या कार्यक्रमात जर्मनीमध्ये शिकणार्या मुलांकडून बरीच माहिती मिळते. तुमच्या युनि. मधले अजुन विद्यार्थी भेटतात.
फेसबुकवरही असे अनेक ग्रुप्स आहेत जिथुन तुम्हाला त्या त्या वर्षी प्रवेशअर्ज करणार्या मुलांसोबत चर्चा करता येते. आपल्या युनि/ कोर्सचे विद्यार्थी शोधुन एकत्र तयारी करता येते.
_________________________________________________________________
जर्मनीतले आयुष्यः-
हॉस्टेल - हॉस्टेल मिळायला ६ महिने ते एक वर्षही लागु शकते. लगेच मिळाल्यास प्रश्नच नाही पण न मिळाल्यास जवळपास अपार्टमेंट शोधावे लागते. महिन्याला रहण्याचा खर्च २५०-३०० युरो आहे. घर शोधताना जर्मन भाषा उत्तम बोलता येणे हा प्लस पॉईंट आहे.
जेवण - कँटिनमध्ये चांगले जेवण मिळते पण रोज बाहेर खाणे तब्येत आणि खिशाला परवडणारे नसल्याने घरीच करुन खाणे उत्तम. इंडियन स्टोअर्स असल्याने सर्व आवश्यक गोष्टी मिळतात.
वातावरण - मी थंडीच्या दिवसात गेल्याने अगदी -२० पर्यंतही तापमान आतापर्यंत पाहिले आहे. अवकाळी पाऊस अगदी नित्याची गोष्ट आहे. उन्हाळ्याचा अजुन अनुभव नाही.
स्टुडंट जॉब्स - युनिव्हर्सिटी, रेस्टॉरंट्स मध्ये काम करु शकता. सगळीकडे जर्मन येणे आवश्यक आहे. साधारणपणे ८-१० युरो ताशी मिळु शकतात.
जर्मन लोक - मला तरी आजवर खुप चांगले आणि मदत करणारे लोक भेटले आहेत. जर्मन भाषेबद्दल अत्यंत आग्रही असल्याने आपण त्यांच्या भाषेत बोललो की ते अजुन आपुलकीने मदत करतात.
काही महत्वाच्या वेबसाईट्स -
१. http://www.mastersportal.eu/countries/11/germany.html
२. काही युनि मध्ये अॅप्लिकेशन करायला ही वेबसाईट वापरावी लागते - http://www.uni-assist.de/index_en.html
ह्यासाठी युनि असिस्टला पैसे द्यावे लागतात. पहिल्या अर्जाला ७५ युरो आणि पुढच्या प्रत्येक अर्जाला १५ युरो द्यावे लागतात.
३. अपार्टमेंट शोधायला - http://www.wg-gesucht.de/
_________________________________________________________________
* ह्या लेखातली सर्व माहिती मी २०१५ साली अर्ज करताना मला आलेल्या अनुभवांवरुन दिलेली आहे. ह्यातुन केवळ अंदाज मांडायला मदत होउ शकते. प्रत्यक्ष अर्ज करताना त्या त्या वेळचे नियम, तुम्ही जात असलेल्या युनिव्हर्सिटीचे नियम इ बघुनच जावे.*
_________________________________________________________________
वाचने
23443
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
उत्तम संकलन. यात अजून काही
In reply to उत्तम संकलन. यात अजून काही by मधुरा देशपांडे
रहाण्याचा खर्च शहराप्रमाणे
उपयुक्त आणि मुद्देसूद माहिती
खूपच सुन्दर माहिती दिलीत आपण
खूप उत्तम माहिती. वाखु साठवली
चांगली माहिती
जर्मनीतील पदवीला जगभर मान्यता
In reply to जर्मनीतील पदवीला जगभर मान्यता by सुबोध खरे
१. कोणत्याही देशातल्या
In reply to १. कोणत्याही देशातल्या by टुंड्रा
जर्मनीत टेक्नीकल युनी व
In reply to जर्मनीत टेक्नीकल युनी व by मोहनराव
हो, जर्मनीत TU (Technical
In reply to हो, जर्मनीत TU (Technical by टुंड्रा
मी सध्या TU Braunschweig
In reply to मी सध्या TU Braunschweig by मोहनराव
अरे वा! मी फारच वर वर माहिती
In reply to अरे वा! मी फारच वर वर माहिती by टुंड्रा
तुम्ही माहिती चांगलीच दिली
In reply to हो, जर्मनीत TU (Technical by टुंड्रा
TU (Technical University)
In reply to TU (Technical University) by मधुरा देशपांडे
अगदी बरोबर!
In reply to १. कोणत्याही देशातल्या by टुंड्रा
मस्त लेख
In reply to १. कोणत्याही देशातल्या by टुंड्रा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सुबोध खरे
फक्त डीग्री हवि असेल तर....
चांगली माहिती.
जर्मन पद्धतीप्रमाणे
छान मुद्देसूद माहिती
छान माहिती.
धन्यवाद.
+१
मॅक्सम्युलर मधून त्से त्स्वाय
In reply to मॅक्सम्युलर मधून त्से त्स्वाय by सूड
अॅडमिशन*
मस्त...
एक 'भारतीय' प्रश्न...
In reply to एक 'भारतीय' प्रश्न... by अर्धवटराव
माझा ह्या विषयावर काही फार
In reply to माझा ह्या विषयावर काही फार by टुंड्रा
हे वेगळं नाही, तर सर्वात जास्त महत्वाचं आहे !
तुमचा प्रश्न वेगळाच होता... मी वेगळंच लिहीत बसले. पण परदेशी शिक्षणाचा विचार करताना स्वयंपाक, भांडे घासणे, किराणा आणणे इ अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. आपण फक्त भारी डिग्री आणि भारी पगार इथवरच विचार करत रहातो. पण ते तितकेसे सोपे नाही. मला तरी व्यक्तिशः ह्या सर्व कारणांसाठी परदेशी शिक्षण जास्त प्रकारे तुमचे आयुष्य समृद्ध करते असं वाटतं.हे वेगळं तर नाहीच, पण परदेशात शिक्षण/नोकरी करण्यासाठी हेच सर्वात जास्त महत्वाचं आहे ! हे जमलं तर मग शिक्षण/नोकरी ठीक होऊ शकते... नाही जमलं तर तेथे राहणे तर दुष्कर होतेच पण शिक्षण्/नोकरीतल्या कामगिरीवर वाईट परिणाम होतो व ज्यासाठी आपण तेथे गेलो तो उद्देश असफल होतो. परदेशात जाणार्याला शिक्षण/नोकरीत काय करायचे हे कमी-जास्त प्रमाणात माहीत असतेच... ते करण्यात फक्त स्थानिक पद्धत आत्मसात करणे हीच एक वेगळी गोष्ट असते. त्याविरुद्ध, कामाची जागा आणि शिक्षणसंस्था सोडून इतर सर्व जागा/माणसे/वागण्या-बोलण्याच्या पद्धती मात्र आपल्याला पूर्ण परक्या असतात. त्यांच्याशी जमवून घेऊ शकलो, किंबहुना त्यांचा भाग होऊ शकलो तर ती गोष्ट शिक्षण/काम सुकर होते आणि यश मिळवणे शक्य होते. नवीन परिस्थितीची घरच्या परिस्थितीशी सतत तुलना करत राहून स्वतःचेच जीवन दु:खी (आणि म्हणून अपयशी) बनवणार्या मंडळींनी घरीच राहीलेले (त्यांच्यासाठी व इतरांसाठी) बरे. परदेशात कोणत्याही कारणासाठी जाताना "आता मी स्वयंभू आहे, माझी सर्व कामे कशी करावी / करवून घ्यावी हे माझे मलाच साधायचे आहे. त्यात कोणाची मदत झाली तर तो अनपेक्षित बोनस असेल." अशीच मनाची घट्ट तयारी करून (आणि ते शक्य व्हावे यासाठी निघण्याअगोदर शक्य ती सर्व माहिती मिळवून) मगच घरातून बाहेर पडावे; पण तरीही नवीन जागेत अनेक अनपेक्षित घटनांना तोड द्यायची तयारीही ठेवावी. परदेशात, आपल्याला भेटणारे आपल्या देशातले/परदेशातले अनेक अनोळखी लोक (कदाचित ते मनानेच उदार असल्याने अथवा ते अश्या एकाकी स्थितीतून अगोदर गेले असल्याने) अपेक्षेपेक्षा जास्त मदत करतात असा स्वानुभव आहे. मात्र, "Hope for the best, but prepare for the worst" या उक्तीवर आधारून राहील्यास स्वतःला मस्त मजेत सांभाळून घेत आपले उद्दिश्ट्य साध्य करता येते. मुख्य म्हणजे या सर्व प्रवासात सोसलेल्या व मात केलेल्या अडचणी भविष्यकाळातील सुखद आठवणी तर बनतातच, पण आपण जगाच्या कोणत्याही कोपार्यात यशस्वी होऊ शकतो असा एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातात... जो जन्मभर बर्यावाईट काळात साथ देतो.In reply to हे वेगळं नाही, तर सर्वात जास्त महत्वाचं आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
दोन्ही प्रतिसाद अतिशय उत्तम.
In reply to माझा ह्या विषयावर काही फार by टुंड्रा
तुमचा प्रश्न वेगळाच होता...
In reply to माझा ह्या विषयावर काही फार by टुंड्रा
सुरेख लिहिलंय. खूप आवडला
उत्तम माहिती.
आय.आय.टी. करता झोकुन देऊन
सुरेख मांडणी अन प्रतिसाद
TA RA
In reply to TA RA by अनिरुद्ध.वैद्य
१. हो, सहायक पदे असतात. तसा
In reply to १. हो, सहायक पदे असतात. तसा by टुंड्रा
अमेरिकेत विशिष्ट STEM (सायन्स
In reply to TA RA by अनिरुद्ध.वैद्य
अजुन एक राहीलंच..
In reply to अजुन एक राहीलंच.. by टुंड्रा
बरोबर.
In reply to बरोबर. by खेडूत
जर्मनीत येणार्या काळात रहाणे
In reply to अजुन एक राहीलंच.. by टुंड्रा
याशिवाय अजून एक फायदा म्हणजे
In reply to अजुन एक राहीलंच.. by टुंड्रा
वर्षाला सहा लाख!!
In reply to वर्षाला सहा लाख!! by अनिरुद्ध.वैद्य
खुपच दिलदार वाटतंय जर्मनी :)
अवांतर...
उत्तम लेख