रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

अभ्या..'s picture
अभ्या.. in मिपा कलादालन
27 Mar 2016 - 11:40 pm

rp

सर्व मिपाकरांना, वाचकांना आणि हितचिंतकांना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

प्रतिक्रिया

भिकापाटील's picture

28 Mar 2016 - 5:51 pm | भिकापाटील

इकडल्या हिरव्या झेंडेवाल्यांचा काही संबंध असावा काय असाही तर्क करता येतो

हा काय हिरवा माज का ;)

दिनु गवळी's picture

28 Mar 2016 - 5:54 pm | दिनु गवळी

खुपच सुंदर चित्र आहे मनापासुन आवडले शब्दात तर नाही व्यक्त करु शकत नाही कारण की त्यामुळे त्या वस्तुची किंमत दिसते त्यामुळे मी तर एवढेच म्हणतो की ते अमुल्य आहे

नूतन सावंत's picture

28 Mar 2016 - 6:01 pm | नूतन सावंत

क्या बात है

भिकापाटील's picture

28 Mar 2016 - 6:13 pm | भिकापाटील

सगळ्या म्हैलांचा दावा आहे
अभ्याभौ मिपाचा छावा आहे

भिकापाटील's picture

28 Mar 2016 - 6:14 pm | भिकापाटील

अभ्याभौशी वाकडं
तर, नदिवर लाकडं

जव्हेरगंज's picture

28 Mar 2016 - 6:17 pm | जव्हेरगंज

जबऱ्या, खतऱ्या, लैच भारी!!!

पुलंचा पानवाला आठवला

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 6:49 pm | टवाळ कार्टा

काहिही...एकतर तुम्हाला पानवाला समजला नाही नाहितर वरचे चित्र समजले नाही (इतकी रसग्रहणे वाचूनसुध्धा)...अथवा दोन्ही समजली नाही

जव्हेरगंज's picture

28 Mar 2016 - 6:28 pm | जव्हेरगंज

जबऱ्या, खतऱ्या, लैच भारी!!!

भंकस बाबा's picture

28 Mar 2016 - 6:42 pm | भंकस बाबा

लय भारी!

मित्रहो's picture

28 Mar 2016 - 6:49 pm | मित्रहो

काय एकेक रुपक आहे.
एकदम कल्पक चित्र

कंजूस's picture

28 Mar 2016 - 8:26 pm | कंजूस

शाकुंतल ( नावाचा ग्रंथ ) डोक्यावर घेऊन मॅक्समुल्लर नाचला होता तसे आज मिपाकर नाचताहेत मिपा डोक्यावर घेऊन असं मला दुपारी वामकुक्षी कुल्यावर स्वप्न पडले.

विवेक ठाकूर's picture

28 Mar 2016 - 8:33 pm | विवेक ठाकूर

गंडला आहे !

मॅक्स मॅक्समुलर नाय हो, गटे(ग्योथं)...
बाकी ते स्वप्न अमंळ नको त्या ठिकाणी पडलंय.

मितभाषी's picture

29 Mar 2016 - 5:15 pm | मितभाषी

=)) =))

अभ्या..'s picture

29 Mar 2016 - 5:16 pm | अभ्या..

अगदी अगदी.

अंमळच्या अनुस्वारासारखाच ;)

सूड's picture

29 Mar 2016 - 6:43 pm | सूड

आयला!! हो की राव !! =))

सतिश गावडे's picture

28 Mar 2016 - 8:32 pm | सतिश गावडे

अतिशय सुंदर चित्र. आवडले.

राघवेंद्र's picture

28 Mar 2016 - 9:08 pm | राघवेंद्र

अभ्या बेट्या एकदम मस्त बे.

रातराणी's picture

28 Mar 2016 - 10:40 pm | रातराणी

अफलातूनच! दंडवत घ्या राजे! रसग्रहण करणार्यांचे विशेष आभार कारण त्याशिवाय घंटा कळत नव्हत हे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2016 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंभर प्रतिसादाबद्दल अभिनंदन. आपल्या चित्राचं असंच कौतुक होत राहो.

-दिलीप बिरुटे
(अभ्याच्या चित्राचा १८५७ पासूनचा फ्यान )

अभ्या..'s picture

28 Mar 2016 - 11:06 pm | अभ्या..

ए जिगर. खुद गब्बर अपने साथ, अब काहेका डर.
लाख लाख धन्यवाद प्राडॉ सर. सर्व प्रतिसाद दात्यांचे वनडे सेंच्युरी साठी मनापासून आभार.
ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो.

आता तो जेसिबी आणि ते झेंडे काय दर्शवतात ते सांगशील का ?

श्रीरंग_जोशी's picture

29 Mar 2016 - 12:13 am | श्रीरंग_जोशी

मिपाचा झेंडा व मिपाचा लोगो या दोहोंच्या मध्ये वरच्या बाजूला एक युएफओ सदृश्य आकृती अस्पष्टपणे दिसत आहे. परग्रहवासी टेहळणी करत असावेत काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Mar 2016 - 12:31 am | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट चित्र, अभ्या.. !!!!!!!!!!!!!!

वल्लींच्या रसग्रहणाबद्दल क्या कहने !!!!!!!... अगदी पहिले रसग्रहण लिहीले आणि त्यावरून चित्र चितारले असा संशय यावा असे :) ;)

बाबा योगिराज's picture

29 Mar 2016 - 12:32 pm | बाबा योगिराज

४-५ दिवस गावाला गेलो होतो, म्हणून चित्र बघितले नव्हते.
एक नंबर कार्यक्रम जमलाय.

१०० पैकी १०० भावा तुला.

सुधांशुनूलकर's picture

29 Mar 2016 - 3:30 pm | सुधांशुनूलकर

चित्र खूप आवडलं आणि त्यावरचे (बहुतेक) प्रतिसाद खूप आवडले.
सलाम या कलाकारीला!

बॅनरमॅन अभ्याचा पंखा सुधांशुनूलकर

सुमीत भातखंडे's picture

29 Mar 2016 - 3:58 pm | सुमीत भातखंडे

जबरी चित्र आणि तितकच भारी रसग्रहण :)

चौकटराजा's picture

29 Mar 2016 - 4:55 pm | चौकटराजा

या चित्रात कुठेही कांजीवरम, पटोला , माहेशवरी, गार्डन चे रंग दिसत नाहीत ( पहा सम्दी मानस पाण्डरा शरट पांडरी प्यान्ट या " सिलसिला " वेषात आहेत ) सबब ही रंगपंचमी काय नाही तर हा मिपातील बाप्यांच्या विशेषांकाचे मुख्पृष्ठ आहे असा दाट सौन्शय येत आहे. ही खिरापत रंगपंचमीच्या नावाखाली अभ्या ने फोडली आहे.

बाकी नावेतील माणसे पाण्यातून किल्याकडे चालली आहेत त्यात प्राडा प्रचेह्तस दिसत आहेत. नावेत जांभया देत गावडे सर ही दिसतात. गुर्जीची आज डेट असल्याने गुर्जी नावेत नाहीत तर ते व्यासपीठावर बसून पूजा सांगत आहेत. देवळातील दगडी हत्ती कडे ते आत कोणता गोळा याकडे फेकू अशा नजरेने पहात आहेत. डोंगर उतारावर त जो कुणाही मुष्टीयुद्ध खेलताहेत बॉ....? मनोर्यावर लाउड स्पीकरवर " बळीराजाचे दुखः नावाची आर्त कविता चालू आहे. प्रवेश द्वारासमोर वेगवेगळे झेंडे पुणेकर व बिन पुणेकर किंवा आस्तिक नास्तिक च्या फेटे वाले तुरे वाले अशा सामन्यासाठी सिद्ध झालेले दिसतात. जे सी बी शेजारी जुने धागे उकरून काढंणारे तीन आय डी चिंतन करीत उभे आहेत. उजव्या बाजूला खाली स्टॉल लागले आहेत मुवि हा नेत्रुत्वा खाली कट्टा चालू आहे. काय खाताहेत हे मात्र दिसत नाही. तक्रार पेटीच्या वर एक आय डी जितं मया स्वयम्घोष करीत आहे. वरील ग्यालरीतील नीलकांत व प्रशान्त " या जितंमया या आयडी चे काय करावे या पेचात पडले आहेत. हेलीकापटर मधे प्यारे प जर्मन मित्रासोबत् बसलेले आहेत.
हम्म येकंदरीत आस्स हाय तर !

अभ्या..'s picture

2 Apr 2016 - 5:16 pm | अभ्या..

चौराकाका,
मी न काढलेले तुम्हास बरेच दिसले हो. ;)

किसन शिंदे's picture

29 Mar 2016 - 7:39 pm | किसन शिंदे

जबराट चित्र काढलेस बे अभ्या! एक चित्र शंभर शब्दांच्य भावना व्यक्त करतं म्हणतात ते इथे तंतोतंत लागू होतेय. :)

हकु's picture

29 Mar 2016 - 8:40 pm | हकु

लाजवाब!!

पद्मावति's picture

30 Mar 2016 - 12:49 pm | पद्मावति

फारच मस्तं.

पद्मावति's picture

30 Mar 2016 - 12:49 pm | पद्मावति

फारच मस्तं.

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2016 - 2:30 pm | पिलीयन रायडर

छानच आहे की हे चित्र! आधी बघुन एक नुसता बॅनर आहे असे वाटले होते. मग प्रतिसदातुन आणि वल्लींच्या रसग्रहणातुन बरीच मज्जा कळाली.

आता अभ्या स्वतः सांगतील तेव्हा सगळे बारकावे कळतील. (तोवर वल्लींचे अनाहिताबद्द्लचे लॉजिक हसण्यावारी नेत आहे! नाही म्हणजे खरंच हसु आलं.. पण असोच.. चित्रकाराला नक्की काय म्हणायचे आहे ते कळु देत..)

ह्यात पुर्वीचे इथले पडिक सदस्य जे आता वामा झाले आहेत ते ही दाखवले आहेत का? आणि सगळ्यांचा लाडका खफ? (पाकृ आणि भटकंती विभाग दाखवले आहेत तशी खफ पडिक जनता कुठे आहे?)

मिपागडाला रंगार्‍या सारखे लोंबकळणारे नक्की कोण आहेत? सासं की आता नवे सुरु झालेले रंगभुषा मंडळ?

एकंदरीत छान कल्पना आहे!

चित्र आवडलेल्या सर्वांना धन्यवाद,
बाकी काय काय तर्क लढवले गेले ते वाचून माझी भलतीच करमणूक झाली आहे.
जरा अजून मोट्ठा कॅन्व्हास मिळाला असता तर बर्‍याच गोष्टी कव्हर करता आल्या असत्या/डिट्टेलिंग करता आले असते, असे आज याटिकानी सांगावेसे वाटते.
जय हिन्द, जय महाराष्ट्र, जय मिपा.