फार छान!
आम्हाला बॉ शेवटपर्यंट चाई येन् मोठी वाटली होती.. हा हा ! एकदम गंडलो.. मजा आली . बाकी छान वर्णन व त्या निमित्ताने येणारे स्थळ डोळ्यापुढे फोटोशिवाय उभे राहिले.
अवांतरः ह्या चित्रा मागच्या टेबलवर सगळे झाकून ठेवले आहे. तिथे अशीच पद्धत आहे की फोटोपुरतं?
बाकी लेखनशैली (नेहमीप्रमाणे) ग्रेटच :)
-ऋषिकेश
धन्यवाद ॠषिकेश,
मागची झाक्-पाक अशासाठी की ज्या मेजावर लोक बसतील त्यावेळीच आच्छादन काढाचे. आणखी एक चांगला प्रकार म्हणजे जर आपण खुर्चीवर काही सामान वा कोट वगैरे ठेवले तर ताबडतोब त्या वस्तू सकट खूर्चीला एक गडद कापडाची खोळ आणून घालतात ज्यायोगे वस्तू काही सांडून खराब होत नाही व वेगळ्या रंगाच्या फुगीर आच्छादनमुळे आपली वस्तू घ्यायचे लक्षात राहते.
खरेतर अशा मोठ्या दालनात अनेक मेजांची रचना करण्यापेक्षा बर्याच चांगल्या उपाहारगृहांमध्ये गोल मेज, वर सरकती तबकडी, शीतकपाट, दूरचित्रवाणीसंच यानी सुसज्ज अशा अनेक स्वतंत्र खोल्या असतात. अगदी ५-६ ते १२-१५ पर्यंत माणसे बसू शकतील अशा आकाराच्या खोल्या असतात व प्रत्येक खोलीतच लगतचे प्रसाधनगृह देखिल असते. मात्र खाद्य्पदार्थ प्रदर्शित करण्याची पद्धत फारच आकर्षक असते. मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो.
मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो.
हे वाचून विषेश आनंद जाहला :).. माहितीबद्दल आभार
एकदम ऍन्टी-क्लायमॅक्स!!!
मैत्रीण म्हटल्यावर उत्सुकता अधिकच चाळवली आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण!
लेख उत्तम! असेच चीन भेटीवर अजून लिखाण येऊदेत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मैत्रीण कोण असेल याचा अंदाज आला होता पण तरी देखील वाचायला छान मजा आली.
मागे तुमचा "चहा व चहाचे चषक" विषयी लेख वाचल्याचे स्मरते. तुमच्या प्रवासविषयक लेखांची एक चांगला संग्रह होऊ शकेल.
कृपया अजुन लिहावे.
साक्षिदेवा,
शेवट क्लासच केला आहेस, मजा आली! :)
आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण!
सुनीलरावांसारखं मीही हेच म्हणतो! सुंदर, दिलखुलास लेख!
साक्षिदेवा, तू आता ठाणेकर राहिला नसून बराचसा चिनीच झाला आहेस! :)
असो, मिसळपाववर तुझं मनापासून स्वागत. पुढच्या लेखांची वाट पाहात आहे...
आपला,
(गाववाला) तात्या.
साक्षीशेठ,
उत्तम लेख.. मधे मधे येणारे चीनी शब्द/नावे जरा मनातल्या मनात उच्चारुन वाचायला त्रास झाला पण झकास लेख..
बरेच दिवसांनी आपले लिखाण वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मध्यंतरी एकदमच जालावरून गायब होता..
बाकी ते मालक वर्गाबद्दल एकदम सहमत..( आम्ही जुमानत नाही ते सोडा)
पुढचे लेख लवकर लवकर येऊदेत..
केशवसुमार
धकाधकीच्या आयुष्यात असे विरंगुळ्याचे क्षणही येतात. आपल्याला आवडले हे वाचून बरे वाटले, धन्यवाद.
या कथेचा प्रयोग घरी परत येताच प्रथम पत्नीवर व मग एकदा सासुरवाडी गेलो असता केला होता. सुरुवातीचे मैत्रीण प्रकरण ऐकताच सौ. च्या मामांनी ताबडतोब तिला हाक मारुन विचारले की या मैत्रीणी वगैरे तुला कशा चालतात? मग आम्ही दोघे खो खो हसू लागलो व सौ. ने मामांना चाई येनचे वय सांगताच मामा समजून चुकले की भाची व भाचे जावई यांना आपल्याला 'मामा' बनविले आहे:))
हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. (दुष्ट मालक वर्ग चार दमड्यांच्या बदल्यात हली फार काम करून घेतो, त्यातून वेळ असलाच तर नसते उद्योग असतात). असो.
तात्यासकट सर्वांचे पुन्हा आभार. असाच लोभ असूद्या!
आपला स्नेहांकित
साक्षी
हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते.
साक्षीदेवा, माझ्या विनंतीला मान देऊन तू लिहिलेस याचे बरे वाटले. यापुढेही रोजच्या कामकाजाच्या रगाड्यातून मिपाकरता दोन घटका वेळ काढत जा आणि असंच इथे चांगलंचुंगलं लिहीत रहा हीच तुला गाववाला म्हणून आग्रहाची विनंती...
आपला,
(मामलेदारची मिसळप्रेमी गाववाला) तात्या.
अवांतर - एकदा केव्हातरी सवडीने वेळ काढ. दोघं मामलेदाराला जाऊ आणि यथास्थित मिसळ हाणू! :)
मध्यंतरी व्हॉटसअॅपवर एका छोट्या चिनी मुलीचा गाणे म्हणतानाचा २,३ मिनीटाचा व्हिडीओ खुप फिरत होता. त्यामध्ये हि मुलगी स्टेजवर येऊन धिटपणे गाणे म्ह्णते , मधेच थोडा नाच करते , चहा पिण्याची नक्कल करते असे काहिसे होते . भाषा , शब्द कळत नसूनही ते गाणे लक्षात राहते .
प्रतिक्रिया
वाह!
धन्यवाद
वाह!
टेबलावरला गल्लास
ऍन्टी-क्लायमॅक्स!!!
गमतीदार प्रकार!
असेच
छान आहे :-)
शेवट क्लास!
वा वा..
छान
असेच
क्लास!!
वाह! क्या बात है!
हेच म्हणतो..
सर्वांचे आभार
साक्षिदेवा,
मस्त लेख
सर्वसाक्षी
सही
फार उत्तम आहे.
गोड फसगत
सुंदर वर्णन वाह क्या बात..
मध्यंतरी व्हॉटसअॅपवर
सुं द र