गुळाच्या पोळ्या

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
12 Jan 2009 - 11:09 pm
गाभा: 

संक्रान्ति निमित्त गुळाच्या पोळ्या केल्या पण त्या कडक न होता..मऊ झाल्या..कडक होण्यासाठि काहि खास टिप्स मिळु शकतिल का?..कुठे नेमके चुकले तेच कळत नाहि

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

12 Jan 2009 - 11:50 pm | स्वाती राजेश

जर कणिक सैल असेल तर पोळी चिवट होते व नंतर मऊ पडते. गुळ आणि कणिक सारख्याच प्रमाणात मऊ असावी.
कणकेत डाळीचे पीठ व मैदा घातल्यास पोळी खुसखुशीत होते.

दोन कणकेच्या पार्‍यांच्यामध्ये गूळ खूप घातला तर कदाचित पोळी मऊ पडेल. तसेच गूळ कोणत्या प्रकारचा आहे त्यावरही आहे. चिक्की गूळ असेल तर पोळी मऊ पडत नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

12 Jan 2009 - 11:52 pm | अवलिया

अहो पोळी तव्यावर भाजली होती का?
कारण, कडक व्हायला भाजाव्या पण लागतात.... (ह घ्या)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2009 - 11:53 pm | प्रभाकर पेठकर

कणीक आणि मैदा समप्रमाणात घेऊन पाहा. मोहन थोडे जास्त पण पीठ जरा घट्ट भिजवून पाहा.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आपला अभिजित's picture

13 Jan 2009 - 12:00 am | आपला अभिजित

तुम्ही कशाला गूळपोळ्यांचे झेंगट अंगावर घेतले होते?

एखादी बाई ठेवायची! ...म्हणजे, पोळ्या करायला हो! साध्या पोळ्या बिळ्या ठीक आहे. (त्या मलाही कराव्या लागतात!) पण गूळपोळ्या?

श्रावण मोडक's picture

13 Jan 2009 - 12:09 am | श्रावण मोडक

इथे आलेल्या सगळ्या टिप्स नव्याने गुळपोळ्या करण्यासाठी आहेत. आधीच मऊ झालेल्यांबद्दलचे ते उपाय नव्हेत. :)

स्वाती राजेश's picture

13 Jan 2009 - 12:26 am | स्वाती राजेश

वरील सर्व उत्तरे.....माझे नेमके कुठे चुकले? याची आहेत.:)

श्रावण मोडक's picture

13 Jan 2009 - 12:46 am | श्रावण मोडक

अग्गदी बरोबर. पण, माझे नेमके कुठे चुकले हे समजून त्या दुरूस्त करण्याच्या ज्या टिप्स यातून येतात, त्यासाठी दिलेली ती टिप आहे... :) :)
आणि मोडककाका? X(

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2009 - 1:30 am | बिपिन कार्यकर्ते

वेलकम टू काका क्लब!!! ही आजकालची पोट्टी उठसूठ काका करतात हो कोणाचाही. जास्त मनावर घेऊ नका.

बिपिनकाका कार्यकर्ते

विनोद कोकने's picture

13 Jan 2009 - 10:03 am | विनोद कोकने

मस्त आहे आजुन लिहा

सुनील's picture

13 Jan 2009 - 10:32 am | सुनील

वरील सर्वांशी सहमत आहे.
;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

pinki_joshi's picture

13 Jan 2009 - 3:35 pm | pinki_joshi

शेवटि ति गुळ पोळी चे काय झाले?